प्रशासन शिवाजी महाराज इतिहास महाराष्ट्राचा इतिहास

शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत, त्यांच्या अष्टप्रधान मंडळात पेशवा ही उपाधी कोणाकडे होती?

2 उत्तरे
2 answers

शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत, त्यांच्या अष्टप्रधान मंडळात पेशवा ही उपाधी कोणाकडे होती?

2
पेशवे मराठा साम्राज्याचे पंतप्रधानपद होते.
साम्राज्याच्या उत्तरार्धात पेशवेच साम्राज्याचे शासक होते. पेशव्यांची राजधानी पुणे येथे होती.

पेशवा हा बहुधा पर्शियन शब्द असून त्याचा अर्थ 'सर्वात पुढे असलेला' असा आहे. दख्खनमध्ये त्या शब्दाचा मुस्लिम शासकांकडून प्रयोग केला गेला. 
मराठा साम्राज्याचा जनक असलेल्या शिवाजी महाराज, त्यांच्या इ.स. १६७४मध्ये राज्याभिषेकानंतर कारभाराच्या सोयीसाठी अष्टप्रधान मंडळ नेमले, आणि त्या मंडळाचा प्रमुख म्हणून मोरोपंत त्रिंबक पिंगळे यांना नेमले. असे असले तरीही सोनोपंत डबीर हे पहिला पेशवा असल्याचे मानले जाते. पेशव्यांचे कार्य व अधिकार हे मुख्य प्रधानाच्या समकक्ष होते. शिवाजी महाराजांनी या पदाचे सन १६७४ मध्ये पंतप्रधान असे नामकरण केले. परंतु ते नाव त्या काळात त्यामानाने अधिक वापरले गेले नाही. मात्र आज कोणत्याही देशाच्या मंत्रिमंडळ प्रमुखाला मराठीत पंतप्रधानच म्हणतात.

खरे तर पेशवा म्हणजे छत्रपतींचा सरकारकून. पण श्रीवर्धनकर भट घराण्यातील पेशव्यांनी मुलकी आणि लष्करी अशा दोन्ही आघाड्यांवर असा पराक्रम गाजवला की लोकांनी त्यांना सहजच श्रीमंत हा किताब दिला.हा किताब पेशव्यांनी १०४ वर्षे टिकवून ठेवला. पेशवे दिल्लीच्या बादशहाचे नोकर नव्हते आणि छत्रपतींचे मांडलिकही नव्हते. ते होते छत्रपतींचे एकनिष्ठ सेवक होते. पण अतिशय पराक्रमी असून बहुतेक सर्व पेशवे हे अल्पायुषी होते. त्यामुळे राज्यात विद्या, कला यांची वाढ करण्यासाठी त्यांना स्वस्थता मिळाली नाही पेशव्यांची कारकीर्द म्हणजे सततची युद्धमोहीम असे चित्र उभे राहिले. सरदार मुजोर झाले आणि उत्तर आणि दक्षिण दोन्हीकडे मित्र जोडण्याऐवजी शत्रू वाढत गेले. नाना फडणविसांच्यानंतर इंग्रजांच्या उद्योगांकडे पेशव्यांचे दुर्लक्ष झाले, आणि ब्राह्मण पेशव्यांनी मराठी राज्य घालविले ही अपकीर्ती पदरी आली. त्यामुळे १०४ वर्षांची पेशवाईची कारकीर्द झाकोळली गेली.

पेशव्यांची कारकीर्द

श्रीवर्धनकर (भट) देशमुख घराण्यातील पेशवे

श्रीवर्धनकर (भट) देशमुख घराण्यातील पेशव्यांच्या कारकिर्दीचा काळ असा होता:

बाळाजी विश्वनाथ पेशवे (इ.स.१७१४-१७२०)पहिले बाजीराव पेशवे (इ.स.१७२०-१७४०)बाळाजी बाजीराव पेशवे ऊर्फ नानासाहेब पेशवे (इ.स.१७४०-१७६१)माधवराव बल्लाळ पेशवे ऊर्फ थोरले माधवराव पेशवे (इ.स.१७६१-१७७२)नारायणराव पेशवे (इ.स.१७७२-१७७४)रघुनाथराव पेशवे (अल्पकाळ)सवाई माधवराव पेशवे (इ.स.१७७४-१७९५)दुसरे बाजीराव पेशवे (इ.स.१७९६-१८१८)दुसरे नानासाहेब पेशवे (गादीवर बसू शकले नाहीत)

पेशवाईतील स्त्रिया

पेशवे कुटुंबातील सख्खे-सावत्र, चुलत व दत्तकपुत्र असलेल्या तमाम पुरुषांच्या विवाहांमुळे सुमारे ५५-६० सुस्वरूप ब्राह्मण स्त्रिया पेशवे घराण्यात सासुरवाशिणी म्हणून आल्या. या सगळ्याव स्त्रिया अतिशय सुरेख आणि हुशार होत्या. बाळाजी विश्वनाथ यांची पत्‍नी राधाबाई यांना इतक्या सुरेख वधू मिळतात तरी कुठे, असा प्रश्न छत्रपती शाहूमहाराजांच्या राणीवंशाला पडत असे. म्हणून पेशव्यांकडील विवाह समारंभांना देखणी वधू बघण्यासाठी त्या स्त्रिया आवर्जून येत असत.

आनंदीबाई : रघुनाथराव ऊर्फ राघोबादादांची पत्‍नी, ओकांची कन्याकाशीबाई : थोरल्या बाजीरावांची पत्‍नी (चासचे सावकार महादजी कृष्ण जोशी यांची कन्या)गंगाबाई : नारायणराव पेशव्यांची पत्‍नी, कृष्णाजी हरी साठे यांची कन्यागोपिकाबाई : बाळाजी बाजीराव यांची पत्‍नी, माहेरची रास्ते-गोखले.पार्वतीबाई : सदाशिवरावभाऊंची पत्‍नीमस्तानी : थोरल्या बाजीरावांची पत्‍नी, राजा छत्रसालाची मानसकन्या. मस्तानीची त्वचा इतकी पातळ होती की विड्याच्‍या पानाचा रस गिळताना तो तिच्या गळ्यातून ओघळताना दिसे.यमुनाबाई : बापू गोखले यांच्या दोन पत्‍नींपैकी एक. यमुनाबाई बापूंच्या मृत्यूनंतर सातार्‍यास जाऊन राहिली. तिला मूलबाळ नव्हते. पहिलीस दोन पुत्र होते. त्यांपैकी एक लहानपणीच वारला व दुसरा गोपाळ हा अष्टीच्या लढाईत मारला गेला.यशोदाबाई : सवाई माधवरावांची दुसरी पत्‍नीरमाबाई : सवाई माधवरावांची पहिली पत्‍नी, थत्ते यांची कन्यारमाबाई : थोरले माधवराव पेशवे यांची पत्‍नी, सोलापूरकर यांची कन्या; ही सती गेली.राधाबाई : बाळाजी विश्वनाथ यांची पत्‍नी, थोरल्या बाजीरावांची आई, माहेरची बर्वे. नेवरे येथील दादाजी मल्हार बर्वे यांची कन्या. विवाहप्रसंगी राधाबाई ७ वर्षाच्या होत्या. त्यांना दोन पुत्र (थोरले बाजीराव आणि चिमाजी अप्पा) आणि तीन कन्या होत्या. या सर्व मुलांना त्यांनी लेखन जमाखर्च आणि त्याचबरोबर लष्करी आणि युद्धशास्त्राचे शिक्षण दिले.लक्ष्मीबाई : विश्वासराव यांची पत्‍नी, नाशिकचे पटवर्धन यांची कन्या; ही पानिपतच्या युद्धप्रसंगी हरवली.वाराणशीबाई : आनंदीबाईंची सून. यांनी युद्धकला अवगत केली होती. पण आयुष्याच्या अखेरीस त्या दुर्दैवी ठरल्या.

दुसरे बाजीराव ऊर्फ रावबाजी यांना ११ बायका होत्या, त्या अशा:

अभ्यंकर यांची कन्या (धाकट्या) सत्यभामाबाईआठवले यांची कन्यागोखल्यांची मुलगी.
पेंडसे यांची कन्या सरस्वतीबाई फडके यांची कन्या राधाबाई भागवतांची कन्या भागीरथीबाई मंडलीक यांची कन्या (थोरल्या) सत्यभामाबाईमराठे यांची कन्या लक्ष्मीबाईरिसबूड यांची कन्या गंगाबाईवाईकर रास्ते यांची कन्या वाराणशीबाई. ह्यांचा संस्कृत भाषेचा चांगला अभ्यास होता. स्त्रियांना सर्वसाधारणपणे कसलेही शिक्षण देण्याचा प्रघात नसलेल्या त्या काळात ही लक्षणीय गोष्ट होती. ह्यांनी युद्धकला अवगत केली होती. पण आयुष्याच्या अखेरीस त्या दुर्दैवी ठरल्या. वाराणशीबाईंवरून प्रभावित होऊन अनंतशास्त्री डोंगरे यांनी ज्या आपल्या मुलीला शिकविले होते, ती मुलगी पुढे पंडिता रमाबाई म्हणून नावाजली गेली.हरिभाऊ देवधर यांची कन्या कुसूबाई

पेशवाईतील कर्तबगार माणसे

गोविंद हरी पटवर्धनगोविंद बल्लाळ बुंदेलेत्र्य़ंबक नाना पेठेनारो अप्पाजी तुळशीबागवालेनारोशंकर. यांनी चिमाजीअप्पा यांच्या वसई मोहिमेत पोर्तुगीजांकडून लुटून मिळविलेली विशाल घंटा नाशिकच्या काळ्या रामाच्या मंदिराजवळ एका मनोर्‍यावर आहे.बाबूजी नाईक बारामतीकरबाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणीसबाळाजीपंत नातूमल्हारराव होळकर आणि इतर होळकरमहादजी शिंदे आणि इतर शिंदेराम विश्वनाथ म्हणजेच रामशास्त्री प्रभुणेविठ्ठल शिवदेव विंचुरकर तथा दाणीविठ्ठल सुंदर परशुरामसखाराम बापूहरिपंत फडके

पेशव्यांच्या इतिहासावरील पुस्तके किंवा कादंबर्‍या

ललितेतर

आनंदीबाई पेशवे (म.श्री दीक्षित)वादळवारा : श्रीमंत नानासाहेब पेशव्यांची कहाणी (मनोहर साळगांवकर)पुण्याचे पेशवे (डॉ. अ.रा. कुलकर्णी)पेशवाई (कौस्तुभ कस्तुरे)पेशवाईतील कर्तबगार स्त्रियापेशवाईतील स्त्रियापेशवे - लेखक श्रीराम साठ्ये (प्रकाशनदिवस : अक्षय्य तृतीया, १३मे २०१३- पृष्ठसंख्या मासिकाच्या पानाच्या आकारातील ७८० पृष्ठे.)पेशवे आणि पुणेपेशवेकालीन पुणे शहरातील कोतवाली - लेखक प्रा. डॉ. पुष्कर शास्त्रीवैभव पेशवेकालीन वाड्यांचे (डॉ. मंदा खांडगे)पेशवे घराणेपेशवे घराण्याचा इतिहास, खंड १, २. - लेखक प्रमोद ओकपेशव्यांचे विलासी जीवन (लेखिका : वर्षा शिरगावकर)प्रतापी बाजीराव - लेखक म.श्री. दीक्षितबाळाजी बाजीराव - लेखक म.वि. गोखलेबाळाजी विश्वनाथ - लेखक म.वि. गोखलेदौलतीचे रणधुरंधर पेशवा बाळाजी विश्वनाथ (मदन पाटील)मराठा आणि पेशवे कालखंडातील महाराष्ट्रातील कर्तबगार स्त्रिया (डॉ. ज्योती व्होत्कार)
उत्तर लिहिले · 5/2/2018
कर्म · 28530
0
शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत, त्यांच्या अष्टप्रधान मंडळात पेशवा ही उपाधी मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांच्याकडे होती. ते महाराजांच्या प्रशासनातील सर्वात महत्त्वाचे अधिकारी होते आणि राजाच्या अनुपस्थितीत राज्याचा कारभार तेच सांभाळत असत.

अधिक माहिती:

  • नाव: मोरोपंत त्र्यंबक पिंगळे
  • पद: पेशवा (प्रधान)
  • कार्यकाळ: १६६०-१६८३
  • महत्व: शिवाजी महाराजांच्या प्रशासनातील प्रमुख सल्लागार आणि प्रशासक.
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1040

Related Questions

बाबासाहेब आंबेडकर माहिती?
गौतम बुद्ध यांच्याबद्दल माहिती द्या?
मराठी किती जुनी भाषा आहे?
औद्योगिक क्रांती कुठे झाली?
पंडित जवाहरलाल नेहरू हे आशियानचे संस्थापक होते का?
पूर्व युरोपातील सोव्हिएट रशियाच्या दबावाखालील ५ देशांची नावे लिहा?
पूर्व युरोपातील अनेक देश सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली होते का?