2 उत्तरे
2 answers

अधिक महिना कशावरून ठरवला जातो?

11
पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे, सूर्य हा बारा राशींमधून प्रवास करत कालचक्राचे एक वर्ष पूर्ण करतो असे भासते, त्यास ३६५ दिवस, ५ तास ४८ मिनिटे आणि साडे ४७ सेकंद लागतात. त्या काळात इंग्रजी(ग्रेगरी) कॅलेंडरवरचे बारा महिने पूर्ण होतात. मात्र, चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले १२ हिंदू चांद्र मास(महिने) मात्र ३५४ दिवसातच म्हणजे ११ दिवस आधीच पूर्ण होतात. महाराष्ट्र. गुजरात, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील चांद्र मास हे अमान्त (अमावस्येला संपणारे) असतात. उत्तरेला ते पौर्णिमान्त असतात. ज्या हिंदू मासात सूर्य एकाही राशीचे संक्रमण करीत नाही, (रास बदलत नाही) तो अधिक मास होय. सौर मास व चांद्र मास यांची सांगड घालण्यासाठी व या अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिक मासाची व क्षय मासाची योजना करण्यात आलेली आहे. तीन वर्षांत होणारा ३३ दिवसांचा फरक क्षय मास वा अधिक मास टाकून, ही कालगणना सूर्याधारित सौर वर्षाशी जुळवून घेण्यात येते.

सूर्याधरित पंचांग पाळणाऱ्या आसाम, ओरिसा, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांत अधिक महिना नसतो, तो फक्त चांद्र पंचांग वापरणाऱ्या आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशांसारख्या राज्यांत पाळला जातो.

रापासून आश्विन महिन्यांपर्यंतच्या कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. कारण या महिन्यांतच सूर्याची गती मंद असते, व त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जास्त वेळ लागतो. क्वचित कार्तिक वा फाल्गुन महिन्यातही अधिक मास येतो, पण मार्गशीर्ष, पौष आणि माघ या महिन्यांत अधिक मास कधीही येत नाही. त्या वर्षी एकाच नावाचे दोन चांद्र महिने असतात, अगोदरचा अधिक महिना आणि नंतर लगेच येणारा महिना हा निजमास. एखादा विशिष्ट महिना अधिक मास आला की १९ वर्षांनंतर तोच महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो.

केव्हाकेव्हा एकाच चांद्रमासात सूर्याच्या दोन संक्रांती येतात, म्हणजे सूर्य दोनदा रास बदलतो. अश्यावेळी क्षयमास येतो.

■स्पष्टीकरण

चांद्र वर्ष आणि सूर्य वर्ष यांच्यात मेळ घालण्याच्या उद्देशाने, पंचांगकर्त्यांनी कालगणनेसाठी जरी चंद्राचे भ्रमण प्रमाण मानले तरी महिन्यांची नावे मात्र सूर्याच्या भ्रमणाप्रमाणे ठेवली. म्हणजे मीनेत सूर्य असताना जेव्हा अमावास्या येऊन संपेल तेव्हा चैत्र महिन्याला सुरुवात होईल. मेषेत सूर्य असताना आलेल्या अमावास्येनंतर वैशाख सुरू होतो, वगैरे. एका महिन्यात सूर्य साधारणपणे एक महिना राहतो. साधारण १४ ते १७ तारखेला तो रास बदलतो. एका अमावास्येला सूर्य ज्या राशीत असतो, त्याच्या पुढच्या राशीत तो नंतरच्या अमावास्येला असतो. मात्र साधारण तीन वर्षांनी एक अशी अवस्था येते की एका अमावास्येला सूर्य ज्या राशीत असेल त्याच राशीत तो पुढच्या अमावस्येलाही असतो. नियमाप्रमाणे सूर्य अमावास्येला ज्या राशीत असेल त्या राशीप्रमाणे त्या महिन्याला नाव दिले जाते. पण दोन लागोपाठच्या अमावास्यांना सूर्य एकाच राशीत असेल तर, म्हणजे सूर्य रासच बदलत नसेल तर तर त्या दुसऱ्या अमावास्येनंतर सुरू होणाऱ्या महिन्याला नाव काय द्यायचे? अशा वेळी नाव 'रिपीट' करण्यात येते.

ज्या चांद्र महिन्यात सूर्याचे एका राशीतून पुढच्या राशीत संक्रमण होत नाही, तो महिना अधिक महिना मानतात आणि त्यानंतरचा निज महिना. याच नियमाने ज्या चांद्र महिन्यात सूर्य दोन राशींनी पुढे सरकतो, त्या महिन्याला क्षयमास म्हणतात.

पौर्णिमेला महिना संपतो अशा पद्धतीच्या पंचांगात निजमासाच्या एका (कृष्ण) पक्षानंतर अधिक मासाचे दोन पक्ष येतात, आणि त्यानंतर निजमासाचा शुक्ल पक्ष (दुसरा पंधरवडा). त्या पंचांगातला अधिक मास आणि अमान्त पद्धतीच्या पंचांगातील अधिक मास एकाच वेळी असतात.

हिंदू पंचांगातल्या प्रत्येक महिन्यात दोन (वा अधिक) एकादश्या असतात; त्यांतल्या २४ एकादशींपैकी प्रत्येकीला स्वतंत्र नाव असते. अधिक महिन्यात येणाऱ्या दोनही एकादश्यांना 'कमला एकादशी' हेच नाव असते.

■वेगवेगळी नावे

अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मल मास, संसर्प मास, धोंड्याचा महिना असेही म्हणतात.

■अधिक मासाबद्दल विशेष माहिती

दोन अधिक मासांत जास्तीत जास्त ३५ महिन्यांचे आणि कमीतकमी २७ महिन्यांचे अंतर असते. मार्गशीर्ष, पौष आणि माघ हे कधीही अधिक महिने असत नाहीत. अधिक मास जुलै ते ऑक्टोबर या महिन्यांतच येतो. त्या महिन्यांत सूर्याची गती किंचित मंद असते.

★कोणता अधिक मास केव्हा येतो?(अविश्वसनीय माहिती)

शकसंख्येतून १६६६ वजा करून येणाऱ्या उत्तराला १९ने भागावे. बाकी ३ उरल्यास चैत्र, ११ उरल्यास वैशाख, १० उरल्यास ज्येष्ठ, ८ उरल्यास अाषाढ, १६ उरल्यास श्रावण, १३ किंवा ५ उरल्यास भाद्रपद आणि २ उरल्यास आश्विन महिना हा अधिकमास असतो, असे मकरंद ग्रंथात सांगितले आहे.

काहींच्या मते :- शकसंख्येतून ९२८ वजा करून मिळालेल्या उत्तराला १६ने भागितल्यावर जर ९ बाकी उरली तर चैत्र, शून्य उरली तर वैशाख, ११ उरली तर ज्येष्ठ, ६ उरली तर अाषाढ, ५ उरली तर श्रावण, १३ असेल तर भाद्रपद आणि २ उरली तर आश्विन महिना हा अधिकमास असतो●

◆*'येथे' आहे भगवान पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर; अधिक मासात आहे अनन्यसाधारण महत्व*

माजलगाव (बीड ) : संपुर्ण भारतात भगवान पुरूषोत्तमाचे एकमेव मंदीर तालुक्यातील क्षेत्र पुरूषोत्तमपुरी येथे आहे. अधिक मासात येथे प्रसिद्ध यात्रा भरते,  बुधवारपासून (दि.१६ ) सुरू होणाऱ्या या यात्रेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. महिनाभर चालणाऱ्या या यात्रेत संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात.

पुरूषोत्तम मास अर्थात धोंड्याचा महिना. या महिन्याला हिंदू धर्मात असाधारण महत्व असते. या महिन्यात श्रीक्षेत्र पुरूषोत्तमपुरी येथे अधिकमास उत्सव यात्रा भरते. या पर्वकाळात महाराष्ट्रासह परराज्यातून लाखो भाविक येथे दाखल होतात. गोदावरी काठावर वसलेले हे पुरूषोत्तमपुरी गाव राष्ट्रीय महामार्ग क्र- ६१ वर माजलगाव - गेवराई दरम्यानच्या सारवरगावपासून १० कि.मी.

अंतरावर आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या या पर्वकाळात येथे लाखो भाविक येतात. यावर्षी १६ मे ते १३ जूनपर्यंत ही यात्रा भरणार आहे. याची जय्यत तयारी ग्रामस्थांनी केली आहे.

१५०० वर्षांपूर्वीचे आहे मंदिर 

पवित्र पापनाशिनी गोदावरी तटावर पुरूषोत्तमाचे हे हेमाडपंथी मंदीर असून या मंदीराचे बांधकाम सुमारे १५०० वर्षापुर्वी झाल्याचे शिलालेख येथे आहे. या मंदीराचा कळस व बांधणी हे केदारनाथ मंदीर (उत्तराखंड) पध्दतीचे आहे व शेजारीच वरदविनायक, सहलक्षेश्वर महादेव, पार्वती पादुका मंदीर आहे व ही दोन्ही मंदीर जुनी असल्याचे दिसते. वरदविनायक मंदीर हे वृंदावनातील कृष्णमंदीराची प्रतिकृती असल्याचे दिसते. मुख्य पुरूषोत्तम मंदीरातील पुरूषोत्तमाची मुर्ती ही गंडळी शिलेची असून ती स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. चतुर्थभुजाधारी पुरूषोत्तमाच्या हातात शंख, चक्र, पद्म असून मुर्ती मनमोहक अशी आहे. हे मंदीर स्थापत्य कलेचा आदर्श नमुना असून मंदीराच्या विटा या पाण्यावर तरंगतात व मंदीरातल्या गरुडध्वजा पंढरपुर येथील मंदिराची आठवण करून देतात.

◆'पुरुषोत्तम' तेराव्या महिन्याचा स्वामी 

भारतीय संस्कृतीत धोंड्याच्या महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे. या महिन्यात पुरूषोत्तमाला सोन्याचे, चांदीचे, पुरणाचे, पेठ्याचे धोंडे अर्पण करण्याची प्रथा आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या या अधिक मासाचे वर्णन धोंडे महाल या ग्रंथात असून बारा महिन्याचे बारा स्वामी असतात. परंतू उरी-सुरीच्या तेराव्या महिन्याचा स्वामी कोण होणार ? या वरून पुरूषोत्तमाने हे स्वामीत्व स्वीकारले व तेव्हापासून या महिन्याला 'पुरूषोत्तम मास' हे नाव पडल्याचा उल्लेख आढळतो. या महिन्यात जावयांना पुरणाचे धोंडे खावू घालण्याची प्रथा ही महाराष्ट्रातील घराघरात जोपासली जाते. अधिकमासात सौभाग्यवती स्त्रिया येथे गोदावरीत स्नान करून पतीच्या समृध्दी व दीर्घायुष्यासाठी पुरूषोत्तमाला ३३ धोंडे अर्पण करतात व सुखाची कामना करतात. त्यामुळे या महिन्यात राज्यातून अनेक महिला या यात्रेत सहभागी होत असतात.
उत्तर लिहिले · 19/5/2018
कर्म · 123540
0

अधिक महिना (Adhik Maas) हा भारतीय पंचांगानुसार ठरवला जातो. तो खालील गोष्टींवर आधारित असतो:

  • सौर वर्ष आणि चांद्र वर्ष: सौर वर्ष म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला लागणारा वेळ. चांद्र वर्ष म्हणजे चंद्राला पृथ्वीभोवती बारा फेऱ्या पूर्ण करायला लागणारा वेळ. सौर वर्ष ३६५ दिवसांचे असते, तर चांद्र वर्ष सुमारे ३५४ दिवसांचे असते. या दोन वर्षांमध्ये सुमारे ११ दिवसांचा फरक असतो.
  • फरक भरून काढणे: दरवर्षी ११ दिवसांचा फरक साठत जातो आणि तो जवळपास ३२ महिन्यांनी १ महिन्याइतका होतो. हा फरक भरून काढण्यासाठी पंचांगामध्ये एक महिना वाढवला जातो, त्याला अधिक महिना म्हणतात. यामुळे চান्द्रcalendar आणि सौर calendar जुळतात.
  • गणना: अधिक महिना येण्याची वेळ गणितीय पद्धतीने निश्चित केली जाते. जेव्हा दोन अमावस्यांच्या मध्ये सूर्य संक्रमण (एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे) होत नाही, तेव्हा अधिक महिना येतो.

अधिक महिना हा চান्द्रcalendarवर आधारित आहे, जो भारतीय संस्कृतीत धार्मिक कार्यांसाठी महत्त्वाचा मानला जातो.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1640

Related Questions

तिथी म्हणजे काय?
दिवसांत किती प्रहर व कोणते?
भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेचा पहिला महिना कोणता येतो?
वारांचा क्रम ‘सोमवार ते रविवार’ असा का आहे?
मला सोमवारचा कार्ड आहे का?
आपण वापरतो ती दिनदर्शिका कशावर आधारलेली असते?
आपण वापरतो ती दिनदर्शिका वर आधारलेली असते?