Topic icon

घरेलू उपकरणे

1
Spartan. किंवा swag कंपनीचे रॅकेट तुम्ही घेऊ शकता.
उत्तर लिहिले · 14/1/2020
कर्म · 18385
0

मला नक्की माहिती नाही की दिवाण आणि सोफा गॅरेजवाले आणून देतात का. बहुतेक गॅरेजवाले हे काम करत नाहीत, कारण ते गाड्या दुरुस्त करण्याचे काम करतात. तरी, तुम्ही तुमच्या जवळच्या गॅरेजमध्ये विचारू शकता.

९० किलोमीटर अंतरावर दिवाण आणि सोफा आणायला किती खर्च येईल, हे सांगणे कठीण आहे. अनेक गोष्टींवर खर्च अवलंबून असतो, जसे की:

  • वस्तू किती मोठ्या आहेत: मोठा दिवाण आणि सोफा असल्यास जास्त खर्च येऊ शकतो.
  • वस्तूंचे वजन: वजन जास्त असल्यास गाडी भाड्याने घ्यावी लागेल आणि त्यामुळे खर्च वाढेल.
  • अंतरावर: ९० किलोमीटर अंतरासाठी लागणारा टोल आणि पेट्रोलचा खर्चadd होईल.
  • वाहतूकदाराचा प्रकार: तुम्ही कोणत्या वाहतूकदाराला निवडता यावर खर्च अवलंबून असतो.

तुम्ही खालील पर्याय वापरू शकता:

  1. जवळच्या फर्निचर दुकानांमध्ये चौकशी करा: काही फर्निचर दुकाने स्वतःDelivery आणि Installation सेवा देतात. त्यांच्याशी संपर्क साधा आणि खर्चाबद्दल माहिती घ्या.
  2. ऑनलाईन ॲप्स: NoBroker, Porter, किंवा Shifting Wale यांसारख्या ॲप्सवरून तुम्ही फर्निचर ट्रान्सपोर्ट करू शकता. त्यांच्या ॲपवर तुम्हाला अंदाजे खर्च कळू शकेल.

टीप: खर्च विचारताना तुमच्या वस्तूंचे आकारमान आणि वजन नक्की सांगा.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 980
5
फ्रिज हे लीटर कॅपसिटी मध्ये मिळतात आणि तुम्हाला कसा पाहिजे आहे छोटा की मोठा यावरून ठरवता येईल त्यासाठी तुम्ही शॉप मध्ये जाऊन चौकशी करू शकता आणि राहिला प्रश्न ब्रँड चा तर साध्य सर्वांमध्ये कॉम्पिटीशन चालू आहे कमी किमतीत चांगले प्रॉडक्ट
त्यामुळे कुठलाही घेतला तरी फरक पडत नाही
उत्तर लिहिले · 2/5/2018
कर्म · 13415
7
बोरिंगचे पाणी जड आहे असे तुम्हाला वाटत असेल तर प्रथम पाण्याचा TDS(Total dissolved solids) तपासा. ते शक्य नसेल तर पाण्यात डिटर्जन पावडर टाकून बघा, पाण्याला फेस कमी येत असेल तर पाणी जड आहे हे समजावे. पाण्याचा TDS हा त्यात विरघळलेल्या क्षारांमुळे वाढतो. नेमक्या कोणत्या क्षारांमुळे पाण्याचा TDS वाढला हे TDS तपासणीत कळत नाही. त्यामुळे कधीकधी २०० TDS असलेले पाणी त्यात विरघळलेल्या विषारी क्षारांमुळे पिण्यायोग्य नसू शकते तर ५०० TDS असलेले पाणी आरोग्यास हानिकारक नसलेल्या क्षारांमुळे पिण्यायोग्य असू शकते. आजुबाजुला औद्योगिक रासायनिक सांडपाणी जमिनीत मुरत असेल तर तेथील पाणी दुषित होण्याची शक्यता असते. शेतीतील पाण्यात खतातील व किटकनाशकातील विषारी द्रव्ये असतात ती जमीनीखालील पाण्याचे स्रोत दुषित करतात. त्यामुळे आजुबाजुल असे पाणी दुषित करणारे घटक आहेत का ह्याची खात्री करुन घ्यावी.

पाणी पिण्यास अयोग्य आहे अशी खात्री झाल्यास RO फिल्टर वापरणे हे योग्य राहील. पाण्याचे उर्ध्वपातन यंत्र वापरुनही पिणायोग्य पाणी मिळवता येते, परंतू त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी मिळू शकत नाही व त्यास जागाही जास्त लागते. RO फिल्टरचा TDS शक्यतो १००- १५० च्या आसपास ठेवावा त्यापेक्षा कमी नको.
१५० च्या TDS ला उत्कृष्ट प्री आणि पोस्ट फिल्टर वापरलेल्या RO तून दुप्पट पाणी वाया जाते.जितका कमी TDS ठेवाल तितके जास्त पाणी वाया जाते. आपली दिवसाला पिण्याच्या पाण्याची गरज ३० लिटर असेल तर फक्त ६० लिटर पाणी वाया जाते. अर्थात हे पाणी बागकामाला वापरता येते, बाथरूम, फरशी साफ करायला वापरता येते. क्षार अधिक असल्यामुळे हे पाणी कपडे धुण्यासाठी वापरता येत नाही.

बाजारात अनेक प्रकारचे अनेक कंपन्यांचे दर्जाप्रमाणे व पाणी फिल्टर करण्याच्या वा साठवण्याच्या क्षमतेप्रामाणे रु ५०००/- पासून RO फिल्टर उपलब्ध आहेत. आपली गरज ठरवून RO फिल्टर घेणे कधीही योग्य राहील. जेथे सरकारी पाणी शुद्ध करुन नळावाटे पुरवले जाते त्यांनी महागड्या RO फिल्टरच्या नादी लागू नये. त्यांच्या करता बरेच स्वस्त पर्याय उपल्ब्ध आहेत. 

उत्तर लिहिले · 19/2/2018
कर्म · 38690
3
Nagpuri cooler mast swast ahe
...........


...



....
उत्तर लिहिले · 14/4/2017
कर्म · -1940