2 उत्तरे
2 answers

रॅम म्हणजे काय ?

26
कृपया मराठीत टाइप करत जा... म्हणजे प्रश्न सर्च करायला आणि समजायला सोपे जाईल...
तुमचा प्रश्न नेमका समजला नाही...
तुम्हाला अयोध्यातिल *राम* असे म्हणायचे आहे का..?
की
संगणक भाषेमधील RAM (रॅम) असे म्हणायचे आहे..,?

तुम्हाला जर संगणक भाषेतील RAM (रॅम) असे म्हणायचे असेल तर त्याचे उत्तर खालील प्रमाणे,
रँडम एक्सेस मेमरी अर्थात रॅम हा संगणकाचा माहिती साठवण्याचा एक भाग आहे. हा भाग संगणकामध्ये स्मृती सारखा काम करतो. रँडम एकसेस म्हणजे साठवलेली माहिती कोणत्याही क्रमाशिवाय संगणकाला वापरण्यासाठी उपलब्ध होते. रॅमला पुरवण्यात येणारी उर्जा खंडित केल्यास रॅमवर साठवलेली सर्व माहिती नष्ट होते. याविपरीत हार्ड-डिस्क्, कॉम्पॅक्ट् डिस्क् (CD), डि. व्हि. डि. (DVD) आणि चुम्बकीय फित (Magnetic Tape) यांवर साठवलेली सर्व माहिती कोणताही ऊर्जा पुरवठा नसतांनाही टिकून रहाते, पण त्यांच्या स्मृती स्थळांवर साठवलेली माहिती तांत्रिक् मर्यादेमूळे फक्त एका ठराविक पुर्वनिश्चित् क्रमामध्येच साठवता किंवा उपलब्ध करता येवु शकते.

आणि

जर आपणांस अयोध्येतील *राम* यांचा अर्थ जाणून घ्यायचे असेल तर,
राम हे देवांच्या गणतीमध्ये आलेले नाम आहे...
रामायण कथेतील राम हे भगवंत होते... जे लक्ष्मण यांचे बंधू आणि सीता यांचे पती... तर रामाचा सर्वात मोठा भक्त हनुमान...


धन्यवाद...!
उत्तर लिहिले · 13/3/2018
कर्म · 458560
0

रॅम (RAM) म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी.

हे संगणकातील एक तात्पुरते मेमरी स्टोरेज आहे.

उदाहरणार्थ:

  • जेंव्हा आपण संगणकावर काम करतो, उदाहरणार्थ एखादे ॲप्लिकेशन उघडतो, तेव्हा रॅम त्या ॲप्लिकेशनचा डेटा तात्पुरता साठवते.
  • त्यामुळे प्रोसेसरला (Processor) डेटा जलद मिळतो आणि काम करणे सोपे होते.
  • संगणक बंद केल्यावर रॅममधील डेटा नष्ट होतो.

अधिक माहितीसाठी हे उपयुक्त लिंक:


उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1040

Related Questions

संगणकाचे महत्वाचे घटक कोणते आहेत?
सीपीयू म्हणजे काय?
रॅम म्हणजे काय?
RAM म्हणजे काय?
मला एखादा जुना CPU विकत घ्यायचा आहे, कोणाकडे असेल तर सांगा?
प्रोसेसर आणि रॅम ह्या दोहोंमध्ये काय फरक आहे?