2 उत्तरे
2
answers
इंदुरीकर महाराज यांच्याबद्दल माहिती सांगा?
13
Answer link
बीएस्सी बीएड असणाऱ्या इंदुरीकर महाराजांच्या या पाच गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
. *_पोरगी दिसली, गालात हसली ओके… सहा महिन्यात गेली सोडून… _*
*इंदुरीकर महाराजांनी नेमकां भक्तसंप्रदायात कोणता बदल केला अस विचारलं तर उत्तर येईल महाराजांनी भक्त संप्रदाया पुढे नवा फॅन संप्रदाय देखील निर्माण केला. भक्त मिळतील का माहित नाही पण इंदुरीकर महाराजांचे फॅन मात्र गावागावात मिळतील.*
=
महाराजांबद्दल विचारलं तर काहीजण म्हणतील ते लाखभर रुपये घेतात. काही म्हणतील अध्यात्म सोडून ते गावकीची भाषणं सोडत बसतात. पण एका गोष्टीत सर्वांच एकमत होण्यास हरकत नाही ती म्हणजे, महाराज जब्बर बोलतात. महाराजांचे किर्तन तर तोंडपाठ असतील पण तुम्हाला महाराजांच्या बेसिक गोष्टी माहित आहेत का ? या गोष्टी तुम्हाला माहितीच पाहीजेत कारण महाराजांनीच सांगितलय बेसिक क्लियर करा.
१) महाराजांना किती टक्के पडलेत. ते आम्हाला माहित नाही पण महाराज बीएस्सी बीएड आहेत. आत्ता महाराजाचं वय बघता आणि तत्कालीन परस्थितीचा अंदाज घेता बीएस्सी बीएड असणं म्हणजे उच्चशिक्षीत असणं हे फिक्स. थोडक्यात महाराज उच्चशिक्षीत आहेत.
२) महाराजांच पत्नी शालिनीताई देशमुख या स्वत: किर्तनकार आहेत. यु ट्यूबवर महाराजांइतक्या त्या पॉप्युलर नसल्या तरी त्यांचे किर्तन देखील लोक आवडीने ऐकतात. महाराजांच लग्न होवून अंदाजे पंधरा सोळा वर्ष झाल्याचं त्यांच्या जवळची लोकं सांगतात. पत्नीबरोबर एक मुलगा आणि एक मुलगी असा चौकोनी संसार महाराजांचा आहे.
३) महाराजांच मुळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी. सध्या महाराज संगमनेर तालुक्यातील ओझर गावात स्थायिक झाले आहेत.
४) २०१९ आणि २०२० दोन्ही वर्षाच्या महाराजांच्या तारखा बुक आहेत. रोजचे तीन व्याख्यानं याप्रमाणे महाराजांच्या तारखा अडव्हान बुक झाल्या आहेत. त्यामुळे तुम्ही महाराजांना व्याख्यानासाठी आणायचा विचार करत असाल तर २०२१ नंतरचा विचार करा.
५) महाराज व्याख्यानासाठी ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यन्तची रक्कम घेतात. अनेकजण महाराजांवर इतके पैसे घेतात म्हणून टिका पण करतात.
बोल भीडु वरून साभार

0
Answer link
इंदुरीकर महाराज (पूर्ण नाव: निवृत्ती महाराज देशमुख-इंदुरीकर) हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार आहेत. ते त्यांच्या विनोदी शैलीतील सामाजिक आणि धार्मिक विषयांवरील कीर्तनांसाठी ओळखले जातात.
कारकीर्द:
- इंदुरीकर महाराज अनेक वर्षांपासून कीर्तन करत आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रभर लोकप्रियता मिळवली आहे.
- ते विशेषतः ग्रामीण भागात खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या कीर्तनांना मोठी गर्दी होते.
- इंदुरीकर महाराज त्यांच्या कीर्तनांमध्ये सामाजिक समस्यांवर भाष्य करतात आणि लोकांना त्याबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करतात.
शैली:
- इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाची शैली अतिशय खास आहे. ते आपल्या कीर्तनांमध्ये विनोद, कथा आणि दाखल्यांचा वापर करतात, ज्यामुळे त्यांचे कीर्तन लोकांना आकर्षक वाटते.
- ते आपल्या भाषणांमधून अंधश्रद्धा आणि समाजातील वाईट रूढींवर टीका करतात.
- त्यांच्या कीर्तनांमध्ये ते संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि इतर संतांच्या अभंगांचाही वापर करतात.
विवाद:
- इंदुरीकर महाराज त्यांच्या काही विधानांमुळे अनेकदा वादात सापडले आहेत. त्यांच्या काही वक्तव्यांवर सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी आक्षेप घेतला आहे.
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: