व्यक्तिमत्व सामाजिक विचारवंत इतिहास

ताराबाई शिंदे बद्दल माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

ताराबाई शिंदे बद्दल माहिती मिळेल का?

8
ताराबाई शिंदे (१८५० - १९१०)

ह्या महाराष्ट्रातील एक स्त्रीवादी लेखिका व सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या होत.

१८८२ साली प्रसिद्ध झालेल्या स्त्री-पुरुष तुलनाया पुस्तकाच्या त्या लेखिका होत.

ताराबाई ह्या बुलढाणा येथील रहिवासी होत्या. त्यांचे वडील बापुजी हरी शिंदे हे एक जमीनदार होते. ते सत्यशोधक समाजाचे सभासद होते.

ताराबाई शिंदे यांचे भाऊ, रामचंद्र हरी शिंदे जोतिबांच्या कॉन्ट्रक्टिंग कंपनीत भागीदार होते. त्यामुळे ताराबाईंच्या घरात सुरुवातीपासूनच स्त्री-पुरुष समानतेचे वातावरण होते. 

ताराबाईंनी आपल्या पुस्तकात विधवा-विवाहास उच्च वर्णीयांनी केलेली मनाई, केशवपनासारख्या दुष्ट रूढी, तसेच पुरुषांना अनेक लग्न करण्याची असलेली मुभा या सर्व प्रश्नांवर टीका केलेली दिसते.

तत्कालीन महाराष्ट्रातील स्त्री समाजसुधारक म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थिती देखील सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात योगदान दिले.त्यानी स्त्री यांच्या शोषणा विरोधात दिलेला लढा हा सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेस चालना देणारा होता

उत्तर लिहिले · 19/5/2018
कर्म · 123540
0

ताराबाई शिंदे ह्या एकोणिसाव्या शतकातील भारतीय स्त्रीवादी कार्यकर्त्या होत्या. त्यांचा जन्म 1850 मध्ये महाराष्ट्रातील बुलढाणा येथे झाला.

स्त्री पुरुष तुलना या त्यांच्या प्रसिद्धpublications पैकी एक आहे, जे 1882 मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकात त्यांनी पितृसत्ताक सामाजिक norms वर कठोर टीका केली आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी आवाज उठवला.

ताराबाई शिंदे यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचे महत्त्व सांगितले आणि विधवांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. त्यांनी जातीय भेदभावाला विरोध केला आणि समाजातील दुर्बळ घटकांच्या हक्कांसाठी त्या लढल्या.

ताराबाई शिंदे यांचे कार्य आजही स्त्रियांना प्रेरणा देत आहे आणि त्यांचे विचार आजही relevant आहेत.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 980

Related Questions

कॅम्टची समाजशास्त्राची विभागणी स्पष्ट करा?
कॉम्टची समाजशास्त्राची विभागणी स्पष्ट करा?
मॅक्स वेबरचे वर्गीकरण थोडक्यात लिहा?
समाजशास्त्र जनक ... यांना मानले जाते?
समाजशास्त्र ही संकल्पना सर्वप्रथम कोणी वापरली?
खालीलपैकी समाज उत्पत्तीच्या सेंद्रिय सिद्धांताचे समर्थक कोण आहेत? कुले स्पेन्सर ऑगस्ट कॉम्ट सिमेल?
हॅरी जॉन्सन यांची समाजाची कोणती वैशिष्ट्ये उल्लेखनीय आहेत?