संस्कृती रूढी परंपरा हिंदु धर्म नारळ

भारतात नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, पूजेपासून ते किचनपर्यंत. परदेशात असे पूजा व इतर कार्यांसाठी नारळ वापरले जातात का?

3 उत्तरे
3 answers

भारतात नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, पूजेपासून ते किचनपर्यंत. परदेशात असे पूजा व इतर कार्यांसाठी नारळ वापरले जातात का?

6
परदेशात नारळाचा फक्त खाण्यासाठी उपयोग होतो.
थोड्या प्रमाणात हिंदू लोक ज्या भागात आहेत तेथे मात्र नारळ कधी कधी पूजेला वापरला जातो.
पण ख्रिश्चन धर्मात किंवा इतर धर्मात नारळ या फळाला कुठलेही धार्मिक महत्त्व नसल्याने ते पूजेत नारळ वापरत नाहीत.
उत्तर लिहिले · 18/2/2018
कर्म · 283280
2
फार प्राचीन काळापासून भारतात, नारळाला खाण्यापासून ते धार्मिक कार्यापर्यंत फार महत्त्व आहे. (एवढेच कशाला, एखाद्याला नोकरीतून किंवा इतर काही कामावरून काढून टाकण्याला "हातात नारळ देणे" म्हणण्याएवढे महत्त्व आहे!). 😊 बाकी चंद्रशेखर गारकर साहेबांनी म्हटल्याप्रमाणे परदेशात हिंदू वसाहतीत नारळाला वर म्हटल्याप्रमाणे महत्त्व असून ख्रिश्चनांमध्ये फक्त नारळ खाण्याला महत्त्व आहे.
उत्तर लिहिले · 18/2/2018
कर्म · 91065
0
भारतात नारळाला खूप महत्त्व आहे, हे खरे आहे. पूजा आणि स्वयंपाक अशा दोन्ही कामांसाठी नारळ वापरला जातो.
परदेशात नारळाचा वापर:

भारताबाहेर, नारळाचा वापर धार्मिक किंवा सांस्कृतिक विधींमध्ये तेवढा सर्रास नाही, पण काही ठिकाणी तो आढळतो:

  • दक्षिण-पूर्व आशिया: थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया आणि फिलीपिन्स यांसारख्या देशांमध्ये नारळ धार्मिक विधींमध्ये वापरला जातो. ( Britannica)
  • ओशनिया: प्रशांत महासागरातील बेटांवर नारळ हा तेथील संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे.
  • कॅरिबियन बेटे: वेस्ट इंडीजमध्ये नारळाचा वापर अनेक पदार्थांमध्ये आणि धार्मिक विधींमध्ये केला जातो.

परंतु, या ठिकाणी नारळाचा वापर भारतासारखा विस्तृत आणि विविध प्रकारचा नाही.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1040

Related Questions

चार अक्षर का मेरा नाम, पाणी पीकर करता काम, पाणी मेरा आधा नाम, खाने की चीज हूं, बताओ मेरा पुरा नाम?
नारळाचे चमत्कारिक फायदे, नारळाचे पाणी पिण्याचे फायदे, नारळाचे बहुउपयोगी फायदे?