स्वच्छता
कीटक नाश
कीटकनाशके
रसायने
झुरळ आणि ढेकूण मारण्यासाठी पेस्ट कंट्रोल वाले कोणते केमिकल वापरतात, त्यांची नावे काय आहेत?
3 उत्तरे
3
answers
झुरळ आणि ढेकूण मारण्यासाठी पेस्ट कंट्रोल वाले कोणते केमिकल वापरतात, त्यांची नावे काय आहेत?
21
Answer link
*🐞ढेकणांचा बंदोबस्त करण्याचा नैसर्गिक उपाय*
_____________________
घरातील ढेकूण अत्यंत त्रासदायक कीटक…अल्पावधीतच त्यांची फौज तयार होण्यास वेळ लागत नाही… रात्रीच्या वेळेस तर त्यांचा विशेष त्रास जाणवतो. ते चावले तर त्वचाविकार होतात.हा त्रास दूर करण्यासाठी नियमित पेस्ट कंट्रोल करणे हा उपाय असला तरी यामुळे काही दुष्परिणामही होऊ शकतात. याकरिता ढेकणांना घराबाहेर काढण्यासाठी काही सुरक्षित घरगुती उपाय…
*पुदिना*
ढेकणांना पुदिन्याचा वास असह्य होतो. त्यामुळे या वासाने ते दूर पळतात. यासाठी झोपताना अंथरुणाजवळ पुदिन्याची ताजी पानं पसरवून ठेवा. लहान मुलांच्या पाळण्यातही पुदिन्याची पानं ठेवू शकता. पुदिन्याची पानं चुरून त्याचा रस शरीराला लावून झोपल्यानेही ढेकूण लांब राहतील.
*कडुलिंबाचे तेल*
कडूलिंबामध्ये दाहशामक आणि कीटकनाशक क्षमता आहे. तसेच कडूलिंबातील ऍन्टी मायक्रोबायल गुणधर्म घरातील अनेक कीटकांचा त्रास कमी करण्यासाठी मदत करतात. ढेकणांवर कडूलिंबाच्या तेलाचा शिडकाव करा. या प्रयोगामुळे अवघ्या आठवडाभरात ढेकणांचा त्रास कमी होण्यास मदत होईल. कपडे धुताना डिटर्जंट पावडरसोबत कडुलिंबाच्या तेलाचा समावेश केल्याने ढेकणाचा त्रास कमी होईल.
*टी ट्री ऑईल*
टी ट्री ऑइलमध्ये ऍन्टी मायक्रोबियल गुणधर्म असतात. यामुळे ढेकणांचा त्रास दूर ठेवण्यास मदत होते. टी ट्री ऑईल पाण्यात मिसळून त्याचा स्प्रे बनवा. हा प्रे भिंती, पलंग, कपाटं, पडदे, फर्निचर गाद्यांवर शिंपडा. आठवडाभर जेथे ढेकणांचा हमखास वावर असतो तेथे टी ट्री ऑईलचा स्प्रे केल्याने ढेकणांचा त्रास कमी होईल.
*निलगिरी*
ढेकूण दिसल्यास त्यावर निलगिरीचे काही थेंब शिंपडा. यामुळे ढेकूण दूर जातील. शिवाय रोजमेरी, लॅवेंडर या तेलांमध्ये निलगिरीचे तेल मिसळून त्याचा वापर करा. सर्दी पडशाच्या त्रासाला दूर ठेवण्यासोबतच ढेकणांचा त्रास टाळण्यासाठीही निलगिरी फायद्याची आहे.
*लॅवेंडर तेल*
ढेकणांना दूर ठेवण्यासाठी लॅवेंडरच्या पानांचा वापर करा. लॅवेंडरची पाने कपडय़ांवर घासा. लॅवेंडर परफ्युम शिंपडल्यानेही ढेकूण दूर राहू शकतात. पुदिन्याप्रमाणेच लॅवेंडर तेलाचा वासही ढेकणांना सहन होत नाही. या तेलाच्या सुगंधामुळे प्रसन्नता वाटतेच. शिवाय डास, ढेकूण असे कीटकही दूर राहतात.
______________________

3
Answer link
पेस्ट कंट्रोल वाल्यांची औषधी तर नाही माहिती पण त्यावरील जालीम स्प्रे हवा असेल तर खटनिल घेऊन या खूप जास्त इफेक्टिव्ह आहे...खाली फोटो बघा👇👇


0
Answer link
झुरळ आणि ढेकूण मारण्यासाठी पेस्ट कंट्रोलवाले अनेक प्रकारची रसायने वापरतात. ती रसायने खालीलप्रमाणे:
- पायरेथ्रॉइड्स (Pyrethroids): हे सर्वात जास्त वापरले जाणारे रसायन आहे. ते झुरळांच्या नर्व्हस सिस्टमवर (Nervous System) हल्ला करतात. उदाहरणे: सायपरमेथ्रिन (Cypermethrin), डेल्टामेथ्रिन (Deltamethrin). पायरेथ्रॉइड्स (Pyrethroids) - विकिपीडिया
- फॉस्फेट्स (Phosphates): हे रसायन झुरळांच्या नर्व्हस सिस्टमला ब्लॉक करतात. उदाहरणे: क्लोरपायरीफोस (Chlorpyrifos).
- कार्bamेट्स (Carbamates): हे कीटकनाशक देखील नर्व्हस सिस्टमवर परिणाम करतात. उदाहरणे: प्रोपोक्सर (Propoxur).
- बोरिक ऍसिड (Boric Acid): हे झुरळांच्या शरीरातील पाणी शोषून घेते आणि त्यांना मारते. बोरिक ऍसिड (Boric Acid) - विकिपीडिया
- फिप्रोनिल (Fipronil): हे रसायन झुरळांच्या सेंट्रल नर्व्हस सिस्टमला बाधित करते. फिप्रोनिल (Fipronil) - विकिपीडिया
- इमिडाक्लोप्रिड (Imidacloprid): हे झुरळांच्या नर्व्हस सिस्टमवर परिणाम करते. इमिडाक्लोप्रिड (Imidacloprid) - विकिपीडिया
ढेकूण मारण्यासाठी वापरली जाणारी रसायने:
- पायरेथ्रॉइड्स (Pyrethroids): ढेकणांसाठी हे रसायन स्प्रे (Spray) म्हणून वापरले जाते.
- पायरेथ्रिन्स (Pyrethrins): हे नैसर्गिक कीटकनाशक आहे आणि ढेकणांना मारण्यासाठी वापरले जाते. पायरेथ्रिन्स (Pyrethrins) - विकिपीडिया
- डेल्टामेथ्रिन (Deltamethrin) आणि सायपरमेथ्रिन (Cypermethrin): हे ढेकणांच्या नियंत्रणासाठी प्रभावी आहेत.
- Desiccant Dusts: हे ढेकणांच्या शरीरातील पाणी शोषून घेतात आणि त्यांना मारतात. उदाहरणे: डायटोमेसियस अर्थ (Diatomaceous Earth). डायटोमेसियस अर्थ (Diatomaceous Earth) - विकिपीडिया
टीप: ही रसायने वापरताना योग्य सुरक्षा उपायांचे पालन करणे आवश्यक आहे. लहान मुले आणि पाळीव प्राणी यांच्यापासून दूर ठेवावे. रसायनांचा वापर करण्यापूर्वी लेबल (label) आणि सूचना काळजीपूर्वक वाचा.