ब्लॉग

ब्लॉग म्हणजे काय.?

2 उत्तरे
2 answers

ब्लॉग म्हणजे काय.?

2
काही व्यक्तींना डायरी लिहिण्याची संधी म्हणून ब्लॉगिंगची सुरुवात झाली, पूर्वीच्या काळी खूप लोक वैयक्तिक डायरी चा वापर करत असत, पण आज हीच डायरी ऑनलाईन झालेली आहे यालाच आपण ब्लॉग म्हणू शकतो.

या ऑनलाईन डायरी ब्लॉग मध्ये दैनंदिन जीवनाबद्दल किंवा आपल्याला माहिती असलेल्या गोष्टींबद्दल लिहिल्या जाते. या ब्लॉग च्या साहाय्याने खूप मोठ्या प्रमाणात माहितीचे देवाणघेवाण होत असते. 
             
परंतु आज हीच सर्व माहिती इंटरनेट च्या साहाय्याने वाचकांपर्यंत पोहचण्यासाठी ब्लॉगिंग चा वापर केला जातो.

तसेच इंटरनेट वर ऑनलाईन पैसे कमावण्याचा सर्वात चांगला मार्ग ब्लॉग आहे, ज्या लोकां जवळ काहीतरी कौशल्य असते, किंवा काही लोकांना लिहायला खूप आवडते अशा लोकांसाठी ब्लॉगिंग हा उत्तम पर्याय आहे.

ब्लॉग म्हणजे काय? | Blog Meaning in Marathi

ब्लॉग म्हणजे इंटरनेट च्या साहाय्याने आपल्या जवळ असेल ज्ञान, विचार आणि कौशल्य अश्या प्रकारची माहिती जगासमोर ज्या लेखाच्या माध्यमातून मांडल्या जाते त्याला च ब्लॉग असे म्हणतात.

तसेच इंटरनेट वर मोठ्या प्रमाणात ब्लॉग उपलब्ध आहे यामधून आपल्याला कोणतीही माहिती अगदी काही वेळेतच मिळू शकते.

ब्लॉग बद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

ज्याप्रमाणे एखादा लेखक त्यांचे विचार व ज्ञान एखाद्या पुस्तका द्वारे मांडत असतो अगदी त्याच प्रमाणे ब्लॉगर त्याचे विचार व ज्ञान इंटरनेट च्या माध्यमातून जगासमोर मांडत असतो.

ब्लॉगिंग चे प्रकार | Blogging Type in Marathi

ब्लॉगिंग करायच्या वेळी ब्लॉग चा योग्य प्रकार निवडणे खूप गरजेचे असते. आणि या ब्लॉग चा प्रकार निवडला तर तुमच्या ब्लॉगिंग करण्याचा उद्देश कळतो. तर चला खालील प्रमाणे ब्लॉगिंग चे प्रकार पाहूया.

  1.  व्यक्तिगत ब्लॉगिंग | Personal Blogging

या ब्लॉगिंग मध्ये ज्या व्यक्तींना लिहण्याची आवड असते अशा व्यक्ती व्यक्तिगत ब्लॉगिंग करतात. अश्या व्यक्तींचा ब्लॉगिंग मधून पैसे कमावण्याचा हेतू नसतो, फक्त ते व्यक्ती आवड म्हणून ब्लॉगिंग करत असतात.

  2.  प्रोफेशनल ब्लॉगिंग | Professional Blogging 

या मध्ये आपण लोकांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन त्या संबधीत ब्लॉग तयार करतो, व्यावसायिक ब्लॉगिंग आपण विविध प्रकारे करू शकतो जसे कि ईमेल, लँडिंग पेज, विशेष संपर्क फ़ॉर्म आणि ऑफर्स अश्या अनेक प्रकारे ब्लॉगिंग करत असतो. या ब्लॉगिंग मध्ये ग्राहकांना विविध प्रकारचे ऑफर्स देऊन आकर्षित केले जाते.

ब्लॉग सुरु करण्यासाठी संपूर्ण माहिती 
  • ब्लॉग चा विषय 
ब्लॉग चा विषय निवडताना असा विषय निवडावा कि ज्या विषयाबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती असेल. जो आपण ब्लॉग चा टॉपिक निवडला आहे त्या वर आपल्याला माहिती लिहता येणे गरजेचे असते.
  • योग्य ब्लॉगिंग प्लैटफॉर्म निवडणे
1. विनामूल्य ब्लॉगिंग (Free Blogging Platform)

जर फ्री मध्ये ब्लॉग बनवायचा असेल तर तुम्ही WordPress, Blogger आणि Wix या वेबसाईट प्लॅटफॉर्म वर विनामूल्य ब्लॉग सुरु करू शकता.

2. सशुल्क ब्लॉगिंग (Paid Blogging Platform)

जर सशुल्क ब्लॉगिंग करत असाल तर तुम्हाला या मध्ये योग्य डोमेन आणि वेब होस्टिंग विकत घ्यावी लागते. डोमेन होस्टिंग खरेदी करण्यासाठी काही पैसे खर्च करावे लागतात.
  • योग्य डोमेन नेम आणि वेब होस्टिंग निवडणे
ब्लॉग सुरु करण्यासाठी डोमेन नेम खूप महत्वाचे असते म्हणून ब्लॉग चा टॉपिक निवडून झाला कि डोमेन नेम सिलेक्ट करणे आणि त्या सोबतच एक होस्टिंग सुद्धा खरेदी करावी. डोमेन नेम च्या बरोबरच होस्टिंग घेणे गरजेचे असते.
  • आकर्षक थिम्स आणि टेम्प्लेट्स
ब्लॉग ला डिझाईन करण्यासाठी आकर्षक थिम्स आणि टेम्प्लेट्स दिलेले असतील त्यामधून तुम्हाला ब्लॉग साठी आकर्षक टेम्प्लेट्स आणि थिम्स सिलेक्ट करावे.
  • युनिक कन्टेन्ट
ब्लॉग सुरु करत असताना सर्वात महत्वाचा घटक म्हणजे ब्लॉग मध्ये लिहिलेले कन्टेन्ट होय. आपल्या ब्लॉग मधील कन्टेन्ट समजायला सोपे असावे, आणि ब्लॉग मध्ये जेवढी जास्त माहिती आणि महत्वाची माहिती दिली जाणार तेवढाच जास्त वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळणार आहे.

ब्लॉग कसा बनवायचा आणि ब्लॉग बनविण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत याबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी मराठी स्पिरिट वेबसाईट ला नक्की भेट द्या.

अश्या प्रकारे वरील काही स्टेप्स फोल्लो करून तुम्ही तुमचा ब्लॉग सुरु करू शकता, जर वरील लेखामधील माहिती आवडली असेल तर कंमेंट करा आणि शेअर सुद्धा करा.

उत्तर लिहिले · 28/4/2022
कर्म · 2195
0

ब्लॉग म्हणजे काय?

ब्लॉग (Blog) हा एक ऑनलाइनPlatform आहे. ज्यावर एखादी व्यक्ती किंवा संस्था नियमितपणे माहिती, विचार, अनुभव किंवा इतर विषयांवर लेखन प्रकाशित करते.

ब्लॉगची काही वैशिष्ट्ये:

  • नियमित लेखन: ब्लॉगवर नियमितपणे नवीन लेख प्रकाशित केले जातात.
  • विषयावर आधारित: ब्लॉग एका विशिष्ट विषयावर केंद्रित असू शकतो, जसे की पर्यटन, पाककला, तंत्रज्ञान, किंवा कोणताही अन्य आवडता विषय.
  • टिप्पणी करण्याची सुविधा: वाचकांना लेखांवर त्यांची मते किंवा प्रश्न विचारण्याची संधी मिळते.
  • वैयक्तिक किंवा व्यावसायिक: ब्लॉग वैयक्तिक किंवा व्यावसायिक कारणांसाठी वापरले जाऊ शकतात.

ब्लॉगचे फायदे:

  • विचार व्यक्त करणे: ब्लॉग लेखकाला आपले विचार आणि कल्पना जगासमोर मांडण्याची संधी देतो.
  • ज्ञान आणि माहिती: वाचकांना नवीन गोष्टी शिकायला मिळतात.
  • समुदाय निर्माण करणे: एकाच विषयात आवड असणाऱ्या लोकांना एकत्र आणण्यास मदत करते.
  • व्यवसायवृद्धी: व्यवसायांसाठी आपल्या उत्पादनांची किंवा सेवांची माहिती देण्यासाठी एक प्रभावी माध्यम आहे.

उदाहरण:

  • एखाद्या व्यक्तीचा प्रवास अनुभव सांगणारा ब्लॉग.
  • एखाद्या कंपनीचा त्यांच्या उत्पादनांविषयी माहिती देणारा ब्लॉग.
  • एखाद्या शिक्षकाचा शिक्षणविषयक विचार मांडणारा ब्लॉग.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 960

Related Questions

टीपा लिहा ब्लॉग?
ज्याप्रमाणे एखाद्या स्कीममध्ये एखाद्याचा रेफरन्स कोड टाकून नवीन मेंबर जोडून दोघांनाही फायदा होतो, त्याचप्रमाणे ब्लॉगमध्ये असे नवीन मेंबर जोडून दोघांनाही फायदा होतो की नाही? आणि असे नवीन मेंबर जोडता येत असतील तर ते कसे जोडायचे?
इंटरनेटवर ब्लॉग कसे लिहिले जातात? ब्लॉगची प्रोसेस पहिल्यापासून ते शेवटपर्यंत कोणकोणत्या स्टेप्स आहेत?
माझा ब्लॉग कसा वाटतो? काही बदल करावा काय, सूचना द्या.
इंस्टाग्रामवर लिहिण्यासाठी ब्लॉग तयार करायचा आहे, त्यासाठी काय प्रोसेस आहे?
ब्लॉगरमध्ये कस्टम थीम टेम्प्लेट कसे जोडावे?
ब्लॉगमध्ये कॉपी पेस्ट डिसेबल करून स्वतःचा काही मेसेज राईट क्लिक केल्याबरोबर देता येईल का?