2 उत्तरे
2 answers

समुद्राचे पाणी खारट का असते?

13
नदी, तलाव यांचे पाणी खारट लागत नाही. परंतु नदी समुद्राला मिळाल्यानंतर पाणी खारट बनते आणि समुद्राचे पाणी मूलतः खारट असते. याला वैज्ञानिक कारण आहे.

जे पाणी आपण पिण्यासाठी वापरतो त्या पाण्यात काही प्रमाणात क्षार असतात. परंतु त्यांचे प्रमाण कमी असते. म्हणून त्यांची चव आपल्या जिभेला जाणवत नाही.  म्हणून हे पाणी आपल्याला खारट लागत नाही.

नदीला मिळणारे पाणी हे पावसापासून मिळालेले पाणी असते आणि हे पाणी पाऊस पडल्यानंतर जमिनीतून, खडकांतून वाहते. असे होत असताना मातीतील, खडकांतील काही खनिजे, क्षार या पाण्यात मिसळतात आणि विरघळतात. हेच पाणी पुढे जाऊन समुद्राला मिळते. जेव्हा पृथ्वी निर्माण झाली तेव्हा अश्या नद्यांचे पाणी समुद्राला जाऊन मिळत राहिले. समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होते. भाष्पीभवन होताना फक्त पाण्याचीच वाफ होते परंतु त्या पाण्यात मिसळलेले क्षार आणि इतर खनिजे मात्र समुद्राच्या पाण्यात कायम राहतात. त्यांचे बाष्पीभवन होत नाही. हजारो वर्षे हि प्रक्रिया चालू राहिल्यामुळे या पाण्यात क्षाराचे प्रमाण वाढत राहिले आणि यामुळे समुद्राचे पाणी खारट बनले.

समुद्राच्या पाण्यातील क्षारांच्या प्रमाणानुसार खारटपणा कमी जास्त असतो. जगात मृत समुद्रात सर्वात जास्त क्षारांचे प्रमाण आहे. म्हणून या समुद्राचे पाणी सर्वात खारट आहे.
उत्तर लिहिले · 13/6/2018
कर्म · 5060
0

समुद्राचे पाणी खारट असण्याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • नद्या आणि जमिनीवरून वाहून येणारे क्षार: नद्या आणि जमिनीवरून वाहून येणारे पाणी समुद्रात मिसळते. या पाण्यात खनिजे आणि क्षार (Minerals and salts) असतात. हे क्षार समुद्रात जमा होतात.
  • ज्वालामुखी उद्रेक: समुद्राच्या तळाशी होणारे ज्वालामुखी उद्रेक (Volcanic eruptions) आणि भूऔष्णिक झऱ्यांमधून (Geothermal vents) खनिजे आणि रसायने पाण्यात मिसळतात.
  • समुद्रातील जलचर: समुद्रातील जीव आणि वनस्पती यांच्यामुळे सुद्धा क्षार वाढतात.
  • पाण्याचे बाष्पीभवन: समुद्राच्या पाण्याची वाफ होते, परंतु क्षार समुद्रातच राहतात. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाल्यावर क्षारतेचे प्रमाण वाढते.

या सर्व कारणांमुळे समुद्राचे पाणी खारट असते.

अधिक माहितीसाठी काही उपयुक्त संकेतस्थळे:

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1020

Related Questions

खरेदी प्रमाणे माझी जागा पण उत्तर ते दक्षिण?
महाराष्ट्रातील घाट व त्यांची माहिती?
गाव हे समुद्राचा भाग आहे का?
पूर्व युरोपातील अनेक देश सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली होते का?
कोकणाचा कुठला भाग शेतीसाठी उत्तम आहे?
शहर अजिंक्यताराच्या पायथ्याशी वसलेले आहे?
जमीन म्हणजे काय?