घर सरकारी योजना गृहनिर्माण

म्हाडा काय आहे आणि त्यामध्ये घर घ्यायचे असेल, तर कसे घ्यायचे?

3 उत्तरे
3 answers

म्हाडा काय आहे आणि त्यामध्ये घर घ्यायचे असेल, तर कसे घ्यायचे?

5
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (इंग्लिश: Maharashtra Housing and Area Development Authority; प्रचलित नाव: म्हाडा) ही महाराष्ट्रराज्यातील एक सरकारी संस्था आहे. म्हाडाची स्थापना ५ डिसेंबर १९७७ रोजी महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ, विदर्भ गृहनिर्माण मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ व मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ ह्या चार सरकारी संस्थांचे विलिनीकरण करून झाली.

महाराष्ट्रातील शहरांमध्ये मध्यम् व अल्प-उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी किफायती दरांत निवाऱ्याची सोय करून देणे हे म्हाडाचे उद्दिष्ट आहे. आजवर म्हाडाने बांधलेल्या अनेक प्रकल्पांद्वारे मुंबई परिसरात हजारो घरे उपलब्ध केली गेली आहेत.

या घरांसाठी ऑनलाइन अर्ज भरायचे असतात व लकी ड्रॉ सोडत होत असते....
या साठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावा.
उत्तर लिहिले · 21/5/2018
कर्म · 123540
1
म्हाडाच्या पुणे विभागातील विविध वसाहतींतील ३,१३९ सदनिका व २९ भूखंडांच्या विक्रीसाठी संकेतस्थळावर अर्जदारांच्या नोंदणीला शनिवारपासून प्रारंभ झाला. १८ जून रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. नोंदणी केलेल्या अर्जदारांना आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी २० मे रोजी दुपारी २ ते १९ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. आय. टी. इनक्युबेशन सेंटर, नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे येथे ३० जून रोजी सकाळी १० वाजता संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.



अर्ज करण्यासाठी पुणे मंडळातर्फे यंदा प्रथमच अर्जदारांना एनइएफटी/आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. एनइएफटी/आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी २० मे दुपारी २ ते १९ जून रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत कालावधी असणार आहे. डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंगद्वारे अनामत रक्कम २० मे रोजी दुपारी २ ते २० जून रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत स्वीकारली जाणार आहे. यंदाच्या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटाकरिताच्या सदनिकांचा समावेश आहे. अत्यल्प उत्पन्न गटाकरिता १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीमध्ये असलेले अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न (पती + पत्नी यांचे एकत्रित उत्पन्न) २५,००० रुपयापर्यंत असावे. अल्प उत्पन्न गटाकरिता २५ हजार १ ते ५० हजारापर्यंत व मध्यम उत्पन्न गटाकरिता ५० हजार १ ते ७५ हजारापर्यंत, तर उच्च उत्पन्न गटाकरिता अर्जदाराचे ७५ हजार १ वा त्यापेक्षा जास्त सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.
आॅनलाइन अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम (परतावा) + अर्ज शुल्क (विना परतावा) अत्यल्प उत्पन्न गटाकरिता ५ हजार ४४८ प्रति अर्ज, अल्प उत्पन्न गटाकरिता १० हजार ४४८ प्रति अर्ज, मध्यम उत्पन्न गटाकरिता १५ हजार ४४८ प्रति अर्ज, उच्च उत्पन्न गटाकरिता २० हजार ४४८ प्रति अर्ज आकारली जाणार आहे. यामध्ये आॅनलाईन अर्जापोटी प्रतिअर्ज ४४८ (विना परतावा) अर्ज शुल्काचा समावेश आहे.

उपलब्ध घरांचा तपशील
यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी सेक्टर ५ ए-ब, नांदेड सिटी (सिंहगड रोड, नांदेड गाव, पुणे) व महाळुंगे टप्पा-१ (चाकण-तळेगाव रोड, चाकण एमआयडीसीसमोर, ता. खेड, जि. पुणे) येथील एकूण ४४९ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.
अल्प उत्पन्न गटाकरिता महाळुंगे टप्पा-२ (चाकण-तळेगाव रोड, चाकण एमआयडीसीसमोर, ता. खेड, जि. पुणे) गोपाळपूर (ता. पंढरपूर, जि. सोलापूर), मोरेवाडी (कोल्हापूर), बार्शी (जि. सोलापूर), विजापूर रोड (जि. सोलापूर), तळेगाव दाभाडे (पुणे), सदर बाजार (सातारा), सासवड(ता. पुरंदर, जि. पुणे), दिवे (ता. पुरंदर, जि. पुणे), हडपसर (पुणे), रावेत (पुणे), नांदेड सिटी (सिंहगड रोड, नांदेड गाव, पुणे), चिखली-मोशी (पुणे), पिंपरी (पुणे), चिखली, चºहोली बु., कात्रज, धानोरी, आळंदी रोड, वाकड, येवलेवाडी (ता. हवेली, जि. पुणे), मौजे वडमुखवाडी, शिवाजीनगर (सोलापूर), डुडुळगाव येथील २,४०४ सदनिकांचा समावेश आहे.

मध्यम उत्पन्न गटाकरिता सुभाषनगर (कोल्हापूर), सासवड, खराडी, शिवाजीनगर (जि. सोलापूर), विजापूर रोड (जि. सोलापूर), पिंपरी, महाळुंगे टप्पा-१ (चाकण-तळेगाव रोड, चाकण एमआयडीसीसमोर, ता. खेड, जि. पुणे) येथील एकूण २८२ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे, तर उच्च उत्पन्न गटाकरिता पिंपरी (पुणे) येथील एकूण ४ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.
अल्प उत्पन्न गटाकरिता क्षेत्र माहुली (जि. सातारा) बार्शी (जि. सोलापूर), भोर (जि. पुणे), दहिवडी (ता. माण, जि. सातारा), बनवडी (ता. कराड, जि. सातारा), शिरवळ (ता. खंडाळा, जि. सातारा), अक्कलकोट (जि. सोलापूर), वाठार निंबाळकर (ता. फलटण, जि. सातारा) येथील भूखंडांचा सोडतीत समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता बार्शी (जि. सोलापूर), क्षेत्र माहुली (जि. सातारा), दहिवडी (ता. माण, जि. सातारा), तर उच्च उत्पन्न गटाकरिता वाठार निंबाळकर (ता. फलटण, जि. सातारा) येथील भूखंडांचा सोडतीत समावेश आहे.

उत्तर लिहिले · 21/5/2018
कर्म · 13435
0
मी तुम्हाला म्हाडा (MHADA) विषयी माहिती देऊ शकेन आणि त्यामध्ये घर कसे घ्यावे हे देखील सांगू शकेन.

MHADA म्हणजे काय?

MHADA म्हणजे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (Maharashtra Housing and Area Development Authority). ही महाराष्ट्र सरकारची संस्था आहे.

उद्देश:

  • राज्यात परवडणारी घरे उपलब्ध करणे.
  • शहरी भागांचा विकास करणे.
  • बेघर लोकांना घरे पुरवणे.

म्हाडामध्ये घर कसे घ्यावे?

  1. नोंदणी: म्हाडाच्या वेबसाइटवर (mahadahousing. মহারাষ্ট্র.gov.in) जाऊन तुम्हाला नोंदणी करावी लागेल.
  2. अर्ज भरणे: जाहिरात প্রকাশিত झाल्यानंतर, तुम्ही ऑनलाइन अर्ज भरू शकता.
  3. lottery प्रक्रिया: अर्जदारांमधून lottery पद्धतीने विजेत्यांची निवड केली जाते.
  4. कागदपत्रे: निवड झाल्यानंतर, तुम्हाला आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात.
  5. घराची किंमत आणि हप्ता: घराची किंमत आणि हप्ता तुमच्या उत्पन्नानुसार निश्चित केला जातो.

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
  • अधिवास प्रमाणपत्र (Domicile certificate)

टीप:

म्हाडाच्या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता. MHADA Website

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 5060

Related Questions

घरकुल योजनेतील चेक काढण्यासाठी इंजिनियर पैसे घेतात का?
प्रधानमंत्री आवास स्वयं सर्वे करण्याची तारीख ३१ जुलै ही शेवटची तारीख होती, तरी काही तारीख वाढण्याची अपेक्षा असू शकते का, किंवा वाढली आहे का?
माझे लग्न झालेले नाही आणि आता मला वाटतं आता होणारच नाही, तर मी माझ्या परिवारामध्ये मी एकटाच आहे आणि काम करून पोट भरत आहे, तर मला घरकुल लाभ मिळू शकतो का?
लग्न झालेल्यांनाच घरकुल लाभार्थी म्हणून निवडले जाते, असा काही नियम आहे का?
आवास प्लस 2024 घरकुल सर्वेक्षणासाठी सविस्तर माहिती?
घराचे बांधकाम देताना पैसे देण्याचे टप्पे कसे करावे, ५,७५,००० रुपयांचे?
माझं घरकुल मध्ये नाव आलेलं आहे, तरी माझ्या वडिलांच्या नावे जागेचा आठ अ असून त्यावर मी माझे घरकुल बांधकाम करू शकतो का?