3 उत्तरे
3
answers
बचत गट म्हणजे काय व त्याचा फायदा कसा होतो?
6
Answer link
निश्चित स्वरूपाचे उद्दिष्ट घेऊन स्व-इच्छेने एकत्र आलेल्या लोकांचा/महिलांचा समूह म्हणजे बचत गट. एकाच कारणासाठी गटातील लोकांच्या उन्नती, विकास व फायद्यासाठी एकत्रित आलेला समूह म्हणजे बचत गट होय.
फायदे :
- संघटन होते व बचत आणि काटकसरीची सवय लागते.
- बचत गटामुळे अडीअडचणींच्या वेळेस तातडीच्या गरजा भागविण्यासाठी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागत नाही. त्वरीत व सुलभरित्या कर्ज पुरवठा होतो व सभासदांना बचतीची सवय लागते आणि बँकेचे व्यवहार माहिती होतात.
- सावकारी कर्जाच्या तुलनेत अत्यंत कमी व्याजदरात आर्थिक सहाय्य उपलब्ध होते त्यामुळे सदस्यांच्या एकमेकांच्या आर्थिक अडचणी सोडविल्या जातात.
- सभासदांमध्ये परस्पर सहकार्य व विश्वास निर्माण होतो.
- सभासदांना अंतर्गत कर्ज पुरवठा अल्प व्याजदराने होतो.
- महिला घराबाहेर पडून त्यांना नवीन बाबी शिकण्याची संधी मिळते.
- महिला स्वावलंबी होतात.
- महिलांना बचत, कर्ज घेणे व परतफेड करणे अशा आर्थिक व्यवहारांची माहिती होते व त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो.
- सरकारच्या लोककल्याणाच्या विविध योजनांची माहिती होते.
- समाजात स्थान निर्माण होते. परतफेडीची सवय लागते.
- कार्यरत असलेल्या बचत गटास एक वर्षानंतर प्रती सभासद रू. 1000/व जास्तीत जास्त रू. 25000/पर्यंत व्यवसायासाठी खेळते भांडवल (कॅश क्रेडीट) मिळते.
- दारिद्रय रेषेखालील बचत गटास व्यवसायासाठी रू. 1.25 लाख किंवा 50% यापैकी कमी असेल त्या रकमेएवढे अनुदान मिळते.
6
Answer link
संकल्पनासंपादन करा
बचत गट हा एक सामाजिक-आर्थिक उपक्रम आहे. ही प्रक्रिया संघटितपणे एकमेकांना समजून घेत होत असल्याने या रचनेला स्वयंसाहाय्य गट असेही संबोधले जाते. गटाला काहीतरी विशिष्ट नाव ठेवले जाते, उदा.जागृती बचत गट, अस्मिता बचत गट इ.
बचत गट म्हणजे ठराविक काळाने बचत जमा करण्याच्या निमित्ताने एकत्र येणारा गट.
गटाचे नियमसंपादन करा
बचत गटाचे सदस्य केवळ महिला, केवळ पुरुष अथवा मिश्र म्हणजेच महिला पुरुष एकत्र असेही असू शकते. ही संख्या २० किंवा त्यापेक्षा कमी हवी.गटातील प्रत्येक सदस्य ठरलेल्या कालावधीनेएकत्र येऊन बचत म्हणून ठराविक रक्कम गटात जमा करतो/ते. हा कालावधी आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा असतो.ही जमा केलेली रक्कम बचत गटातील सदस्यांनाच कर्ज म्हणून मिळते.कर्ज सभासदाने हप्त्या-हप्त्याने बचत गटाला परत करणे अपेक्षित असते.
बचत गटाच्या व्यवहारासाठी बचत गटाचे सदस्य - कर्ज द्यायचे का, द्यायचे ठरल्यास किती दराने द्यायचे, कोणाला द्यायचे, परतफेडी विषयी नियम वगैरे ठरवतात.
बचत गट ही लोकशाही तत्त्वावर आधारित रचना आहे त्यामुळे गटातील प्रत्येक सभासदाला समान अधिकार असतो.बचत गटाने पाच सूत्रांचा नियम आमलात किंवा कटाक्षाने पाळला पाहिजे.
वैशिष्ट्येसंपादन करा
बचत गट हे कोठेही नोंदविण्याची आवश्यकता नाही. नाबार्डच्या परिपत्रकाप्रमाणे केवळ बचत गटाच्या सदस्यांच्या ठरावाने त्या गटाचे बँकेत खाते काढता येऊ शकते.बचत गटांना बँकेकडून कर्ज मिळावे यासाठी १९९८ पासून केंद्रीय अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.अशा गटांना राज्य व केंद्र सरकार अत्यल्प व्याजदरावर अर्थसाहाय्य पुरविते. त्या कर्जाची सुलभ दरावर परतफेड करावी लागते.राज्य व केंद्र सरकारने बचत गटासाठी विविध विकास योजना आखल्या आहेत. जसे महाराष्ट्र शासनाने महिला बचत गटांना बँकेतून कर्ज घेताना मुद्रांक शुल्क माफ केलेले आहे ज्यायोगे सुलभ कर्ज पुरवठा होईल.महिला बचत गटामार्फत सभासदांना दिल्या जाणऱ्या कर्जामुळे सभासद समाजिक व आर्थिक विकासात परिणाम होऊन महिला सक्षम बनले.
बचत गटांद्वारे निर्माण झालेली उद्योजकतासंपादन करा
संघटित ताकद व पारदर्शक सहकाराची प्रक्रिया जर एकत्र आली तर विविध प्रकारची उद्योजकता निर्माण होते आणि समाजाच्या प्रगतीला हातभार लावते. या चळवळीतून अनेक प्रकारचे उद्योग जन्माला आले.त्यापैकी काही यशस्वी उद्योग -
सामूहिक दुग्ध व्यवसाय - कोल्हापूरजिल्ह्याच्या दुर्गम अशा शाहूवाडी तालुक्यातील मानकरवाडीच्या सरस्वती महिला बचत गटानेदुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून केवळ ४०० लोकसंख्या असलेल्या या गावाचा कायापालट घडवून आणला आहे.[१]सॅनिटरी नॅपकिन उद्योग - सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट जवळच्या जेऊर येथील ‘श्री जीवनज्योती महिला विकास बचत’ हा सॅनिटरी नॅपकिन बनवणारा महाराष्ट्रातील हा पहिला बचत गट. आज महाराष्ट्रात २५ जिल्ह्यांत सॅनिटरी नॅपकिन निर्मितीची युनिट्स स्थापन झाली आहेत. शिवाय कर्नाटकात अफजलपुरम् येथे, सिक्कीममधील गंगटोक येथे, बग्गी (हिमाचल प्रदेश), बिहार (कर्नानेपुरम्), छत्तीसगडमधील बिलासपूर अशा अनेक ठिकाणी ही युनिट्स आकार घेत आहेत.[२]
या गटाद्वारे आजकाल शासकीय कार्यालयात सायकल/स्कूटर स्टँड चालविणे, उपहारगृह चालविणे, अंगणवाडीत आहार पुरवणे इत्यादी सेवाही पुरविण्यात येतात.
बचत गटाच्या आधारामुळे गटातील महिलांच्या वैयक्तिक उद्योगांनाही प्रोत्साहन मिळत आहे.
बचत गटा संबंधी काम करणाऱ्या संस्थासंपादन करा
चैतन्य(पुणे), ज्ञान प्रबोधिनी(पुणे), संपूर्ण बांबू केंद्र(अमरावती), आम्ही आमच्या आरोग्यासाठी (गडचिरोली), माता व बालक उत्कर्ष प्रतिष्ठान (सोलापूर), 'स्व'-रूप वर्धिनी (पुणे)
बचत गटाचे वैशिष्ट्यसंपादन करा
बहुतेक बचत गट कर्जावर महिना २% व्याज आकारणी करतात. पुण्याच्या हवेली तालुक्यातील श्रीरामनगर गावाचे सर्व बचत गट महिन्याला १% दराने व्याज आकारणी करतात, याच गावातील गटाने खताच्या ब्रिकेट बनवण्याचा कारखाना काढला आहे. वर्षाला १०० टन उत्पादन गट करतो.
आधुनिक तंत्रज्ञानाची जोडसंपादन करा
माहिती तंत्रज्ञान व डिजिटल युगातील अनेक साधनांचा या चळवळीला हातभार लागत आहे. नाबार्डने ई-शक्ती हा कार्यक्रम विकसित केला आहे.[३] यशस्विनी अभियानाच्या माध्यमातून आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही महिला बचत गटांची वाटचाल सुरु झाली आहे

0
Answer link
बचत गट म्हणजे काय:
बचत गट म्हणजे साधारणपणे १२ ते २० महिला किंवा पुरुषांचा समूह असतो. हे सदस्य नियमितपणे एकत्र येतात आणि काही प्रमाणात बचत करतात. बचतीची रक्कम बँकेत जमा केली जाते. गटातील सदस्यांना गरजेनुसार कर्ज दिले जाते आणि कर्जावर व्याज आकारले जाते.
बचत गटाचे फायदे:
- आर्थिक साहाय्य: सदस्यांना गरजेच्या वेळी कर्ज उपलब्ध होते.
- बचतीची सवय: नियमित बचतीमुळे आर्थिक सवय लागते.
- आत्मनिर्भरता: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवते.
- सामुदायिक विकास: गावाच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याची संधी मिळते.
- बँकिंग व्यवहार: सदस्यांना बँक खाती उघडण्यास आणि नियमित व्यवहार करण्यास मदत करते.