3 उत्तरे
3
answers
शहीद शुभम बद्दल माहिती हवी आणि ते कसे शहीद झाले?
20
Answer link
ही माहिती गूगल वरून घेतली आहे
शहीद जवान शुभम सूर्यकांत मुस्तापुरे (वय-२०) यांच्यावर आज सकाळी १० वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्ह्यातील पालम तालुक्यातील कोनेरवाडी या त्यांच्या मूळगावी लिंगायत समाजाच्या धार्मिक विधीनुसार त्यांचा दफनविधी करण्यात आला. यावेळी मंत्री बबनराव लोणीकर,आमदार मधुसूदन केंद्रे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर आणि जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी शहीद शुभम यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. यावेळी गावकऱ्यांनी ‘अमर रहे अमर रहे शहीद शुभम अमर रहे’ चा जयघोषही केला. जम्मू-काश्मीरमधील कृष्णा घाटी सेक्टर सीमारेषेनजीक पाकने केलेल्या गोळीबाळात जवान शुभम मुस्तापुरे शहीद झाले होते. पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात ४ भारतीय जवान जखमी झाले होते. शुभम मुस्तापुरे शहीद झाल्याची बातमी गावात धडकल्यानंतर गावात एकही चूल पेटली नाही. घरात शुभम हे तिघा भावांमध्ये थोरले होते. त्यांच्या वडिलांचा शुभम टेलरिंग या नावाने चाटोरी येथे व्यवसाय आहे. शुभम यांच्या घरची परिस्थिती जेमतेम आहे. ते अविवाहित होते. शुभम यांच्या पश्चात आई, वडील, आजी, आजोबा आणि दोन लहान भावंडे, असा परिवार आहे.
जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर झालेल्या गोळीबारात ३ एप्रिल रोजी भारतीय जवान शुभम मुस्तापुरे शहीद झाले. त्यांचे पार्थिव बुधवारला सायंकाळी विमानाने औरंगाबाद येथे आणण्यात आले. नंतर काही काळ छावणी परिसरात सैन्य दलाच्या वतीने अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. आज(गुरुवार) पहाटेला पार्थिव चाटोरी या गावी आणण्यात आले. तेथून शोकाकूल वातावरणात मिरवणुकीने गावकऱ्यांनी कोनेरवाडी येथे पार्थिव आणले. त्यानंतर गावातील व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अंतिम दर्शन घेतले.
शहीद जवान शुभम यांचे वडिल सूर्यकांत मुस्तापुरे यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी धार्मिक रितीनुसार दफनविधी पूर्ण केला. तत्पूर्वी पोलीस दलाच्या तुकडीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. तसेच सैन्य दलाच्या औरंगाबाद स्टेशन मुख्यालयाच्या ९ सैनिकांच्या तुकडीनेही रितसर बंदुकीच्या ३ फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. यावेळी दोन्ही तुकडीच्या बँड पथकांनी शोकधून वाजवली. तिरंग्यामधील शहीद शुभमचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
शुभम हे २ वर्षांपूर्वी सैन्यात दाखल झाले होते. शांत, सुस्वभावी मनमिळाऊ लढवय्ये आणि इतरांना मदत करणारा तरुण म्हणून त्यांची ख्याती होती. आपल्या प्रमाणेच गावातील तरुण सैन्यात भरती झाले पाहिजे, अशी त्यांची भावना होती. दगड धोंड्याच्या रस्त्यांनी धावून शुभम यांना भरतीपूर्वी सराव करावा लागला होता. त्याप्रमाणे सराव करण्याची वेळ इतरांवर येऊ नये, यासाठी गावात जिम उभारण्याची त्यांची इच्छा होती.
धाडसी स्वभाव अशी शुभम यांची सैन्यात आणि गावात ओळख होती. भूमातेची सेवा करता करता अत्यंत कमी वयात त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान न विसरता येणारे आहे. लिंगायत समाजाच्या विधीनुसार शुभम यांचा आज शासकीय इतमामात कोनेरवाडीत दफनविधी करण्यात येणार आहे. गावात त्यांची स्मृती कायम स्वरूपी रहावी, यासाठी हुतात्मा स्मारकासह गावात जिमखाना उभारण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे.
1
Answer link
गणेश यांनी पुष्कळशी माहिती दिलीच आहे. त्याव्यतिरिक्त काही माहिती मी देण्यास असमर्थ आहे.
0
Answer link
शहीद शुभम Jagannath Suryawanshi हे महाराष्ट्रातील Kolhapur जिल्ह्यातील रहिवासी होते. ते भारतीय सैन्यात Saptrishi Brigade मध्ये Lance Naik पदावर कार्यरत होते.
जम्मू आणि काश्मीरमधील Machhal Sector मध्ये 16 जुलै 2023 रोजी Duty दरम्यान ते शहीद झाले. प्रतिकूल हवामानामुळे खोल दरीत कोसळून त्यांचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेत Lance Naik शुभम यांच्यासोबत आणखी दोन जवान शहीद झाले, त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
- Havildar Amrik Singh, निवासी - Mandwara, Dist - Una, Himachal Pradesh
- Naik Amit Sharma, निवासी - Hamirpur, Dist - Hamirpur, Himachal Pradesh
शहीद शुभम यांच्या पश्चात आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे.
संदर्भ: