
पंचांग
0
Answer link
दिवसाचे आठ प्रहर असतात. हे प्रहर खालीलप्रमाणे:
- पहिले प्रहर: पहाट (सकाळ)
- दुसरे प्रहर: पूर्वान्ह (दुपार)
- तिसरे प्रहर: मध्यान्ह (ভর দুপুর)
- चौथे प्रहर: अपराह्न (दुपार नंतर)
- पाचवे प्रहर: सायंकाळ (संध्याकाळ)
- सहावे प्रहर: प्रदोष (संध्याकाळ नंतर)
- सातवे प्रहर: निशीथ (मध्यरात्री)
- आठवे प्रहर: उषा (पहाटे)
1
Answer link
भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेचा पहिला महिना
१ चैत्र,
शके १८७९ रोजी म्हणजे २२ मार्च, १९५७ पासून सुरुवात झाली.
परंतु भारत सरकारच्या भरपूर प्रचारानंतरही ही दिनदर्शिका लोकप्रिय होऊ शकली नाही.
भारतीय राष्ट्रीय वर्षातले पहिले सहा महिने ३१ दिवसांचे असतात, तर इतर महिने प्रत्येकी ३० दिवसांचे असतात.
इंग्रजी प्रमाणे मराठी चे 12 महिने आहेत
चैत्र | वैशाख | ज्येष्ठ | आषाढ़ | श्रावण | भाद्रपद | आश्विन | कार्तिक | मार्गशीष | पौष | माघ | फाल्गुन
2
Answer link
वारांचा क्रम ‘सोमवार ते रविवार’ असा का आहे ?
‘वार हा शब्द ‘होरा’ या शब्दापासून झाला आहे. होरा म्हणजे ‘अहोरात्र.’ याचा अर्थ ‘सूर्योदयापासून दुसर्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत’, असा आहे. होरा म्हणजे घंटा. अहोरात्र म्हणजे २४ घंटे. प्रत्येक होरा एकेका ग्रहाचा असतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सूर्योदयाच्या वेळी ज्या ग्रहाचा होरा असतो, त्याचे नाव त्या दिवशीच्या वाराला दिलेले आहे. वाराचा प्रारंभ सूर्योदयी होतो.
१. वारांचा क्रम ठराविक असण्याचे कारण
‘मंदात् शीघ्रपर्यंतम् होरेशा:’ याचा अर्थ मंद गतीच्या ग्रहापासून शीघ्र गतीच्या ग्रहापर्यंत होरे चालू असतात. पृथ्वीच्या अंतर्कक्षेमधील बुध आणि शुक्र ग्रह यांची भ्रमणगती अधिक आहे. पृथ्वीच्या बाह्य कक्षेतील ग्रह जसजसे दूर आहेत, तसतशी त्यांची गती मंद होत जात असल्याने त्यांना ‘मंद ग्रह’ म्हणतात, उदा. शनि या मंद ग्रहाला एका राशीचे भ्रमण पूर्ण करण्यास अडीच वर्षाचा कालावधी लागतो. चंद्र (सोम) या शीघ्र ग्रहाला एका राशीचे भ्रमण पूर्ण करण्यास सव्वा दोन दिवसांचा कालावधी लागतो. ग्रहाच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीवरून त्याचे राशीतील भ्रमण समजते.
२. मंद ग्रह ते शीघ्र ग्रह यांचा क्रम
शनि, गुरु, मंगळ, रवि, शुक्र, बुध, चंद्र (सोम), उदा. शनिवारी पहिला होरा (घंटा) शनि या ग्रहाचा, दुसरा गुरु, तिसरा मंगळ, चौथा रवि, पाचवा शुक्र, सहावा बुध, सातवा चंद्र या ग्रहाचा असतो. याप्रमाणे तीन वेळा, म्हणजे २१ होरे (तास) झाल्यावर २२ वा पुन्हा शनीचा, २३ वा गुरुचा आणि २४ वा मंगळाचा, असे २४ घंटे पूर्ण झाल्यानंतर दुसर्या दिवशी सूर्योदय होतो, तो पुढील होर्याने. यानुसार शनिवारनंतर रविवार येतो.
३. होरा कोष्टक
पंचांगात होरा कोष्टक दिलेले असते; परंतु पंचांग नसल्यास वरील नियमाप्रमाणे होरा लक्षात रहाण्यास सुलभ जाते. पंचांगातील होरा कोष्टक पुढीलप्रमाणे आहे.
घंटे (टीप) रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार
१ रवि चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनि
२ शुक्र शनि रवि चंद्र मंगळ बुध गुरु
३ बुध गुरु शुक्र शनि रवि चंद्र मंगळ
४ चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनि रवि
५ शनि रवि चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र
६ गुरु शुक्र शनि रवि चंद्र मंगळ बुध
७ मंगळ बुध गुरु शुक्र शनि रवि चंद्र
८ रवि चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनि
९ शुक्र शनि रवि चंद्र मंगळ मंगळ गुरु
१० बुध गुरु शुक्र शनि रवि चंद्र मंगळ
११ चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनि रवि
१२ शनि रवि चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र
१३ गुरु शुक्र शनि रवि चंद्र मंगळ बुध
१४ मंगळ बुध गुरु शुक्र शनि रवि चंद्र
१५ रवि चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनि
१६ शुक्र शनि रवि चंद्र मंगळ बुध गुरु
१७ बुध गुरु शुक्र शनि रवि चंद्र मंगळ
१८ चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनि रवि
१९ शनि रवि चंद्र मंगळ बुध बुध शुक्र
२० गुरु शुक्र शनि रवि चंद्र मंगळ बुध
२१ मंगळ बुध गुरु शुक्र शनि रवि चंद्र
२२ रवि चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनि
२३ शुक्र शनि रवि चंद्र मंगळ बुध गुरु
२४ बुध गुरु शुक्र शनि रवि चंद्र मंगळ
टीप : सूर्योदयापासून घंटे
४. होर्यांनुसार करावयाची कृत्ये
होरा कृत्ये
१. रवि राजसेवा आणि औषध घेणे
२. चंद्र सर्व कार्ये
३. मंगळ युद्ध आणि वादविवाद
४. बुध ज्ञानार्जन
५. गुरु मंगलकार्य
६. शुक्र प्रयाण
७. शनि द्रव्यसंग्रह करणे
प्रत्येक होर्यात ठराविक कृत्ये केल्यास त्याचा लाभ होतो.
–
0
Answer link
तुमच्या प्रश्नाचा अर्थ स्पष्ट होत नाही आहे. कृपया तुमचा प्रश्न अधिक स्पष्टपणे विचाराल का? उदाहरणार्थ, तुम्हाला सोमवारच्या सुट्टीबद्दल माहिती हवी आहे की आणखी काही?
उदाहरणार्थ:
- सोमवारी बँकेत सुट्टी आहे का?
- मला सोमवारपर्यंत अर्ज करायचा आहे, अंतिम तारीख काय आहे?
अशा प्रकारे प्रश्न विचारल्यास मी तुम्हाला योग्य माहिती देऊ शकेन.
0
Answer link
येथे एक HTML स्वरूपात उत्तर आहे:
आपण वापरतो ती दिनदर्शिका ग्रेगोरियन दिनदर्शिका (Gregorian calendar) आहे. ही दिनदर्शिका खालील गोष्टींवर आधारलेली आहे:
- पृथ्वी सूर्याभोवती फिरते: पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला सुमारे 365.24 दिवस लागतात.
- लीप वर्ष: दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात एक दिवस वाढवला जातो (लीप वर्ष), ज्यामुळे वर्षाची सरासरी लांबी 365.25 दिवसांपर्यंत वाढते.
- ग्रेगोरियन सुधारणा: ज्युलियन दिनदर्शिकेतील त्रुटी सुधारण्यासाठी 1582 मध्ये पोप ग्रेगरी XIII यांनी ही दिनदर्शिका लागू केली.
ग्रेगोरियन दिनदर्शिका ही सौर दिनदर्शिका आहे, जी पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणावर आधारित आहे.
5
Answer link
भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका ही भारत सरकारकडून पुरस्कृत भारताची अधिकृत राष्ट्रीय दिनदर्शिका आहे. भारतीय राजपत्र, भारतीय आकाशवाणीने प्रसारित केलेल्या बातम्या, भारतीय संसदेच्या कामात हिचा वापर केला जातो.
भारताबरोबरच जावा व बाली येथील इंडोनेशियन हिंदू हिचा वापर करतात.
नेपाळ मधील नेपाळ संवत या दिनदर्शिकेची निर्मिती भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेपासूनच झाली आहे.
राष्ट्रीय दिनदर्शिका ही भौतिकशास्त्रज्ञ डॉ. मेघनाथ साहा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचविलेली आणि २२ मार्च १९५७ रोजी केंद्र सरकारने अधिकृतरित्या स्वीकारलेली दिनदर्शिका आहे.
भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका ही खगोलशास्त्रावर आधारित असून ऋतुचक्र, भौगोलिक परिस्थिती इत्यादी अनेक घटकांचा सखोल विचार करून तयार करण्यात आली आहे.
