2 उत्तरे
2 answers

उपसा जलसिंचन म्हणजे काय?

1
पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त पिकांना दिलेल्या पुरक पाण्याला जलसिंचन असे म्हणतात.भारतातील ४५० जिल्हयांपैकी बागायत क्षेत्र असलेल्या ४४ जिल्हयांमधून देशाच्या अन्नधान्य उत्पादनापैकी ५०% उत्पादन होते. या ४४ जिल्हयांपैकी जास्त सिंचन क्षेत्र असणा-या १४ जिल्हयांत देशाच्या २५% अन्नधान्याचे उत्पादन मिळते. यावरून शेतीसाठी जलसिंचनाचे महत्व लक्षात येते.पृथ्वीचा ७१% भाग पाण्याने व्यापलेला आहे. यापैकी ९७% पाणी खारे असून ते समुद्रात आहे.जागतिक पाण्याच्या वितरणाच्या बाबतीत भारताचा जगात ब्राझिल, रशिया, चीन, कॅनडा नंतर पाचवा क्रमांक लागतो. परंतु जलसिंचनाखालील क्षेत्राच्या बाबतीत भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो.भारतात सरासरी ११९ सेमी पाउस पडतो. भारतात एकूण ४०० दशलक्ष हेक्टर पाणी मिळते. त्यापैकी ११५ दशलक्ष हेक्टर मी. पाणी वाहून जाते, २१५ दशलक्ष हेक्टर मी. जमिनीत मुरते व ७० दशलक्ष हेक्टर मी. पाण्याची वाफ होते.पृष्ठभागावरून वाहणा-या पाण्यापैकी १५ दशलक्ष हेक्टर मी. पाणी धरणात अथवा तळयात साठविले जाते.धरणाच्या पाण्यापैकी वाफे द्वारे नष्ट होणारे पाणी – २०.५% तळ्यातील पाण्यापैकी वाफे द्वारे नष्ट होणारे पाणी – ४०% कालव्यातून होणारी पाण्याची गळ – २० ते ३०% प्रत्यक्षात पिकांना मिळणा-या पाण्यापैकी ९९% पाण्याचे बाष्पोत्सर्जन होते व उरलेले १% पाणी पीक वाढीसाठी वापरले जातात.भारतीय नद्यांच्या १८६९ क्यूबिक किमी पाण्यापैकी ६९० क्यूबिक किमी पाणी उपयुक्त आहे. तर भूगर्भातील ४३२ क्यूबिक किमी पाणी उपयुक्त आहे.

जलसिंचनाचे उद्देश

    मोसमी पास असल्यामुळे इतर ॠतूत पीके घेणे
    वर्षातून एकापेक्षा जास्त पीके घेणे
    नगदी पीके घेणे
    रासायनिक खते लागू पडण्यासाठी
    दर हेक्टरी जास्त उत्पादन घेणे

जलसिंचनाचे प्रकार

विहीर जलसिंचन महाराष्ट्र्रात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या १९९५ च्या आकडेवारीनुसार ११ लाख ४३ हजार विहिरी आहेत. यापैकी सुमारे १० लाख विहिरींवर ऑईल इंजिन किंवा विद्युत पंप बसविलेले आहेत. विहिरींमधून २,५४,७१० हेक्टर मीटर पाणी उपसा करण्यासाठी उपलब्ध होते आणि दरवर्षी पावसाचे जे पाणी भूगर्भात मुरते त्याचा विचार करता ३२१८१० हेक्टर पाणी वापरासाठी मिळू शकते. महाराष्ट्र्रातील भूमिगत पाण्याच्या एकूण साठयाचा अंदाज पाहता आणखी ११ लाख ८२ हजार विहिरी खोदता येतील.

तलाव जलसिंचन महाराष्ट्र्रात तलाव जलसिंचनाचे प्रमाण १५ टक्के आहे. महाराष्ट्र्रात प्रामुख्याने विदर्भामध्ये भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयात तलावाच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जातो. या प्रदेशात तलावाद्वारा होणार्‍या जलसिंचनाचे प्रमाण सुमारे ६० टक्के आहे.

पाझर तलाव महाराष्ट्र्रामध्ये तलावांच्या साहाय्याने देखील काही प्रमाणात जलसिंचनास फायदा होतो. याचा मुख्य उपयोग प्रदेशामधील भूजल साठा वाढविणे आणि विहिरीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी होतो. महाराष्ट्र्रात १९७२ साली अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा पाझर तलावांची योजना अमलात आणली गेली. यामुळेच अवर्षणग्रस्त प्रदेशात हळूहळू जलसिंचनाचे क्षेत्र वाढू लागले. सध्या महाराष्ट्र्रात पाझर तलावांची संख्या सुमारे १४०० आहे, तर १८०० पाझर तलावांची कामे चालू आहेत. भविष्य काळात आणखी ३००० पाझर तलाव तयार होतील.

उपसा जलसिंचन विहिरी किंवा नदीच्या पात्रातून अथवा जलाशयातून उंच भागातल्या जमिनीला पाणीपुरवठयाची सोय उपलब्ध करुन द्यावयाची असेल तर हे पाणी उंचावर न्यावे लागते. यासाठी ऑईल इंजिन्स व विजेचे पंप यांचा वापर केला जातो. महाराष्ट्र्रात एकूण जलसिंचन क्षेत्रांपैकी ८टक्के क्षेत्र हे उपसा जलसिंचनाचे आहे. महाराष्ट्र्रात मुख्यत्वेकरुन दक्षिण महाराष्ट्र्रात विशेषत: कोल्हापूर जिल्हा आणि कोकणामध्ये रत्नागिरी व संधिुदुर्ग जिल्हयात उपसा जलसिंचनाद्वारे जमिनीला पाणीपुरवठा केला जातो.
उत्तर लिहिले · 23/5/2018
कर्म · 13415
0

उपसा जलसिंचन म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने, नदी, नाले, तलाव किंवा विहिरींसारख्या जलस्त्रोतांपासून पाणी उचलून सिंचनासाठी वापरणे होय. जेव्हा नैसर्गिकरित्या पाणी शेतापर्यंत पोहोचवणे शक्य नसतं, तेव्हा या पद्धतीचा वापर केला जातो.

उपसा जलसिंचनाचे फायदे:

  • पिकांसाठी पाण्याची उपलब्धता सुनिश्चित होते.
  • ज्या ठिकाणी नैसर्गिकरित्या पाणी उपलब्ध नाही, तेथे शेती करणे शक्य होते.
  • दुष्काळग्रस्त भागांसाठी वरदान ठरते.

उपसा जलसिंचनाचे तोटे:

  • यामध्ये ऊर्जा वापर जास्त असतो.
  • उपकरणे आणि स्थापनेचा खर्च अधिक असतो.
  • देखभाल आणि दुरुस्तीची गरज भासते.

उपसा जलसिंचनाचे प्रकार:

  • पंपसेटद्वारे उपसा सिंचन: यामध्ये पंपचा वापर करून पाणी उचलले जाते.
  • विद्युत मोटारचलित उपसा सिंचन: विजेच्या साहाय्याने चालणाऱ्या मोटारी वापरल्या जातात.
  • सौर ऊर्जा आधारित उपसा सिंचन: सौर ऊर्जेचा वापर करून पाणी उचलले जाते.

उपसा जलसिंचन ही एक महत्त्वाची सिंचन पद्धत आहे, जी अनेक ठिकाणी शेतीसाठी आधार ठरते.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1040

Related Questions

होज म्हणजे काय?
वॉटर शेड व्यवस्थापनाची संकल्पना व गरज स्पष्ट करा?
मोठ्या शहरांना जास्त पाण्याची गरज का असते?
वॉटरशेड व्यवस्थापनाची माहिती काय आहे?
जमिनीतील जलस्त्रोत कसे ओळखावे?
वॉटरशेड व्यवस्थापनाची संकल्पना व गरज स्पष्ट करा?
वॉटर व्यवस्थापनाची संकल्पना व गरज काय आहे?