खरेदी पाणी फिल्टर खरेदी सल्ला घरेलू उपकरणे

मला वॉटर फिल्टर घ्यायचं आहे, कोणत्या कंपनीचं घेऊ?

2 उत्तरे
2 answers

मला वॉटर फिल्टर घ्यायचं आहे, कोणत्या कंपनीचं घेऊ?

7
बोरिंगचे पाणी जड आहे असे तुम्हाला वाटत असेल तर प्रथम पाण्याचा TDS(Total dissolved solids) तपासा. ते शक्य नसेल तर पाण्यात डिटर्जन पावडर टाकून बघा, पाण्याला फेस कमी येत असेल तर पाणी जड आहे हे समजावे. पाण्याचा TDS हा त्यात विरघळलेल्या क्षारांमुळे वाढतो. नेमक्या कोणत्या क्षारांमुळे पाण्याचा TDS वाढला हे TDS तपासणीत कळत नाही. त्यामुळे कधीकधी २०० TDS असलेले पाणी त्यात विरघळलेल्या विषारी क्षारांमुळे पिण्यायोग्य नसू शकते तर ५०० TDS असलेले पाणी आरोग्यास हानिकारक नसलेल्या क्षारांमुळे पिण्यायोग्य असू शकते. आजुबाजुला औद्योगिक रासायनिक सांडपाणी जमिनीत मुरत असेल तर तेथील पाणी दुषित होण्याची शक्यता असते. शेतीतील पाण्यात खतातील व किटकनाशकातील विषारी द्रव्ये असतात ती जमीनीखालील पाण्याचे स्रोत दुषित करतात. त्यामुळे आजुबाजुल असे पाणी दुषित करणारे घटक आहेत का ह्याची खात्री करुन घ्यावी.

पाणी पिण्यास अयोग्य आहे अशी खात्री झाल्यास RO फिल्टर वापरणे हे योग्य राहील. पाण्याचे उर्ध्वपातन यंत्र वापरुनही पिणायोग्य पाणी मिळवता येते, परंतू त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी मिळू शकत नाही व त्यास जागाही जास्त लागते. RO फिल्टरचा TDS शक्यतो १००- १५० च्या आसपास ठेवावा त्यापेक्षा कमी नको.
१५० च्या TDS ला उत्कृष्ट प्री आणि पोस्ट फिल्टर वापरलेल्या RO तून दुप्पट पाणी वाया जाते.जितका कमी TDS ठेवाल तितके जास्त पाणी वाया जाते. आपली दिवसाला पिण्याच्या पाण्याची गरज ३० लिटर असेल तर फक्त ६० लिटर पाणी वाया जाते. अर्थात हे पाणी बागकामाला वापरता येते, बाथरूम, फरशी साफ करायला वापरता येते. क्षार अधिक असल्यामुळे हे पाणी कपडे धुण्यासाठी वापरता येत नाही.

बाजारात अनेक प्रकारचे अनेक कंपन्यांचे दर्जाप्रमाणे व पाणी फिल्टर करण्याच्या वा साठवण्याच्या क्षमतेप्रामाणे रु ५०००/- पासून RO फिल्टर उपलब्ध आहेत. आपली गरज ठरवून RO फिल्टर घेणे कधीही योग्य राहील. जेथे सरकारी पाणी शुद्ध करुन नळावाटे पुरवले जाते त्यांनी महागड्या RO फिल्टरच्या नादी लागू नये. त्यांच्या करता बरेच स्वस्त पर्याय उपल्ब्ध आहेत. 

उत्तर लिहिले · 19/2/2018
कर्म · 38690
0
वॉटर फिल्टर (Water Filter) घेताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे तुम्हाला योग्य निवड करता येईल:
  • पाण्याची गुणवत्ता: तुमच्या এলাকার पाण्यातील TDS (Total Dissolved Solids) किती आहे हे तपासा. त्यानुसार तुम्हाला RO (Reverse Osmosis), UV (Ultraviolet), किंवा Activated Carbon फिल्टरची गरज आहे की नाही हे ठरेल.
  • पाण्याची गरज: तुमच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या किती आहे, त्यानुसार फिल्टरची क्षमता (Capacity) ठरवा.
  • बजेट: तुमच्या बजेटनुसार विविध कंपन्या आणि मॉडेल्स उपलब्ध आहेत. त्यामुळे किंमत आणि वैशिष्ट्ये यांचा विचार करून निवड करा.
  • देखभाल खर्च: फिल्टरची नियमित सर्व्हिसिंग (Servicing) आणि फिल्टर बदलण्याचा खर्च किती आहे, हे देखील तपासा.
काही लोकप्रिय कंपन्या:
  • Eureka Forbes: ही कंपनी RO आणि UV दोन्ही प्रकारचे फिल्टर पुरवते. यांची सर्व्हिसिंग (Servicing) चांगली आहे आणि देशभरात उपलब्धता आहे.

    अधिक माहितीसाठी: Eureka Forbes Official Website

  • Aquaguard: हे पण एक लोकप्रिय नाव आहे आणि विविध प्रकारच्या फिल्टरमध्ये उपलब्ध आहे.

    अधिक माहितीसाठी: Aquaguard Official Website

  • Kent: Kent RO फिल्टर त्यांच्या उच्च प्रतीसाठी ओळखले जातात. हे TDS कंट्रोलर (TDS Controller) आणि मिनरल रिटेन्शन टेक्नॉलॉजी (Mineral Retention Technology) वापरतात.

    अधिक माहितीसाठी: Kent Official Website

  • Livpure: हे UV आणि RO दोन्ही फिल्टर देतात आणि हे त्यांच्या आकर्षक डिझाइनसाठी ओळखले जातात.

    अधिक माहितीसाठी: Livpure Official Website

निवड कशी करावी:
  1. तज्ञ सल्ला: एखाद्या वॉटर फिल्टर एक्सपर्ट (Water Filter Expert) किंवा विक्रेत्याचा सल्ला घ्या.
  2. ऑनलाइन रिव्ह्यू: विविध वेबसाईट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर (E-commerce platform) उपलब्ध असलेल्या रिव्ह्यू (Review) वाचा.
  3. डेमो: शक्य असल्यास, फिल्टरचा डेमो (Demo) पाहून घ्या.

आशा आहे, या माहितीमुळे तुम्हाला योग्य वॉटर फिल्टर निवडण्यास मदत होईल.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 980

Related Questions

डास मारण्याचे racket कोणत्या कंपनीचे घ्यावे जे कमीतकमी एक वर्ष टिकेल?
दिवाण आणि सोफा गॅरेजवाले आणून देतात का? मला 90 km अंतरावर आणायला किती खर्च येणार?
चांगले रेफ्रिजरेटर सुचवा?
मला स्वस्त आणि टिकाऊ कूलर घ्यायचे आहे, कोणते घ्यावे, सुचवा?