3 उत्तरे
3
answers
स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडामध्ये आहे?
16
Answer link
स्वित्झर्लंड या देशाविषयी थोडक्यात माहिती 😊
स्वित्झर्लंड पश्चिम युरोपातील एक भूपरिवेष्टित देश आहे. आल्प्स पर्वतरांगमध्ये 41,277 km इतक्या लहान क्षेत्रफळावर वसलेल्या ह्या देशाची लोकसंख्या 8,236,303 आहे. स्वित्झर्लंडच्या उत्तरेस जर्मनी, पश्चिमेला फ्रान्स, दक्षिणेला इटली, पूर्वेस अॉस्ट्रिया, व लिश्टनस्टाइन हे देश आहेत.
स्वित्झर्लंड हा देश 26 कँटनांनी म्हणजे राज्यांनी बनलेले संघराज्यीय प्रजासत्ताक आहे. पारंपारिक काळापासून स्वित्झर्लंड तटस्थ राहण्याच्या भूमिकेवर कायम आहे. जगात शांतता राखण्यावर स्वित्झर्लंडने कायम भर दिला आहे. 2002 सालापर्यंत स्वित्झर्लंडने संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील होण्यास नकार दिला होता. सध्या स्वित्झर्लंड युरोपियन संघाचा सदस्य नसलेला एकमेव युरोपातील आघाडीचा देश आहे.
*** स्वित्झर्लंड ची संक्षिप्त माहिती
1) राजधानी - बर्न
2) सर्वात मोठे शहर - झ्युरिक
3) अधिकृत भाषा - जर्मन, फ्रेंच, इटालियन, रोमान्श
4) सरकार - संघराज्यीय प्रजासत्ताक
5) क्षेत्रफळ - 41,277 km
6)लोकसंख्या - 8,236,303 (जुलै 2017 प्रमाणे)
7) राष्ट्रीय चलन - स्विस फ्रँक
8) आंतरजाल प्रत्यय -. ch
9) आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक - +41 🙏🙏
धन्यवाद 😊🙏🙏

7
Answer link
स्वित्झर्लंड युरोप खंडाच्या मध्य पश्चिम भागात स्थित असून त्याच्या भोवताली जर्मनी, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रिया व लिश्टनस्टाइन हे देश आहेत. स्वित्झर्लंडचा दक्षिण व आग्नेय भाग आल्प्स पर्वताने व्यापला आहे. ऱ्हाइन व ऱ्होन ह्या युरोपामधील दोन प्रमुख नद्यांचा उगम स्वित्झर्लंडमध्ये होतो. जिनिव्हा हे मोठे सरोवर देशाच्या नैऋत्य भागात फ्रान्सच्या सीमेवर तर बोडनसे हे सरोवर ईशान्य भागात जर्मनी व ऑस्ट्रिया देशांच्या सीमेजवळ स्थित आहेत.
0
Answer link
स्वित्झर्लंड हा देश युरोप खंडात आहे.
अधिक माहिती:
- स्वित्झर्लंड पश्चिम-मध्य युरोपमध्ये स्थित एक भूपरिवेष्ठित (landlocked) देश आहे.
- भौगोलिकदृष्ट्या, स्वित्झर्लंड आल्प्स, स्विस पठार आणि जुरा पर्वत मध्ये विभागलेला आहे.
- या देशाची अर्थव्यवस्था मजबूत असून तो जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे.