कायदा धनादेश अनादर

जर आपल्याला कुणी चेक दिला आणि आपण तो चेक मोडायला बँकेत गेलो आणि त्या व्यक्तीच्या खात्यात पैसे नसले तर त्या व्यक्तीवर काय कार्यवाही होऊ शकते व आपले पैसे कसे मिळतील?

चेक बाउंस होण्याची खालील करणे आहेत:

१) अकौंट मध्ये पुरेसे पैसे नसणे 
२) चेक वरची स्वाक्षरी मॅच न होणे 
३) चेक एक्सपायर होणे 
४) चेक वर काही हुकीची माहिती लिहिलेली असेल
इत्यादी.

चेक बन्स झाला तर तुम्ही ज्याच्याकडून चेक घेतला त्याला कळवू शकता आणि त्याच्याकडून योग्य चेक घेऊ शकता. तो जा जाणूनबुजून चुकीचा चेक देत असेल तर खालील गोष्टी कराव्यात:

स्टेप १) डिमांड नोटीस 

एकदा चेक बाउंस झाल्यानंतर ३० दिवसाच्या आत तुम्हाला चेक पे करणाऱ्या व्यक्तीला नोटीस पाठवणे गरजेचे आहे. या नोटीस मध्ये तुम्ही जर चेक १५ दिवसाच्या आत क्लीयर नाही झाला तर कायदेशीर कारवाई करण्याचे सूचित करा.  नोटीस देण्यासाठी तुम्ही वकिलाचीही मदत घेऊ शकता किंवा स्वतः नोटीस पाठवू शकता. नोटीस साठी ठराविक असा फॉरमॅट नाही परंतु नोटीस मध्ये खालील गोष्टींचा उल्लेख असणे गरजेचे आहे:
१) चेक योग्य वेळेत जमा केल्याचा तारखेसहित उल्लेख
२) किती पैसे देणे आहेत याचा उल्लेख 
३) चेक बाउंस झाल्याची बँकेने दिलेली माहिती (करणासहित)
४) नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसात पैसे देण्याची मागणी 

स्टेप २) कम्पलेंन करणे:

जर १५ दिवसात पैसे दिले नाहीत तर तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता . त्यासाठी तुम्हाला मॅजिस्ट्रेट कडे तक्रार करावी लागेल. जिथे चेक बाउंस झाला, जिथून चेक घेतला, तसेच जिथून तुम्ही नोटीस पाठवली अश्या कोणत्याही भागातील मॅजिस्ट्रेट कडे तक्रार देऊ शकता. यासाठी तक्रार, शपथपत्र, आणि केस संबंधित सर्व डोकमेंट्स ची झेरॉक्स लागते. 
यासाठी अधकि माहितीसाठी खालील लिंक पहा:

स्टेप ३) कोर्ट प्रोसिडिंग :

१) कोर्ट फी :

Amount on cheque

Court fee

Rs. 0 to Rs. 50,000/-

Rs. 200

Rs. 50,000/- to Rs. 2,00,000/-

Rs. 500

Above Rs. 2,00,000/-

Rs. 1000


कोर्टाकडून सगळ्या कागदपत्रांची तपासणी केली जाते. कोर्ट आरोपीला ठराविक तारीख देऊन समन्स बजावते आणि त्याची बाजू ऐकून घेते. जर तो तपासात सहकार्य करत नसेल तसेच कोर्टासमोर हजार राहत नसेल तर कोर्ट अजामीनपात्र वारंट देऊ शकते. सर्व गोष्टींची तपासणी करून कोर्ट योग्य ते निर्णय देते आणि त्यानुसार तुम्हाला पैसे मिळू शकतात. 





या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

जर आपल्याला कुणी चेक दिला आणि आपण तो चेक मोडायला बँकेत गेलो आणि त्या व्यक्तीच्या खात्यात पैसे नसले तर त्या व्यक्तीवर काय कार्यवाही होऊ शकते व आपले पैसे कसे मिळतील?

Related Questions

चेक बाऊन्सची २० टक्के रक्कम मी कोर्टात न भरता कोणत्या पद्धतीने भरू शकतो?
मी एका माणसाला काही रक्कम दिली आहे, पण ती व्यक्ती आता रक्कम देत नाही, पण त्याने मला सही करून एक चेक दिला आहे. मी तो चेक बँकेत जमा केला, तर मला पैसे भेटतील का? पण बँकेत त्यांच्या अकाउंटला पैसे नसतील, तर याचे परिणाम काय होतील, कृपया योग्य माहिती द्या, ही विनंती आहे.
चेक बाऊन्स झाल्यानंतर समोरच्या व्यक्तीला पाठवायच्या नोटीसचा नमुना अर्ज कसा असतो?
एखाद्याने चेक दिला आणि तो बाऊंस झाला तर आपण काही कारवाई करू शकतो का, न्याय किती दिवसात मिळेल, पैसै दिल्याचे माझ्याकडे काही प्रुफ पण नाही आहे ?
चेक बाउन्स झाल्यास कायद्यानुसार शिक्षेची तरतूद काय आहे?