2 उत्तरे
2
answers
१६ व्या लुईच्या हत्येची कारणे कोणती?
0
Answer link
लुई १६ वा (१७५४ - १७९३) :- याची बायको ऑस्ट्रियाच्या मरायाथेरेसाची मुलगी मेरी ऍंटोइन. हा वीस वर्षांचा असतां याचा आजा १५ वा लुई वारला. व १७७४ त हा गादीवर आला. फ्रान्सची सांपत्तिाक स्थिति जी अत्यंत खालवली होती, ती त्यावेळचा मुत्सद्दी टर्गो यानें सुधारली. परंतु दोन वर्षांनीं लुईनें, टर्गोच्या सुधारणांमुळें ज्या पिढीजाद लोकांच्या हक्कांवर पाणी पडण्याची वेळ आली होती त्यांच्या कारस्थानाला भुलून टर्गोला काढून टाकलें. पुढें राणी मेरीनें लुईवर छाप पाडून कारभार आपल्या हातीं घेतला व कॅलोन नांवाचा उधळेखोर प्रधान नेमला; त्यामुळें जमाखर्चांत मोठा गोंधळ माजून शेवटीं त्याचें जगप्रसिद्ध फ्रेंचराज्यक्रांतीमध्यें पर्यवसान झालें. त्याच्या कारकीर्दीच्या तिसर्या भागास १७८९ मे ता. ४ रोजीं सुखात झाली. त्या दिवशीं त्यानें 'देशसभा' बोलावली आणि त्याच दिवशीं राज्यक्रांतीला सुरवात झाली. प्रथम पॅरिसमध्येंच बंड झालें; बंडखोरांनीं बॅस्टिल तुरुंग सर करून प्रथम राजकीय व इतर सर्व कैद्यांची सुटका केली. पुढें त्यांनीं राजाला व त्याच्या कुटुंबियांनां कैद करून टयूलेरिस येथें अटकेंत ठेविलें. तथापि देशांत पुष्कळ लोकांमध्यें राजनिश्ठा कायम होती. राजानेंहि नवीन राज्यघटना मान्य केली, याप्रमाणें १७९० च्या जुलैपर्यंत राजा लोकप्रिय होता. पुढें १७९१ त राजानें फ्रान्समधून गुप्तपणें पळून जाण्याचा प्रयत्न केला पण तो फसला; त्यावेळीं नव्या राज्यक्रांतीला विरोधी अशा मजकुराचा राजाला गुप्तपत्रव्यवहार प्रसिद्ध झाला. तेव्हां क्रांतिकारकांच्या एका पक्षानें राजाला पदच्युत करण्याचा प्रयत्न केला; त्यानें राजाला ऑस्ट्रियाबरोबर युद्ध सुरू करण्यास लाविलें. पण त्यांत अपयश आलें. त्यामुळें सर्व देश राणी व राजा या दोघांविरुद्ध फार चिडून गेला. तेव्हां टयूलिरिसवर हल्ला करून क्रांतिकारकांनीं राजाला व त्याच्या बायकामुलांनां आपल्या कबजांत घेतलें; व 'राष्ट्र-परिषद' भरविली. त्या परिषदेनें १७९२ सप्टेंबर ता. २१ रोजीं राजशाही नष्ट केल्याचें जाहीर केलें, नंतर लवकरच राजाची देशद्रोहाच्या आरोपावरून चौकशीं झाली; त्यांत त्यावर आरोप शाबीत होऊन त्याला मरणाची शिक्षा सांगण्यांत आली. व त्याप्रमाणें १६ व्या लुई राजाचा १७९३ जानेवारी ता. २१ रोजीं वध करण्यांत आला. हा राजा स्वभावानें अगदीं दुबळा व बुद्धीचा मंद होता. तथापि त्यानें शेवटल्या चौकशीच्या व वधाच्या प्रसंगीं जें धैर्य व मानीपणा दाखविला त्यामुळें देशामध्यें त्याचा बराच नांवलौकिक झाला; त्याच्या खाजगी डायरीवरून त्याला राजकारण कशाशीं खातात हें मुळींच कळत नव्हतें. शिकारीचा काय तो त्याला मोठा नाद असे. त्यानें १७८९ जुलै १४ तारखेला म्हणजे सर्व यूरोप हालवून सोडणारी फ्रेंच राज्यक्रांति ज्या दिवशीं झाली त्या दिवशीं आपल्या डायरींत ''नथिंग'' म्हणजे कांहीं नाहीं असें लिहिलें आहे. फ्रान्सच्या वैभवशाली दरबाराला हा राजा मुळींच शोभत नसे; कॅथोलिक धर्मावर त्याची श्रद्धा होती त्यामुळें पोपला तो मानीत असे; पण त्यामुळें राज्यक्रांतीच्या कालीं त्याच्या संकटांत उलट भर पडली. त्याच्या सर्व धोरणांत दुबळेपणा व खोटेपणा भरलेला होता. राज्यक्रांति झाली ती त्याच्या पूर्वजांच्या दुष्कृत्यामुळें झाली; व हा गरीब बिचारा उगाच बळी पडला असें कित्येकांचें मत आहे.
0
Answer link
सोळाव्या लुईच्या हत्येची कारणे:
- राजेशाही उलथून टाकणे: फ्रेंच राज्यक्रांतीदरम्यान (French Revolution) फ्रान्समध्ये राजेशाही उलथून टाकण्यात आली. लुई हे फ्रान्सचे राजे होते आणि त्यांना विरोध करणे म्हणजे राजेशाहीला विरोध करणे होते.
- देशद्रोह: लुई यांच्यावर देशाদ্রোহ केल्याचा आरोप होता. परकीय शक्तींना फ्रान्सवर आक्रमण करण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
- क्रांतीकारी बदल: फ्रान्समध्ये क्रांतीकारी बदल अपेक्षित होते आणि लुई हे बदलांच्या विरोधात उभे होते, त्यामुळे त्यांना विरोध करणे भाग होते.
- सार्वजनिक दबाव: त्यावेळच्या जनतेचा प्रचंड दबाव होता की लुई यांना शासन केले जावे.
- राजेशाहीचे उच्चाटन: फ्रांसमध्ये राजेशाही पूर्णपणे नष्ट करण्याचा निर्धार जनतेने केला होता, ज्यामुळे लुई XVI यांना मृत्युदंड देणे आवश्यक होते.
या कारणांमुळे १६ व्या लुईला (Louis XVI) फाशी देण्यात आली, ज्यामुळे फ्रान्सच्या इतिहासाला एक नवीन वळण मिळालं.