3 उत्तरे
3
answers
पानिपतच्या पहिल्या युद्धाविषयी माहिती मिळेल का?
18
Answer link
इ. स. 1526 मध्ये दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आली. तेथे मुघल सत्तेची स्थापना झाली.
बाबर :- बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होय. तो मध्य आशियातील फरघाना राज्याचा राजा होता. मध्य आशियातील सत्तास्पर्धैत त्याला स्थैर्य लाभले नाही. त्याने अफगाणिस्तानातील काबूल, गझनी आणि त्याच्या आसपासचा प्रदेश जिंकून घेतला. अफगाणिस्तानमध्ये त्याने आपली सत्ता स्थिर केली. भारतातील संपत्तीसंबंधीचे वर्णन त्याने ऐकलेले होते. म्हणूनच त्याने भारतावरील स्वारीची आखणी केली.
पानिपतचे पहिले युद्ध :- दिल्लीमध्ये इब्राहीम लोदी हा सुलतान राज्यकारभार करत होता. सुलतानशाहीतील पंजाबच्या प्रदेशात दौलतखान लोदी हा प्रमुख अधिकारी होता. इब्राहीम लोदी आणि दौलतखान लोदी यांच्या संबंधात तणाव निर्माण झाला. दौलतखानाने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबाराला निमंत्रित केले. ही संधी साधून बाबराच्या आक्रमणास विरोध करण्याकरिता इब्राहीम लोदी सैन्य घेऊन निघाला. इब्राहीम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये 21 एप्रिल 1526 या दिवशी पानिपत या ठिकाणी युद्ध झाले. या युद्धात बाबराने प्रथमच तोफखान्याचा प्रभावी उपयोग केला. इब्राहीम लोदीच्या सैन्याचा पराभव केला. या युद्धानंतर बाबर पुढे दिल्लीकडे गेला. भारताच्या इतिहासात ही पानिपतचे पहिले युद्ध म्हणून ओळखले जाते.......

4
Answer link
पानिपतची पहिली लढाई उत्तर हिंदुस्थानात पानिपत गावाजवळ १५२६ साली अफगाण योद्धा बाबर व इब्राहिम यांच्यात झाली.
हे युद्ध बाबर व इब्राहीम लोदी यांमध्ये दिल्लीच्या तक्ताकरिता २१ एप्रिल १५२६ मध्ये झाले. उत्तर भारतात मुसलमानी राजवट सुरू जाल्यापासून बाबरपर्यंत जे सुलतान झाले ते बहुतेक अफगाण होते, मोगल नव्हते. धर्माने हे सर्व एक असले, तरी राज्यतृष्णेत एक नव्हते, खल्जी, तुघलक, सय्यद आणि लोदी या वंशांतील सर्व सुलतान भारतात आपले राज्य कायम टिकावे या प्रयत्नात होते. यामुळे मोगलांच्या भारतावर होणार्या स्वार्यांना हे सुलतान सतत विरोध करीत आले. बाबर, तुर्क व मोगल या दोन रक्तांचा वाररसदार होता. त्याने अफगाणिस्तान व मध्य आशिया या दोन प्रदेशांत आपले राज्य स्थिर करण्याचा प्रयत्न केला; पण त्यात त्यास म्हणावे तसे यश आले नाही. म्हणून त्याने आपले लक्ष भारताकडे वळविले. भारतात आपले राज्य स्थिर करण्याच्या उद्देशाने त्याने भारतावर पाच-सात स्वार्या केल्या. त्या सर्व स्वार्यांत त्यास उणे अधिक यश मिळत गेले. यामुळे भारतात राज्य स्थापण्याचा त्याने पक्का निश्चय केला. त्याची शेवटची स्वारी याच हेतूने झाली होती. त्या वेळी भारतात लोदी घराण्यातील इब्राहीमचे राज्य चालू होते. या इब्राहीम लोदीला काही प्रतिस्पर्धी होते. त्यांपैकी एक त्याचा चुलता आलमखान लोदी व दुसरा पंजाबचा सुभेदार दौलतखान लोदी. या दोघांनीही बाबरास पत्र लिहून कळविले, की ‘आम्हास गादीवर बसविण्यास मदत केली, तर लोदी राजवटीच्या ताब्यात असलेल्या प्रदेशांपैकी काही प्रदेश आपणास देऊ व आपली अधिसत्ता मानू’. बाबर आपल्या हेतूच्या पूर्तीसाठी अशा संधीची वाटच पहात होता. ही पत्रे जाताच त्याने भारतावर स्वारी करण्याचे ठरवले. तो आपले सैन्य घेऊन भारतात आला. या वेळी दौलतखान व त्याच्या एक मुलगा दिलावरखान यांमध्ये वितुष्ट येऊन तो बाबरास मिळाला होता. बाबर भारतात आला असे पाहून इब्राहीमखान लोदी हा त्याच्याशी लढाई देण्याची तयारी करू लागला. बाबर तोपर्यंत पानिपतच्या जवळ पोहोचला होता; देव्हा इब्राहीम लोदी हाही पानिपतजवळ बाबाराशी लढाई करण्याच्या उद्देशाने आला. दोघांचे सैन्य पानिपतजवळ तळ देऊन राहिले. सु. आठ दिवस किरकोळ चकमकीशिवाय लढाई अशी झाली नाही; पण २१ एप्रिल १५२६ रोजी दोघांची पानिपतच्या मैदानावर मोठी लढाई झाली. या लढाईत इब्राहीमखानाच्या बाजूस एक लाख शिफाई होते, तर बाबारकडे सु. २५ हजार लोक होते असे म्हणतात; पण बाबराने या लढाईत आपल्या सैन्याची अशा रीतीने मांडणी केली की, लढाई सुरू होताच बाबरच्या सैन्याने इब्रहीमच्या सैन्याला पाठीमागून जाऊन घेरले. यामुळे इब्राहीम लोदीच्या सैन्यात गोंधळ उडाला. इब्राहीम शौर्याने लढला, तरी तो मारला गेला. पुढे त्याच्या सैन्याचा सर्वस्वी नाश होऊन बाबरास जय मिळाला. अशा तर्हेने जय मिळविल्यावर बाबरने दिल्लीस जाऊन राज्य विस्तृत करण्याचा प्रयत्न केला.

0
Answer link
पानिपतचे पहिले युद्ध 21 एप्रिल 1526 रोजी दिल्ली सल्तनतचा शेवटचा शासक इब्राहिम लोदी आणि मुघल शासक बाबर यांच्यात झाले. हे युद्ध भारताच्या इतिहासामधील निर्णायक युद्धांपैकी एक मानले जाते.
युद्धाची पार्श्वभूमी:
- बाबर हा मध्य आशियातील एक महत्त्वाकांक्षी शासक होता. त्याला भारतात आपले साम्राज्य वाढवायचे होते.
- इब्राहिम लोदी हा दिल्ली सल्तनतचा कमजोर शासक होता. त्याच्या राज्यात अनेक समस्या होत्या.
- बाबरला भारतातील काही शासकांनी लोदीविरुद्ध मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
युद्धाची तयारी:
- बाबरने आपल्या सैन्याला आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज केले होते. त्याच्याकडे तोफा आणि कुशल घोडदळ होते.
- लोदीकडे मोठी सेना होती, परंतु त्याच्या सैन्यात एकजूट नव्हती आणि त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रे नव्हती.
युद्धाचा घटनाक्रम:
- युद्ध 21 एप्रिल 1526 रोजी पानिपतच्या मैदानावर झाले.
- बाबरने आपल्या सैन्याची विभागणी योग्य प्रकारे केली आणि तोफांचा प्रभावीपणे वापर केला.
- लोदीच्या सैन्याने शौर्याने लढा दिला, परंतु ते बाबरच्या आधुनिक शस्त्रांसमोर टिकू शकले नाहीत.
- इब्राहिम लोदी युद्धात मारला गेला आणि बाबर विजयी झाला.
युद्धाचे परिणाम:
- दिल्ली सल्तनतचा अंत झाला आणि भारतात मुघल साम्राज्याची स्थापना झाली.
- बाबरने दिल्ली आणि आग्रा या शहरांवर कब्जा केला.
- या युद्धाने भारताच्या राजकीय आणि सामाजिक रचनेत मोठे बदल घडवले.
अधिक माहितीसाठी आपण खालील दुवे पाहू शकता: