3 उत्तरे
3
answers
अंधश्रद्धा म्हणजे काय?
3
Answer link
अंधश्रद्धा….
या विषयावर लिहावं की नाही?
विचारच पडतो.
तार्किक दृष्ट्या विचार करून उत्तर लिहीलं तरी अंधश्रध्देला विरोध म्हणजे धर्माला विरोध असं समिकरणच झालंय.
तरीही…
अंधश्रध्दा म्हणजे काय?
तर,
एखाद्या परंपरागत चालत आलेल्या गोष्टीवर खात्री न करून घेता,तर्क-वितर्क बाजुला ठेवून आंधळेपणाने ठेवलेला विश्वास म्हणजे अंधश्रद्धा.
बुवाबाजी, चमत्कार, जादूटोणा, नरबळी, यांसारख्या थोतांडांवर विश्र्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा.
जगणं एकविसाव्या शतकात पण मन मात्र सोळाव्या शतकात असणे म्हणजे अंधश्रद्धा.
2
Answer link
अंधश्रध्दा म्हणजे तरी काय असतं?त्या कशा निर्माण होतात?परिसरात एखादी घटना घडते?ती घटना का घडते याचं कारण शोधण्याचा माणूस प्रयत्न करतो.अर्थात त्या काळात जेवढं ञान उपलब्ध असेल,त्याच्या आधारावर तो ती कारणमीमांसा शोधतो,अनेकदा ही कारणमीमांसा अपु-या ञानामुळे पूर्णतः चुकीची असते.
अशी चुकीची कारणमीमांसा म्हणजेच अंधश्रध्दा,उदाहरणार्थ माणसांच्या अंगात येत हे खरं आहे.फक्त भूत येत ही त्याची कारणमीमांसा अंधश्रध्दा आहे.
जी गोष्ट मुळात खरी नसतानाही तिच्यावर विश्वास ठवणे,ती मानणे म्हणजे अंधश्रध्दा ,अंधश्रध्दा केवळ अञान नाही तर ती प्रक्रिया आहे.म्हणूनच देवा-ध्रर्माशी तिचं नातं एवढं सरळ आणि सोपं नाही. वैज्ञानिक दृष्टीकोणस्तरावर सिद्ध करण्यास असमर्थ असणारी गोष्ट म्हणजे अंधश्रद्धा" !

0
Answer link
अंधश्रद्धा म्हणजे कोणताही पुरावा नसताना किंवा तर्कसंगत विचार न करता काही विशिष्ट गोष्टींवर विश्वास ठेवणे.
अंधश्रद्धा अनेक प्रकारच्या असू शकतात, जसे:
- दैवी शक्ती: देव, भूत, आत्मा यांसारख्या गोष्टींवर कोणताही पुरावा नसताना विश्वास ठेवणे.
- शकुन-अपशकुन: काही विशिष्ट घटना किंवा वस्तू शुभ किंवा अशुभ मानणे.
- जादूटोणा: मंत्र-तंत्राच्या साहाय्याने भविष्य बदलता येते किंवा लोकांना हानी पोहोचवता येते, असा विश्वास ठेवणे.
- ज्योतिष: ग्रह-तारे यांच्या स्थितीवरून भविष्य आणि व्यक्तीचे स्वभाव ठरवणे.
अंधश्रद्धा समाजात अनेक समस्या निर्माण करू शकतात. यामुळे लोकांचे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषण होऊ शकते. अंधश्रद्धेमुळे योग्य वेळी योग्य उपचार न घेतल्याने जीवघेणे आजार बळावू शकतात.
अंधश्रद्धाळू लोकांचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. समाजात जागृती निर्माण करणे आणि लोकांना तर्कसंगत विचार करण्यास प्रवृत्त करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी, आपण खालील साइटला भेट देऊ शकता: