2 उत्तरे
2
answers
एम.एस्सी. नंतर काय करावे?
6
Answer link
✍️✍️
MSc नंतर पुढे काय करायचं आहे ते तुम्ही आधी ठरवावं असं मला वाटतं. पुढे रिसर्च करायचा असल्यास (कदाचित तर आणि तरच) पीएचडी साठी प्रयत्न करा अन्यथा एमएससी नंतर इतरही नोकरीच्या संधी शोधू शकता. रिसर्च नसेल करायचा तर पीएचडी करण्यात साध्य नाही. एकतर वेळ वाया जाईल आणि त्यातून एखाद्या वेळेस अपयशाने किंवा कुटुंबाच्या जबाबदारीने किंवा समाजाच्या सततच्या खोचक प्रश्नाने वैफल्य ( depression) येईल ते वेगळंच. म्हणून त्याचा आधी विचार करावा.
पीएचडी📚 करायची असल्यास NET / GATE / JEST सारख्या परीक्षा देऊन प्रवेश मिळवणं अनिवार्य आहे. त्याची तयारी करावी. चांगल्या संस्थेत पीएचडी साठी प्रवेश हवा असल्यास चांगले गुण असणं आवश्यक आहे. या परीक्षांच्या निकालातून मुलाखतीसाठी निवड केली जाते. म्हणून ती पायरी ओलांडायची असल्यास विषयाचं सखोल ज्ञान आवश्यक आहे. त्याच बरोबर एमएस्सीला चांगला प्रोजेक्ट असणं आणि त्याचे आवश्यक ती सखोल माहिती गरजेची आहे जी मुलाखतीत तपासली जाते. पिएचडीसाठी JRF मिळवल्यास किंवा नामवंत संस्थेत (IIT/ IISc / IISER / TIFR etc) प्रवेश मिळवल्यास चांगली शिष्यवृत्तीही मिळते (सध्या पहिले २ वर्ष दर महा 25,000/- आणि नंतर ३ वर्षे दर महा 28000/- इतकी शिष्यवृत्ती दिली जाते. किंवा स्कॉलरशिप मिळवून परदेशात पीएचडी करण्याचा विचार सुद्धा करू शकता. (याविषयीच्या माहितीसाठी पुन्हा कधीतरी सविस्तर लिहीन).
सध्या मला नोकरी नाही म्हणून तात्पुरता किंवा आर्थिक दृष्ट्या सोयीचा पर्याय म्हणून पीएचडी करणं, हे पीएचडी च्या मूळ उद्देशाला धरून होणार नाही आणि जरी अशी PhD यशस्वीरित्या पार पडलात तरी पुन्हा नोकरीची शाश्वती नाही. त्यानंतर तुमचे विषयातले कौशल्य तपासले जाते. केवळ डिग्रीच्या कागदावर नोकऱ्या मिळत नाहीत. A degree is necessary condition, but not sufficient. म्हणजे Back to square one.
एमएससी नंतर नोकरीच्या संधी शोधत असाल तर, ज्युनियर🙄 किंवा डिग्री कॉलेज टिचिंग 📙पेक्षाही वेगळे पर्याय आहेत, हा विचार बरेच जण करत नाहीत. तसं असेल तर सरकारी नौकरी डॉट कॉम (www.sarkari-naukri.com) किंवा employmentnews वर अशा वेबसाईट्स वर जाऊन पहा. BARC / DAE / ISRO / IITs / TIFR / IISc / IISERs / DAE / CSIR Labs / Universities यांच्या वेबसाईटवर recruitment किंवा career पेजेस वर जाऊन पहा तिथे अशा जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात. तुमचा अनुभव जुळत असल्यास तुम्हाला नोकरीवर घेतले जाऊ शकते किंवा दुसरं काही मिळेपर्यंत निदान १-२ वर्षासाठी प्रोजेक्ट असिस्टंटशिप वगैरे. त्यातून अनुभव सुद्धा मिळेल, बऱ्यापैकी पैसेही आणि चांगलं काम झाल्यास एखादं scientific publication वगैरे ज्याची पुन्हा पीएचडी किंवा नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल.
तसेच, IT / Engineering / semiconductor /🙄 pharmaceutical किंवा इतर कंपन्या मध्ये प्रयत्न करू शकता. त्यासाठी ओळखीने (Reference) किंवा Linkedin किंवा तत्सम वेबसाईट किंवा त्या त्या कंपन्यांच्या वेबसाईट्स वर careers section मध्ये जाहिराती सापडतील. शक्यतो XRD / spectroscopic -microscopic -laser instruments (Bruker / Panalytical / Newport / Hallmark etc) बनवणाऱ्या आणि त्या विकणाऱ्या कंपन्यांमध्ये sales or application engineer पदासाठी प्रयत्न करू शकता. ✔️

0
Answer link
एम.एस्सी. (Master of Science) पदवी घेतल्यानंतर तुमच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ते तुमच्या आवडीनुसार आणि ध्येयानुसार निवडता येतील. काही सामान्य पर्याय खालीलप्रमाणे आहेत:
1. उच्च शिक्षण (Further Education):
- पीएच.डी. (Ph.D.): जर तुम्हाला संशोधन क्षेत्रात आवड असेल, प्राध्यापक व्हायचे असेल, तर तुम्ही पीएच.डी. करू शकता.
- एम.फिल. (M.Phil.): काही विद्यापीठे अजूनही एम.फिल. देतात, जो पीएच.डी. च्या आधीचा टप्पा असतो.
- अन्य मास्टर्स डिग्री (Other Master's Degrees): तुम्ही तुमच्या क्षेत्राशी संबंधित इतर मास्टर्स डिग्रीचा विचार करू शकता, जसे की एम.बी.ए. (MBA) किंवा स्पेशलाइज्ड एम.एस्सी.
2. नोकरी (Job Opportunities):
- संशोधन संस्था (Research Institutes): अनेक सरकारी आणि खाजगी संशोधन संस्थांमध्ये संशोधक म्हणून नोकरी मिळू शकते.
- उद्योग (Industry): वेगवेगळ्या उद्योगांमध्ये तुमच्या स्पेशलायझेशननुसार नोकरी मिळू शकते, जसे की फार्मास्युटिकल कंपन्या, केमिकल इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री, इत्यादी.
- शिक्षण क्षेत्र (Teaching): बी.एड. (B.Ed.) करून तुम्ही शिक्षक म्हणूनही करिअर करू शकता.
- सरकारी नोकरी (Government Jobs): सरकारी नोकरीसाठी तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC), यूपीएससी (UPSC) आणि इतर राज्य-स्तरीय परीक्षा देऊ शकता.
3. कौशल्ये आधारित करिअर (Skill-Based Career):
- डेटा सायन्स (Data Science): डेटा सायन्समध्ये खूप संधी आहेत. तुम्ही डेटा विश्लेषण (Data Analysis) आणि मशीन लर्निंग (Machine Learning) शिकून या क्षेत्रात करिअर करू शकता.
- सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट (Software Development): जर तुम्हाला कोडिंगमध्ये आवड असेल, तर तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्येही करिअर करू शकता.
4. इतर पर्याय (Other Options):
- सिव्हिल सर्व्हिसेस (Civil Services): यूपीएससी (UPSC) परीक्षा देऊन तुम्ही आयएएस (IAS), आयपीएस (IPS) अधिकारी बनू शकता. UPSC Official Website
- बँकिंग क्षेत्र (Banking Sector): आयबीपीएस (IBPS) परीक्षा देऊन तुम्ही बँकेत नोकरी मिळवू शकता. IBPS Official Website
हे काही पर्याय आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि योग्यतेनुसार निवड करू शकता.