5 उत्तरे
5 answers

12 वी नंतर काय करायला हवे?

6
१२ वीत कमी गुण मिळालेत? हे आहेत करीयरचे हटके पर्याय 

करियर 

फोटोग्राफी 
हे सध्या मोठ्या प्रमाणात मागणी असलेले क्षेत्र आहे. प्रत्येक क्षण साठवून ठेवणे ही सध्या गरज बनली आहे. त्यामुळे बाळाच्या जन्मापासून ते प्री वेडींग आणि वेडींगपर्यंतच्या अनेक संकल्पना पुढे येत आहेत. 

त्याचबरोबर मनोरंजन क्षेत्रातही फोटोग्राफर आणि व्हिडियोग्राफरना मोठी मागणी आहे. 

एअर हॉस्टेस 
तुमचे व्यक्तिमत्त्व उठावदार असेल आणि तुमच्याकडे चांगले संवाद कौशल्य असेल तर तुम्ही या क्षेत्राचा निश्चितच विचार करा. मात्र यासाठी तुमचे इंग्रजी, हिंदी यांसारख्या भाषांवर प्रभुत्व असणेही आवश्यक आहे. 

फॅशन डिझायनिंग 
सध्या फॅशन क्षेत्राचा वेगाने विस्तार होत आहे. त्यामुळे तुमच्याकडे थोडी कल्पकता असेल आणि तुम्हाला फॅशनमध्ये आवड असेल तर तुम्ही नक्कीच या पर्यायाचा विचार करु शकता. 

याचे औपचारिक शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेत किमान ४५ टक्के गुण असणे आवश्यक आहे. 


अॅनिमेशन 
स्मार्टफोनचा वाढता वापर, इंटरनेटवरील असंख्य गोष्टी, जाहिरात क्षेत्र, चित्रपट तसेच मालिका यांमध्ये असलेली वाढती स्पर्धा यामुळे अॅनिमेशन क्षेत्राला मागच्या काही वर्षात चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे. 

तुमच्याकडे कल्पकता असेल तसेच तुम्हाला चित्रकलेबाबत आवड आणि जाण असेल तर तुम्ही या करीयरचा विचार करु शकता.
उत्तर लिहिले · 31/5/2018
कर्म · 280
3
💁‍♂ *बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या वाटा*
*📚  Educational  📚*
------------------------------------------------
*🏆 करिअरचे विविध मार्ग*

🎯 आयुष्यात बारावीचे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असते. विद्यार्थ्यांच्या करिअरचा टर्निग पॉईंटसाठी हा काळ महत्वाचा असतो. यामुळे बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या काही वाटा आपण पाहू....

*▪विज्ञान शाखा*
बीएसस्सी (भौतिकशास्त्र)
बीएसस्सी (रसायनशास्त्र)
बीएसस्सी (वनस्पतीशास्त्र)
बीएसस्सी (प्राणीशास्त्र)
बीएसस्सी (संगणक)
बीएसस्सी (गणित)
बीएसस्सी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित)
बीएसस्सी (वनशास्त्र)
बीएसस्सी (आहारतज्ज्ञ व पोषणतज्ज्ञ)
बीएसस्सी (गृह विज्ञान)
बीएसस्सी (कृषी विज्ञान)
बीएसस्सी (उद्यानविद्या)
बीएसस्सी (रेशीम उत्पादन)
बीएसस्सी (समुद्रशास्त्र)
बीएसस्सी (मानववंशशास्त्र)
बीएसस्सी (न्यायवैद्यकशात्स्र)
बीएसस्सी (आहार)
बीएसस्सी (डेअरी तंत्रज्ञान)
बीएसस्सी (हॉटेल व्यवस्थापन)
बीएसस्सी (फॅशन डिझाईन)
बीएसस्सी (मल्टिमीडिया)
बीएसस्सी (थ्रीडी अॅनिमेशन)
*▪वाणिज्य शाखा*
सनदी लेखापाल
मूल्य व्यवस्थापन
सीएस (कंपनी सचिव)
बी. कॉम (कर आणि कर प्रक्रिया)
बी. कॉम (प्रवास आणि पर्यटन)
बी. कॉम (बँक व्यवस्थापन)
बी. कॉम
बी.बी.ए
बी.बी.एम
आर्थिक व्यवस्थापन
*▪कला शाखा*
जाहिरात
अर्थशास्त्र
ललित कला
परदेशी भाषा
इंटेरिअर डिझायनर
पत्रकारिता
ग्रंथशास्त्र
शारीरिक शिक्षण
राज्यशास्त्र
मानसशास्त्र
समाजसेवा
समाजशास्त्र
*▪व्यवस्थापन संबंधी अभ्यासक्रम*
व्यवसाय व्यवस्थापन
बँक व्यवस्थापन
इव्हेंट मॅनेजमेंट
रुग्णालय व्यवस्थापन
मानव संसाधन व्यवस्थापन
तर्कशास्त्र व्यवस्थापन
*▪कायदेविषयक अभ्यासक्रम*
एलएलबी
बीए. एलएलबी
वैद्यकीय अभ्यासक्रम
एमबीबीएस
बीएएमएस (आयुर्वेद)
बीएचएमएस (होमिओपॅथी)
बीडीएस
*▪पॅरामेडिकल अभ्यासक्रम*
नर्सिंग
डी.फार्म
बी.फार्म
भूल तंत्र
कार्डियाक केअर
मेडिकल लॅब तंत्रज्ञ
एक्स रे तंत्रज्ञ
रेडिओथेरपी तंत्रज्ञ
रिहाबिलिटेशन थेरपी
*▪अभियांत्रिकी अभ्यासक्रम*
बी.टेक अभियांत्रिकी
पेट्रो रसायन अभियांत्रिकी
पेट्रोलियम अभियांत्रिकी
स्थापत्य अभियांत्रिकी
यांत्रिक अभियांत्रिकी
वैमानिक अभियांत्रिकी
एरोस्पेस अभियांत्रिकी
कृषी अभियांत्रिकी
ऑटोमोबाईल अभियांत्रिकी
सागरी अभियांत्रिकी
खनन अभियांत्रिकी
कापड अभियांत्रिकी
*▪तंत्रनिकेतन अभ्यासक्रम :*
स्थापत्य अभियांत्रिकी
यांत्रिक अभियांत्रिकी
ऑटोमोबाईल अभियांत्रिकी
संगणकशास्त्र अभियांत्रिकी
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी
विद्युत अभियांत्रिकी
▪असे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यातील आपला कल आणि आवड यानुसार अभ्यासक्रम निवडावा. तसेच यासंबंधी प्रशिक्षण संस्थांची निवड करतानाही विशेष काळजी घ्यावी. चला तर मग आपल्या करिअरचा मार्ग निश्चित करा आणि यशस्वी वाटचाल करा.
▪ *आर्टीस्ट* : तुम्हीजर क्रियेटीव्ह नेचरचे असाल, कोणताही गोष्ट वेगळ्या पद्धतीने सादर करण्याची कला तुमच्यामध्ये असले तर, समजून जा तुम्ही एक कलाकार आहात. त्याचा प्रत्यक्ष जीवनात करिअर म्हणून वापर करता येऊ शकतो. म्हणून, कलेशी संबंधित कोणताही कोर्स तुम्ही करू शकता. हे कोर्सेस विविध संस्थांमध्ये 6 महिने ते 2 वर्षे किंवा त्याहूनही अधिक कालावधीसाठी शिकवले जातात.

▪ *हॉटेल मॅनेजमेंट* : हॉटेल मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्हाला 12वी पास असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, सेल्फ कॉन्फडन्स आणि कम्यूनिकेशन स्किल याच्या आधारावर तुम्ही यशस्वी उद्योजक बनू शकता. हा कोर्स सर्टिफिकेट, डिप्लोमा आणि बॅचलर डिग्री अशा स्वरूपात उपलब्ध आहे. हा कोर्स केल्यावर तुम्ही जॉब करू शकता तसेच, स्वत:चा व्यवसायही करू शकता.

▪ *आर्कीटेक्चर* : तुम्ही जर सायन्समधून 12वी पास असाल तर, त्यातही तुमचा जर गणित विषय असेल तर, तुम्ही आर्कीटेक्चर फिल्डसाठी ट्राय करू शकता. या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला एण्ट्रन्स एग्झाम द्यावी लागते. या कोर्सला प्रवेश घेण्यापूर्वी तूम्ही जर, तुमचा पोर्टफोलियो डिझाईन केला असेल किंवा एखादा प्रोजेक्ट केला असेल तर तुमची प्रवेश निश्चितीची शक्यता अधिक वाढते.

▪ *मर्चंट नेव्ही* : मर्चंट नेव्हीत प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 60% गुणांनी 12वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सोबतच तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडवाले (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) असणे गरजेचे आहे. एन्ट्रान्स एग्झाम पास झाल्यावर तुम्हीला या कोर्ससाठी अप्लाय करता येऊ शकते.

▪ *टेक्निकल फिल्ड* : आपल्यापैकी अनेक लोकांना यंत्राबाबत जाणून घेण्याची इच्छा आणि आवड असते. कोणतेही यंत्र हातात पडले की, ते खोलने, जोडणे त्यातून नवे काही निर्माण करणे असे प्रकार अशा लोकांकडून होता. अशा मंडळींसाठी 12 नंतर टेक्निकल फिल्ड केव्हाही चांगले. आपण टेक्निकल फिल्डचे ट्रेनिंग करून या क्षेत्रात करिअर करू शकता.

▪ *इतर कोर्सेस* : याशिवाय आपण डिप्लोमा इन फिल्म, एनिमेशन, कॅमेरा आणि लाईटींग, डिप्लोमा इन फिल्म मेकींग आणि व्हिडिओ प्रॉडक्शन यातही प्रयत्न करू शकता. हे सर्व कोर्सेस तुम्हाला 6 महिने ते 2 वर्षे कालावधीत पूर्ण करता येतात.

*_12वी उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे टॉपचे 9 कोर्स ठरतील फायदेशीर...._*


12वी चा निकाल लागला आणि अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण देखील मिळाले, पण अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला असणार बारावीनंतर कोणता कोर्स करावा? यासाठी आम्ही अनेक कोर्सची माहिती आपल्यासाठी घेऊन आलो आहे यापैकी कोणताही कोर्स आपण निवडून आपले भविष्य उज्वल करू शकतात.

*हे सर्व कोर्स कला, वाणिज्य, विज्ञान या शाखेतील विद्यार्थी करू शकतात*


*Graphic designing*
▪ विद्यार्थ्यांसाठी अनेक कोर्स उपलब्ध आहे, पण ग्राफिक डिझायनिंग या कोर्सला 2019 पासून अधिक प्राधान्य दिले जात आहे.

▪ या कोर्सचा कालावधी किमान सहा महिने किंवा एक वर्ष इतका असतो. हा कोर्स विद्यार्थ्यांनी करून घेतला पाहिजे कारण याची  मागणी अनेक ठिकाणी आहे. अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांसाठी ग्राफिक डिझायनरची अत्यंत गरज पडते.

▪ ग्राफिक डिझायनिंग कोर्स झाल्यानंतर आपण Advertising एजन्सी तसेच मल्टिनॅशनल कंपनी याव्यतिरिक्तही अनेक ठिकाणी नोकरी करू शकतात आणि चांगले वेतन कमवू शकतात. हा कोर्स झाल्यानंतर नोकरी करण्यासाठी पुणे किंवा मुंबई अशा मोठ्या शहरांमध्येच नोकरी केल्यास फायदेशीर ठरेल.

*Digital marketing*
▪ सध्या प्रत्येक व्यवसायाला मार्केटिंगची गरज आहे, पण ही मार्केटिंग डिजिटल स्वरूपात केल्यास व्यवसायांना अधिक फायदा मिळतो. यासाठी डिजिटल मार्केटिंग हा कोर्स सध्या जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांची पसंती ठरली आहे.

▪ डिजिटल मार्केटिंग हा कोर्स एक ते दोन वर्षांचा असतो यापेक्षाही कमी कालावधीचा देखील कोर्स आपण करू शकतात पण जितका कालावधी आपण या कोर्समध्ये लावेल तितके आपल्याला चांगले नॉलेज मिळेल.

▪ डिजिटल मार्केटिंग हा कोर्स झाल्यानंतर अनेक जाहिरात एजन्सीमध्ये आपल्याला नोकरीची संधी असते. अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये जाहिरात डिपारमेंट असल्याने नोकरीची संधी अधिक असते. सध्या डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांची अनेक मोठ्या व्यवसायांना गरज आहे याकरिता आपण हा कोर्स नक्की केला पाहिजे.



*Hotel management
▪ हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अतिशय उत्तम ठरू शकतो. हा कोर्स करून तुम्ही लवकरात लवकर नोकरी मिळवू शकतात किंवा स्वतःचा व्यवसायदेखील सुरू करू शकतात. 

▪ यामध्ये तुम्ही किमान चार वर्षांचा कोर्स करू शकतात. यामध्ये फक्त कुकिंग नसून विविध शाखा असतात त्यामध्ये तुम्ही करिअर करू शकतात. 

▪ बारावी नंतर आपल्याला सीईटी द्यावी लागेल त्यानंतर तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट कोर्स मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. 

▪ हॉटेल मॅनेजमेंट कोर्स केल्यानंतर आपल्याला नोकरीसाठी मोठमोठ्या हॉटेल ऑप्शन म्हणून राहू शकतात. त्यानंतर आपण स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकतात. 


*Journalism and Mass Communication
▪ बारावी नंतर हा एक उत्तम मार्ग आहे कोणत्याही शाखेत ला विद्यार्थी हा कोर्स करू शकतो. 

▪ पत्रकारिता किंवा जाहिरात या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी आपल्याला बारावी मध्ये 50% marks असणे आवश्यक आहे. 
त्यानंतर आपली एक प्रवेश परीक्षा घेतली जाईल ती परीक्षा पास केल्यानंतर आपली मुलाखत व ग्रुप डिस्कशन होईल. 

▪ संपूर्ण शिक्षण झाल्यानंतर आपल्याला विविध न्युज पेपर टीव्ही चॅनेल किंवा advertising agency यामध्ये नोकरीची संधी असते. 

*वैद्यकीय क्षेत्र B Pharmacy
▪ विज्ञान शाखेतील विद्यार्थी हा कोर्स करू शकतात. यासाठी पात्रता बारावीनंतर प्रवेश परीक्षा म्हणजेच cet 

▪ संपूर्ण शिक्षण झाल्यानंतर नोकरीसाठी विविध औषधी कंपन्या किंवा स्वतःचा व्यवसायदेखील सुरू करू शकतात. 

*Event management
▪ या क्षेत्रामध्ये कोर्स केल्यानंतर विविध कंपन्यांमध्ये आपण नोकरी करू शकतात. 

▪ इव्हेंट मॅनेजमेंट हा कोर्स आपण बारावी नंतर करू शकतो. आज-काल event करण्यासाठी बहुतेक कंपन्यांची मदत घेतली जाते. कोणताही घरचा कार्यक्रम जसे की लग्न किंवा रिसेप्शन पार्टी असल्यास इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या यांची मदत घेतली जाते‌ 

*Llb
▪ बरेच विद्यार्थी हा कोर्स करत नाही पण हा कोर्स केल्यानंतर अनेक फायदे आहेत ‌ 
कोणत्याही शाखेतील विद्यार्थी हा कोर्स करू शकतात. 

▪ 12वी नंतर हा कोर्स तुम्ही करू शकतात किमान याची कालावधी पाच वर्ष असते‌ 

*BCA
▪ बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन हा एक कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग लॅंग्वेजचा कोर्स आहे. यामध्ये आपण प्रोग्रॅमिंग किंवा ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट याचा अभ्यास करून विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकतात 

▪ वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतील विद्यार्थी या कोर्समध्ये प्रभुत्व मिळवू शकतात व पुणे मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये लवकरात लवकर नोकरी मिळवू शकतात. 


*Ba,Bcom,Bsc
▪ बारावीनंतर विद्यार्थी कोणत्याही कॉलेजमध्ये हा कोर्स करू शकतो. 

▪ कालावधी तीन वर्षांचा असतो त्यानंतर आपण विविध गव्हर्मेंट एक्झाम देऊ शकतो. 

*12वी नंतरच्या हे आहेत “हटके” डिप्लोमा कोर्सेस...!*

१२ वी तर झाली आता पुढे काय करू??? कोणता कोर्स घेऊ? करियर नीट झालं पाहिजे, नाहीतर खरं नाही….असे विचार स्वस्थ बसू देत नाहीत. हेच टेन्शन पालकांना ही सतावत असतं.त्यावर हे काही पर्याय....

🎯 *Diploma in Fashion Designing:* या क्षेत्रात येण्यासाठी तुम्हाला फॅशन जगताबद्दल आवड असयला हवी. या क्षेत्रात आल्यावर डिजाईन आणि स्टाइल या दोन गोष्टींवरच तुमचं करियर अवलंबून असेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला स्केच करणं देखील शिकावं लागेल.

🎯 *Diploma in Computer Application:* जर तुम्हाला कॉम्प्युटर सोबत खेळण्याची (गेम नव्हे, तंत्रज्ञान) आवड असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. या क्षेत्रात तुम्हाला computer software आणि languages वर काम करायला मिळेल.

🎯 *Diploma in Yoga:* सध्या जगामध्ये योगाची भलतीच चलती आहे. जर लहानपणापासून तुम्हाला योगा आणि व्यायामाची आवड असेल, इतरांना ते शिकवण्याची इच्छा असेल तर हा कोर्स तुमच्यासाठीच आहे असे समजा.

🎯 *Diploma in Banking:* ज्यांना सायन्सची आवड नसते त्यापैकी बरेच जण बँकिंग क्षेत्राकडे वळतात, पण प्रत्येक जण या क्षेत्रात यशस्वी होतोच असे नाही, त्याचे कारण म्हणजे विद्यार्थी बँकिंग क्षेत्राला अतिशय हलक्यामध्ये घेतात. तुम्हाला बँकिंग संबंधित कार्यांची आवड असेल तरच या क्षेत्रात या, अन्यथा डेटा एन्ट्री करण्यात अख्ख आयुष्य जाईल

 🎯 *Diploma in Financial Accounting:* बहुतेक जण हे क्षेत्र आणि बँकिंग क्षेत्र एकच असल्याचे समजतात, पण तसे बिलकुल नाही. सध्या या क्षेत्रामध्ये भरपूर स्कोप आहे. जर तुम्हाला आकडे आणि हिशोब यांच्या संगतीत राहायला आवडत असेल तर बिनधास्त करा हा कोर्स.


🎯 *Diploma in Industrial Safety:* चाकोरीबाहेरचा करियर ऑप्शन म्हणून याकडे पाहता येईल. प्रत्येक उद्योगामध्ये या क्षेत्राचा समावेश असल्याने बेरोजगार वगैरे राहण्याचा प्रश्नच येत नाही. उद्योगक्षेत्र प्रत्येक आपत्तीपासून सुरक्षित राखणे म्हणजे Industrial Safety

🎯 *Diploma in Physiotherapy:* हा डिप्लोमा खास करून सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी! जर तूम्हाला रुग्णांची काळजी घेण्याची आवड असेल तर तेच काम हटक्या पद्धतीने करून तुम्ही त्यांना बरे कसे करू शकता ते शिकवते Physiotherapy

🎯 *Diploma in 3D Animation:* या क्षेत्राबद्दल तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही. इमॅजीनेशन आणि मेहनत या दोन गोष्टी या कामात अतिशय महत्त्वाच्या! जर तुम्ही कार्टून वेडे असाल आणि अॅनिमेशनचे फॅन असाल तर बॉस हा कोर्स तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो, पण यात पैसा देखील भरपूर लागतो बरं!

🎯 *Diploma in Interior Designing:* घर सजवायची आवड आहे? घरात नवनवीन प्रयोग करून घर सुंदर कसं ठेवता येईल हाच विचार तुम्ही सतत करत असाल, तर या क्षेत्रामध्ये तुम्ही चमकण्याचे चान्सेस जास्त आहेत.

🎯 *Diploma in Advertising and Marketing:* हे तर आजचं सर्वात आघाडीचं क्षेत्र! गेल्या काही वर्षांत हे क्षेत्र इतकं भरभराटीला आलं आहे की जाहिरात आणि मार्केटिंगच्या पलीकडे गेलं आहे. जर तुमच्याकडे संवाद कला आहे किंवा लोकांना कन्वीन्स करण्याची पॉवर आहे तर या क्षेत्रात नशीब आजमावून बघण्यास हरकत नाही.

🎯 *Diploma in Various Languages:* या क्षेत्रात सहसा कोणी पाउल ठेवत नाही कारण हे क्षेत्र तितकं फॅन्सी नाही ना! पण विश्वास ठेवा, यात करियर करण्यास तुम्हाला जास्त कॉम्पीटीशन नाही. तसेच पैसे हि जबरदस्त मिळतात, आणि परदेशातून संधी चालून आली तर जमलं की सगळं!

*पोस्ट आवडली तर शेअर करायला विसरू नका....☺️*
उत्तर लिहिले · 28/5/2019
कर्म · 569245
0

12वी नंतर काय करायला हवे, हा प्रश्न तुमच्या आवडीनिवडी, क्षमता आणि ध्येयांनुसार बदलतो. तरीही, काही सामान्य पर्याय खालीलप्रमाणे:

1. शिक्षण (Education):
  • पदवी (Degree): अनेक विद्यार्थी Arts (कला), Science (विज्ञान), Commerce (वाणिज्य) शाखेतून पदवी घेतात.
  • व्यावसायिक अभ्यासक्रम (Professional Courses): अभियांत्रिकी (Engineering), वैद्यकीय (Medical), व्यवस्थापन (Management), कायदा (Law) असे अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
  • डिप्लोमा (Diploma): लवकर नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही डिप्लोमा करू शकता.
2. नोकरी (Job):
  • 12वी नंतर अनेक सरकारी आणि खाजगी नोकऱ्या उपलब्ध आहेत.
  • तुम्ही तुमच्या कौशल्यानुसार नोकरी शोधू शकता.
3. स्वयंरोजगार (Self-employment):
  • स्वतःचा व्यवसाय सुरू करणे हा देखील एक चांगला पर्याय आहे.
  • तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही व्यवसाय सुरू करू शकता.

टीप: * करिअर निवडताना आपल्या आवडत्या विषयांना आणि भविष्यातील संधींना प्राधान्य द्या. * करिअर मार्गदर्शनासाठी तज्ञांचा सल्ला घ्या.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1040

Related Questions

शिक्षक या क्षेत्रात कोणासारखे तुम्हाला बनावेसे वाटते ते सांगा?
जिल्हा पोलीस प्रमुख असे व्हावेसे का वाटते? एका वाक्यात उत्तर.
10वीनंतर काय करावे?
खालील शब्द कोणत्या वयोगटाशी अथवा व्यवसायाशी निगडित आहेत?
मी एका साध्या रिलेशनशिपमध्ये आहे आणि माझी सरळ सेवा परीक्षेची तयारी चालू आहे. मला त्या मुलीला सोडायचे नाही आणि मला माझे करियर पण महत्त्वाचे आहे, मग मी काय करू? मला दोन्ही गोष्टी सोडायच्या नाहीत.
एम.कॉम नंतर काय करू?
मुक्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केल्यानंतर काय?