राजकारण मुख्यमंत्री इतिहास

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?

3 उत्तरे
3 answers

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?

8
*💁‍♂ 'आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार' यशवंतराव चव्हाण*


⚡ आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 35 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांची भरीव कामगिरी जाणून घेऊया...

📍 महाराष्ट्रातील राजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे आणि समतोल व जातिभेदरहीत राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे.

*📚 ग्रंथसंपदा :* आपले नवे मुंबई राज्य, ॠणानुबंध, कृष्णाकाठ, भूमिका, विदेश दर्शन, सह्याद्रीचे वारे, युगांतर.

📕 व्यक्तिचित्रण करणारी पुस्तके : आधुनिक महाराष्ट्र के शिल्पकार, आमचे नेते यशवंतराव, कृष्णाकाठचा माणूस, घडविले त्यांना माऊलीने, नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, मुलांचे यशवंतराव चव्हाण, यशवंतराव : इतिहासाचे एक पान, यशवंतराव : एक इतिहास.

*💰 आर्थिक विचार :* यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्व इत्यादीशी निगडीत आहेत.

🎯 महाराष्ट्रातील धडाडीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार हे यशवंतरावांना राजकीय गुरु मानतात.

*🧐 आयुष्यातील काही खास गोष्टी :*

1) यशवंत राव यांना भाषण, संगीत आणि भजन-कीर्तनाची आवड होती. त्यांनी अनेक वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिके पटकावली. त्यांनी सालसेत येथे सत्याग्रहात भाग घेतला होता.

2) ते येरवडा तुरुंगात असताना आचार्य भागवत, एस.एम.जोशी यांच्याशी त्यांची ओळख झाली. तेथेच त्यांना राजकीय, सामाजिक प्रश्नांची जाणीव झाली.

3) 1930 साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केल्यानंतर त्यांनी त्यामध्ये भाग घेतला.

4) 1932 साली त्यांना पहिला तुरुंगवास घडला. या कारावासात मार्क्सवादाशी विचारांशी त्यांचा परिचय होऊन काँग्रेसमधील रॉयपंथीय गटाशी त्यांचे संबंध वाढले.

5) दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी यशवंतराव चव्हाणांना रॉय यांनी घेतलेली युद्धविषयक भूमिका अमान्य झाली.

6) 1942 साली छोडो भारत आंदोलनात ते सामील झाले.

7) 1946 साली मुंबई प्रांताच्या विधिमंडळाच्या निवडणुकीत ते सातारा मतदार संघातून निवडून संसदीय चिटणीस झाले.

8) 1948 साली त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या चिटणीसपदावर नियुक्ती झाली.1952 ला ते स्थानिक स्वराज्य व पुरवठा खात्याचे मंत्री झाले.

9) 1 नोव्हेंबर 1956 ला द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले व 1960 साली संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले.

10) 1962-66 या काळात ते भारताचे संरक्षणमंत्री, 1966-70 गृहमंत्री, 1970-74 पर्यंत अर्थमंत्री व 1974 साली परराष्ट्रमंत्री बनले.

💫 यशवंतराव चव्हाण यांनी 25 नोव्हेंबर 1984 रोजी जगाचा निरोप घेतला.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांना ओळखले जाते.

महाराष्ट्राचे आजपर्यंत चे मुख्यमंत्री?
उत्तर लिहिले · 18/10/2018
कर्म · 569245
6
यशवंतराव बळवंतराव चव्हाण(मार्च १२,इ.स. १९१३:कराड,महाराष्ट्र-नोव्हेंबर २५,इ.स. १९८४) हे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्रीसुद्धा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म१२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे.
उत्तर लिहिले · 8/4/2018
कर्म · 16700
0

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव बळवंतराव चव्हाण होते.

त्यांचा कार्यकाळ १ मे १९६० ते १९ नोव्हेंबर १९६२ पर्यंत होता.

यशवंतराव चव्हाण हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते होते.

ते महाराष्ट्राच्या जडणघडणीतले एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता:

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 2820

Related Questions

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगड किती वेळेस आणि कुणी जाळला?
अरुण गवळीला डॅडी हे नाव कसे पडले?
महात्मा फुले माहिती?
Hadappa Sanskriti Harappa Sanskriti konatya Kala til hoti?
हडप्पा संस्कृती कोणत्या काळातील होती?
गरीब निवाजी नंदा संस्था कोण होती?
तोरणा किल्ल्याची उंची किती आहे?