3 उत्तरे
3
answers
महाराष्ट्र बँकेत खाते काढायचे असल्यास काय काय कागदपत्रे लागतील?
5
Answer link
बँकेतून अकाउंट उघडण्याचा फॉर्म घेऊन त्यात विचारलेली सर्व माहिती भरा. अकाउंट उघडण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे बँकेला द्या. तुम्ही भरलेल्या माहितीने व तुम्ही दिलेल्या कागदपत्राने बँकेचे समाधान झाले तर बँक तुम्हाला अकाउंट उघडायला परवानगी देईल. त्याप्रमाणे आवश्यक तेवढ्या रकमेने तुम्ही अकाउंट उघडू शकता.
3
Answer link
बँकेतून अकाउंट ओपनिंगचा फॉर्म घेऊन या. त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरा. आधार कार्ड, पॅन कार्ड, असेल तर वोटिंग कार्ड लागेल, 2 पासपोर्ट साईजचे फोटो लागतील. तुम्हाला ज्या ब्रँचला अकाउंट ओपन करायचे आहे, त्या ठिकाणचे तुम्ही कायमचे रहिवासी नसाल, तर तुमच्या घर मालकाकडून तुम्हाला 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर त्यांची सही घेऊन ते बँकेमध्ये जमा करावे लागतील. धन्यवाद!🙏
0
Answer link
महाराष्ट्र बँकेत खाते काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत:
ओळखीचा पुरावा (Proof of Identity): (खालीलपैकी कोणताही एक)
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड
पत्त्याचा पुरावा (Proof of Address): (खालीलपैकी कोणताही एक)
- आधार कार्ड
- पासपोर्ट
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड
- लाईट बिल
- टेलिफोन बिल
- बँक स्टेटमेंट (Bank Statement)
इतर कागदपत्रे:
- नवीनतम पासपोर्ट साईझ फोटो
- केवायसी (KYC) फॉर्म
टीप:
तुम्ही बँकेत खाते उघडायला जाण्यापूर्वी बँकेच्या शाखेशी संपर्क साधून खात्री करून घ्यावी, कारण नियमांनुसार कागदपत्रांमध्ये बदल होऊ शकतात.
अधिक माहितीसाठी, आपण बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता: बँक ऑफ महाराष्ट्र