दूरचित्रवाणी कुतूहल बातम्या दूरदर्शन प्रसारण तंत्रज्ञान

वृत्तवाहिनीवर वृत्तनिवेदक ज्या बातम्या सांगतात त्या कशा प्रकारे सांगतात, पाठांतर करून की समोरील स्क्रीनवर पाहून सांगतात? (तासानंतर वृत्तनिवेदक बदललेले असले तरी त्याच बातम्या असतात.)

2 उत्तरे
2 answers

वृत्तवाहिनीवर वृत्तनिवेदक ज्या बातम्या सांगतात त्या कशा प्रकारे सांगतात, पाठांतर करून की समोरील स्क्रीनवर पाहून सांगतात? (तासानंतर वृत्तनिवेदक बदललेले असले तरी त्याच बातम्या असतात.)

19
साध्या सरळ ज्या बातम्या असतात, म्हणजे अशा बातम्या ज्यात वाद-विवाद नसतो, अशा बातम्या वाचून सांगितल्या जातात. यासाठी कॅमेऱ्याच्या समांतर एक स्क्रीन ठेवलेली असते. त्या स्क्रीनवर पाहून निवेदक बातमी वाचतात. त्यांची नजर कॅमेऱ्याच्या समांतर असल्याने आपल्याला असे वाटते कि हे पाठांतर आहे. पण ते वाचत असतात.

काही ठिकाणी teleprompter हे मशीन वापरले जाते. हे मशीन म्हणजे एक स्क्रीन असते आणि त्यामागे एक कॅमेरा बसवलेला असतो. निवेदक स्क्रीनकडे(म्हणजेच कॅमेऱ्याकडे) पाहून बातमी वाचतो आणि ते पाठांतर केल्यासारखे वाटते, पण तो ती बातमी वाचत असतो.

खालील व्हिडीओमध्ये हे कसे चालते हे तुम्ही पाहू शकता:
उत्तर लिहिले · 10/3/2018
कर्म · 283280
0

वृत्तवाहिनीवर वृत्तनिवेदक बातम्या वेगवेगळ्या प्रकारे सांगतात:

१. पाठांतर:
  • काही वृत्तनिवेदक महत्त्वाच्या बातम्यांचे मुद्दे लक्षात ठेवतात किंवा पाठांतर करतात.
  • त्यामुळे बातमी सांगताना अधिक आत्मविश्वास दिसतो.
२. स्क्रीनवर पाहून:
  • टेलीप्रॉम्प्टर नावाचे एक उपकरण वापरले जाते. यात बातम्यांचे Text Scroll होते, ते पाहून वृत्तनिवेदक बातम्या वाचतात.
  • त्यामुळे त्यांना कॅमेऱ्याकडे पाहून बोलता येते आणि प्रेक्षकांशी Contact Maintain करता येतो.
३. दोन्ही पद्धतींचा वापर:
  • अनेक वृत्तनिवेदक या दोन्ही पद्धतींचा वापर करतात.
  • सुरुवातीला काही भाग पाठांतर करून सांगतात आणि नंतर टेलीप्रॉम्प्टरचा वापर करतात.
तासानंतर त्याच बातम्या:
  • ठराविक तासांनी बातम्या रिपीट होतात कारण अनेक दर्शक News Updates साठी चॅनेल बदलून बघत असतात.
  • त्यामुळे महत्त्वाच्या बातम्या पुन्हा दाखवल्या जातात.
ॲक्युरसी:
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1040

Related Questions

दूरदर्शन हे कोणते माध्यम आहे?
दूरचित्रवाणी व्यवसायामध्ये काय वापरले जाते?