शेती निबंध कृषी लिखाण

शेतकऱ्यांचे आत्मकथन या विषयावर निबंध मिळेल का?

4 उत्तरे
4 answers

शेतकऱ्यांचे आत्मकथन या विषयावर निबंध मिळेल का?

14
शेतकर्याची आत्मकथा

शेतकरी म्हंटल कि आपल्या डोळ्यासमोर येते ती गरिबी ,दुष्काळ ,कर्जबाजारी ,अनुदानासाठी सरकारवर अवलंबून असणारा, आत्महत्या करणारा !हो ,पण ही परिस्थिती का व कशी निर्माण झाली? ह्याला कोण जबाबदार? ह्याची कारणे व उपाय ह्यांचा शोध घेण्याचा कुणी प्रयत्न केला आहे का?
शेती हा व्यवसाय पावसावर मुख्यतः हवामानावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे .भारतात साधारणपणे ६० ते ७० टक्के शेती पावसावर अवलंबून आहे व ३० ते 40 टक्के शेती हि बागायती आहे त्यामुळे पाऊस कमी किंवा जास्त झाल्यास त्याचा परिणाम शेतीवर होतो तसेच पाऊस वेळेवर न आल्यास सुद्धा होतो. अशा वेळी शेतकऱ्याची अपेक्षा सरकार कडून अनुदान ,कर्जमाफी मिळवण्याची असते .व ती न मिळाल्यास तो कर्जबाजारी होतो. व मग त्यातून नैराश्य येते व मग तो भलत्याच मार्गाला जातो . मी स्वतः एक शेतकरी आहे मी पण ह्याच चक्रातुन गेलो आहे. अगदी आत्महत्या करण्याच्या निर्णयाप्रत येउन ठेपलों. एवढ्यात मला एक समाजसेवक भेटला.

त्याने माझी कहाणी मन लावून ऐकून घेतली.आणि सांगितले की, आता परिस्थिती बदलू लागली आहे .आता शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर व इतर यंत्र आली आहेत. त्यामुळे मानवी श्रम खूप कमी प्रमाणात लागतात. पाण्यासाठी सरकारने व स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या प्रमाणात छोटे छोटे बंधारे व धरणं बांधली आहेत. व बांधत आहेत. तसेच आता शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात ठिबक सिंचनाचा वापर करीत आहे. तसेच पाण्याचे नियोजन ही करत आहेत म्हणजेच ‘ पाणी अडवा पाणी जिरवा ‘ ह्या मुळे पावसावर असलेले अवलंबित्व हळू हळू कमी होत आहे. ही सर्व परिस्थिती स्वतःलाच बदलावी लागेल ,ह्यातून मार्ग काढावा लागेल असे तो मला म्हणाला. मी पण मनाशी ठरवले मी रडत बसणार नाही, आत्महत्या करणार नाही.

सर्व प्रथम मी शेतीला पूरक असा जोड धंदा सुरु केला. त्या साठी मी दोन गाई व दोन म्हशी घेतल्या. त्या मुळे मला दिवसाला वीस लिटर म्हशीचे वपंधरा लिटर गाईचे दूध मिळू मिळण्यास सुरवात झाली। त्यातून मला रोज १५०० ते २००० रुपये मिळू लागले. खर्च वजा जाता ८०० ते १००० रुपये रोज नफा मिळू लागला. त्यामुळे मला शेती साठी लागणारे भांडवल उभे राहू लागले. तसेच गाईच्या, म्हशीच्या शेणापासून मला खत मिळू लागले. त्यामुळे मला येणारा रासायनिक खताचा खर्च कमी झाला. व सेंद्रिय खतामुळे उत्पादनाला बाजारात भाव चांगला मिळतो. अशा प्रकारे मी माझ्या कुटुंबाच्या रोजच्या जेवण्या खाण्याची सोय केली. व शेतीसाठी भांडवल ही उभे केले.

नंतर मी एक छोटा ट्रॅक्टर विकत घेतला. त्यामुळे मला शेतीसाठी लागणार्या मजुरीचा खर्च बऱ्याच प्रमाणात कमी झाला. तसेच मी विहीर खणून ठिबक सिंचन ही करून घेतले. त्यामुळे मला आता वर्षातून दोन पिके घेता येऊ लागली. त्यामुळे माझी वार्षिक मिळकत दुप्पट झाली. मी मागच्या व ह्या वर्षांचा विचार केला असता माझ्या असे लक्षात आले की :

१] जोडधंद्या मुळे माझ्या कुटुंबाची आर्थिक अडचण झाली नाही .
२] जोडधंद्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मला शेतीसाठी लागणारे भांडवल उभे राहिले .
३] भांडवल असल्यामुळे मला यांत्रिकीकरण (विहीर खणणे,ट्रॅक्टर ,ठिबक सिंचन )वैगेरे करता आले.
४] यांत्रिकीकरणा मुळे होणाऱ्या मजुरीच्या खर्चात जवळपास ५०% बचत झाली.
५] सेंद्रीय खतामुळे रासायनिक खताचा खर्च पूर्णपणे वाचला .
६] सेंद्रिय खत मुळे मला सेंद्रिय धान्य मिळाले. त्याचा भाव जवळपास दुप्पट मिळाला.
७] तसेच विहीर खणल्यामुळे व ठिबकसिंचन केल्यामुळे दोन पिके घेता आली .
त्यामुळे माझे आर्थिक उत्पन्न दुप्पट झाले. व रोज लागणाऱ्या खर्चाची व भांडवलाची व्यवस्था झाली. तसेच मुलांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशाची सोय झाली .

आता मी मागील वर्षी आलेल्या अडचणींचा विचार केला असता माझ्या लक्षात आले :

१] पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार .
२] शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे.
३] अवकाळी पावसापासून बचाव.
४] योग्य पिकाची निवड करणे .

पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी मला पुढील वर्षी योग्य पीक घ्यावे लागेल. ज्याला कमी प्रमाणात पाणी लागेल. ठिबकसिंचनामुळे ते होईल ह्याची मला खात्री आहे. शेतीमालाला योग्य तो भाव मिळवण्यासाठी पारंपरिक धान्य न घेता दुसरे काही पीक म्हणजेच फळभाजी ,पालेभाजी ,फुलशेती वैगेरे काही घेता येईल का ह्याचा विचार करणे. अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान टाळणे. तसेच शेडनेट किंवा ग्रीन नेट किंवा पॉलीहाऊसे असे काही करता येईल का ह्याचा विचार करणे. तसेच धान्याची साठवणूक करणे. म्हणजे योग्य भाव आल्यास विकता येईल ह्याचा विचार करणे.

पहिल्यांदा ही सर्व परिस्थिती मलाच बदलावी लागेल. ह्या गोष्टी बदलण्यास सरकार व अनेक स्वयंसेवी संस्था मदत करीत आहेत. तसेच आता ह्या व्यवसायात अनेक उच्चशिक्षित तरुण सुद्धा मोठ्या प्रमाणात येत आहेत. सरकार सुद्धा ठिबकसिंचन ,विहीर ,ग्रीननेट ,पॉलीहाऊसे ह्या करता ५०%सबसिडी देत आहे .बँक ४%दराने कर्ज देत आहे.

उत्तर लिहिले · 14/3/2018
कर्म · 115390
8
शेतकऱ्यांचे आत्मकथन हा विषय मी मागील २६ जानेवारी २०१८ ला प्रजासत्ताक दिन निमित्ताने आमच्या येथे कार्यक्रमाद्वारे एका इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यास लिहून दिलेले... तेच मी तुम्हाला येथे सादर करते...
*शेतकऱ्यांचे आत्मकथन*
नमस्कार मंडळी...! मी आहे एक छोटासा शेतकरी... महाराष्ट्रातील एका आडगावात माझी छोटीशी शेती आहे... आमच्या इकडे नदी आहे पण कोरडी आहे... विहीर आहे पण पाणी नाही... सरकार सुद्धा आहे पण बघायला मात्र येत नाही... तुम्हाला काय वाटतं..! आम्ही फक्त पावसाच्या दिवसा दुष्काळ येतो... नाही... आमच्या घरी दररोजचा दुष्काळ असतो... स्वतःचे पोट भरण्यासाठी नाही कष्ट करत तर माझ्या बायका, माय, लेकराचे पोट भरावे ... या मातीला सुद्धा आम्ही आमच्याहून जास्त देण्याचा प्रयत्न करतो...
पावसाची गरज असते तेव्हा तो येत नाही... अन् नसते तेव्हा अवकाळी येऊन सर्व र्हास करुन मोकळा होतो... फटका तर आम्हाला पडतो आणि व्यापारी याचा भाव वाढवतात... एवढे सर्व होऊनही थोडिशी आशा उरली असते... आता शेती होईल चांगली... मिळकत येईल चांगली...
काय मंडळी शांत का झालात...! तुम्ही बोलत असाल ना हे तर नेहमिचच रडगाणं आहे.., यात नवीन काय... आम्ही तरी काय करणार...
तुमचं पण बरोबर आहे म्हटलं... तुम्ही तरी काय करणार...
म्हणूनच तर आम्हाला बळीराजा म्हटले जाते...
बरं येतो मी...!
__________________________________________________

मित्रांनो बळीराजा म्हणून त्यांचं सांत्वन करत राहण्यापेक्षा बळीराजास एक मदतीचा हात पुढे करू... आपल्याकडून जी काही मदत असेल ती नक्कीच आपण करू... आपला खारिचा वाटा देखील खुप मोलाचा असतो...

धन्यवाद...!
उत्तर लिहिले · 14/3/2018
कर्म · 458580
0

शेतकऱ्याचे आत्मवृत्त


‘‘मी शेतकरी बोलतोय!’’

माझी कहाणी म्हणजे माती, घाम आणि आकाशाशी जुळलेली एक अतूट नाळ आहे. मी या भारतभूमीचा आत्मा आहे. माझ्या कष्टावरच ह्या देशाची भूक भागते.

माझ्या दिवसाची सुरुवात होते ती पहाटेच्याremixing गार वाऱ्याने. रात्रभर शांत झोपलेली धरती दिवसाच्या कामासाठी सज्ज होते आणि त्याचबरोबर मीही. बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज आणि पंखांच्या फडफडाटाने दिवसाची सुरुवात होते. मी माझ्या शेतात नांगर चालवतो, बी पेरतो आणि मग डोळे लावून आकाशाकडे पावसाची वाट बघतो.

पाऊस आला की आनंद होतो, कारण माझ्या कष्टाला फळ येणार असतं. मग मी खुरपणी करतो, फवारणी करतो आणि पिकाला जगतो. ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता मी माझ्या शेतात राबतो.

पण माझ्या जीवनात दुःखही खूप आहेत. कधी अतिवृष्टी होते, तर कधी दुष्काळ पडतो. कधी माझ्या मालाला भाव मिळत नाही, तर कधी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्याची वेळ येते.

तरीही मी हार मानत नाही. कारण मला मातीवर प्रेम आहे. मला माझ्या शेतावर प्रेम आहे. मी आजही आशेने जगतो की एक दिवस नक्की बदलेल. माझ्या कष्टाचं चीज होईल आणि माझ्या मुलांना चांगलं भविष्य मिळेल.

मी सरकारला (Government) विनंती करतो की, त्यांनी माझ्यासाठी काहीतरी करावं. मला माझ्या मालाला योग्य भाव मिळावा, मला कर्जमुक्त करावं आणि माझ्या मुलांना शिक्षणासाठी मदत करावी.

शेवटी, मी एवढेच म्हणेन की, ‘जय जवान जय किसान’ हे फक्त एक वाक्य नाही, तर तो माझ्या जीवनाचा आधार आहे.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 2580

Related Questions

जागतिक लोकसंख्या वाढ शाप की वरदान निबंध?
खालील विधानाबाबत स्वमत लिहा?
1920 ते 1974 या कालखंडातील निबंधाचे स्वरूप व वैशिष्ट्ये काय होती?
रंगमंचावरील एखाद्या नाटकाचा प्रयोग पाहून प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची नोंद करा व त्या आधारे 'नाटकाला प्रेक्षकांचा प्रतिसाद' या शीर्षकाचा वीस ओळींचा निबंध तयार करा.
मी पाहिलेली सहकारी संस्था यावर निबंध लिहा.
सहकारी संस्थेच्या पत्त्यात बदल करून किती दिवसांच्या आत निबंध करावा?
माझ आई निबंध?