3 उत्तरे
3 answers

RIP म्हणजे काय?

13
RIP काय हे समजण्यासाठी तुम्हाला अब्राह्मिक ( ख्रिस्ती, यहुदी आणि मुस्लिम) धर्मियांची judgement day ( कयामत का दिन) ही संकल्पना समजून घ्यावी लागेल.
या कल्पनेप्रमाणे विश्वाच्या शेवटी ईश्वराला जेंव्हा जग, स्वर्ग नष्ट करायचं असेत तेंव्हा तो सर्वांच्या पापापुण्याचा हिशोब करत बसतो जेणे करून नवनिर्वाणात काही वाईट  येणार नाही.
सैतान, अँटीख्रिस्त(अब्राह्मिक धर्मांचे विरोधक, नास्तिक टीकाकार)  यांना अगोदरच ईश्वराने 'लेक ऑफ फायर' मध्ये टाकले आहे. या कयामतच्या दिवशी ईश्वर तुम्हाला या आगीच्या तलावात टाकेल किंवा नव्या विश्वात घेऊन जाईल.
आणि हा न्यायनिवाडा होई पर्यंत म्हणजे या विश्वाच्या अंतापर्यंत सर्व मृतांनी आपल्या थडग्यात शांतपणे रहावे अशी सदिच्छा म्हणजे RIP म्हणजे Rest in Peace.
भारतीय संकल्पनेनुसार आत्मा अमर आहे, तो एक शरीर त्यागून दुसरं शरीर धारण करतो. मृत देह प्रज्वलित झाल्यावर आत्मा मुक्त होतो. या आत्म्याला पुढील प्रवासातही सद्गती लाभो जेणेकरून हा प्रवास सुखकारक होईल अशी प्रार्थना करायची असते.  आणि याच्या पुढची पायरी म्हणजे मोक्ष, आता आत्मा जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून ही मुक्त झाला.
अर्थात दोन्ही धर्मांतील या झाल्या संकल्पना. पण जर मृत व्यक्ती कोणत्या संकल्पनाच आयुष्यभर पालन करत अली आहे हे न पाहता केवळ पाश्चिमात्य म्हणतात म्हणून आपणही अंधानुकरण करणं हे वेडगळ पणाच आहे. अफझलसारख्या शत्रूला मारल्यानंतर त्याला सन्मानाने दफन करण्याची आपली संस्कृती आहे,  मग जे भारतीय संकल्पनांचे पालन करतात त्यांना  उगाचच सरळसोट RIP का म्हणायचं? त्यांच्या बाबतीत सद्गती लाभो अस बोलु शकतो.
उत्तर लिहिले · 7/4/2018
कर्म · 99520
1
RIP या शब्दाचा उपयोग "रेस्ट इन पीस" म्हणजे "शांततेत विश्रांती" असा केला जातो, ज्याचा वापर ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मामध्ये,
कबरमध्ये दफन असलेल्या लोकांसाठी केला जातो.
उत्तर लिहिले · 6/4/2018
कर्म · 85195
0
RIP म्हणजे "Rest in Peace" (रेस्ट इन पीस).

RIP चा अर्थ "Rest in Peace" (रेस्ट इन पीस) आहे.

जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते, तेव्हा मृतात्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 'RIP' वापरले जाते. याचा अर्थ 'आत्म्याला शांती मिळो' असा होतो.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 5300

Related Questions

Jio च्या डोंगल मध्ये नेट कसे तपासावे?
इंटरनेटवर टिपा लिहा?
इंटरनेट संकल्पना विस्तृत करून त्याची कार्यशैली आणि उपयोग लिहा?
तुम्ही इंटरनेटमुळे होणाऱ्या सकारात्मक व नकारात्मक परिणामांबद्दल चर्चा करा व लिहा?
शिक्षकांच्या मदतीने गटात हॉटपॉट्स कसे तयार करायचे?
इंटरनेट सेवा आणि त्याचे रेडिएशन हे सगळ्यात मोठे प्रदूषण आहे, असे आपल्याला वाटत असेल तर, ते का?
मी माझ्या मुलींसाठी कॉम्प्युटर घेतला आहे. मला कॉम्प्युटरसाठी वाय-फायची जोडणी करायची आहे. मला वाय-फाय जोडणीसाठी माहिती द्यावी.