सरकारी योजना इंटरनेटचा वापर कागदपत्रे रेशन कार्ड अर्थव्यवस्था

रेशन कार्ड ऑनलाईन कसे बनवावे? तुमच्या रेशन कार्डवर किती धान्य मिळते?

4 उत्तरे
4 answers

रेशन कार्ड ऑनलाईन कसे बनवावे? तुमच्या रेशन कार्डवर किती धान्य मिळते?

9
अजून ऑनलाईन रेशन कार्ड सर्वच भागात सुरू झाले नाही....परंतु रेशन कार्ड ची थोडक्यात माहिती......


अंत्योदय योजनेतील लोकांना सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा प्राधान्याने लाभ दिला जातो. 

प्राधान्य गटातील रेशन कार्डधारकांमध्ये दारिद्र्य रेषेखालील १०० टक्के लोकांचा सहभाग असतो. तर ४४ हजार रुपयांच्या आत उत्पन्न असलेल्या गावातील एकूण लोकसंख्येच्या ७६ टक्के लोकांना याचा लाभ मिळतो. ग्रामीण भागातील प्रमाण हे ७६ टक्के आहे तर शहरी भागातील प्रमाण ४५ टक्के आहे. 

प्राधान्य गटातील रेशनकार्डधारकांना २ रुपये किलो दराने गहू देण्यात येतो. तर ३ रुपये किलो दराने तांदूळ दिला जातो. त्याबरोबरच १५ रुपये ८१ पैसे दराने रॉकेल दिले जाते. पांढरे कार्ड व दोन गॅस असलेल्या 

रेशनकार्डधारकांना रॉकेल दिले जात नाही तर एक गॅस असलेल्या रेशनकार्डधारकाला उपलब्धतेनुसार रॉकेल दिले जाते. 

ग्रामीण भागात ७६ टक्के लोकांना योजनेचा फायदा द्यायचा असल्याने त्याचे लाभार्थी कोण असतील हे ठरविण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे. ग्रामसभा जे सांगेल त्याच व्यक्ती सरकार यादीत असतील. 



रेशनकार्डचे प्रकार 

अंत्योदय रेशनकार्ड - अंत्योदय योजनेतील लाभधारक 

प्राधान्य गट रेशनकार्ड - वार्षिक ४४ हजारांच्या आतील उत्पन्न असलेले 

केशरी रेशनकार्ड - १ लाखाच्या आता आणि ४४ हजारांपेक्षा अधिक 

पांढरे रेशनकार्ड - १ लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेले व्यक्ती 





नवीन रेशनकार्ड कधी मिळते? 

रेशनकार्ड हरवले असेल तर 

दुबार रेशन कार्ड काढावयाचे असल्यास 

रेशनकार्ड खराब झाले असेल तर 

कुटुंब विभक्त झाले असेल तर 

रेशनकार्डामध्ये नाव वाढवायचे असेल तर 

रेशनकार्डमधून नाव कमी करणे 

व्यक्ती स्थलांतरित झाली असल्यास 





आवश्यक कागदपत्रे 

तलाठी रहिवासी दाखला व उत्पन्नाचा दाखला 

लाइट बिल, घरफाळा पावती 

घरमालकाचे संमतीपत्र 

१० रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प 

प्रतिज्ञापत्र (अॅफिडेव्हीट) 

धान्य दुकानदाराचे पत्र 

आधार कार्ड झेरॉक्स 

बँक पासबुक झेरॉक्स व महिलेचे दोन फोटो 





नवीन रेशनकार्ड कोणाला मिळते आणि कागदपत्रे 

बाहेरगावाहून आलेले असल्यास : बाहेरगावाहून आलेले असल्यास त्याठिकाणच्या संबंक्षित सक्षम अधिकाऱ्याचा (तहसिलदार) स्थलांतराचा दाखला, रेशनकार्ड मूळप्रत. 

ज्यांचे रेशनकार्ड कोठेच नाही : रेशनकार्डमध्ये कोठेच नाव नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र, तलाठ्याचा रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, लाइटबिल, भाडेकरू असल्यास घरमालकाचे संमतीपत्र, आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक व ज्या महिलेच्या नावाने कार्ड काढावयाचे आहे त्यांचे दोन फोटो. 

विभक्त कुटुंब असेल तर : वरील कागदपत्रांशिवाय विभक्त राहत असल्याचा सरकारी पुरावा उदा. लाइटबिल, घरफळा पावती, ग्रामपंचायत असेसमेंट उतारा यापैकी एक पुरावा. विभक्त राहत असल्याचे प्रतिज्ञापत्र वडिलांनी किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तीने लिहून दिलेले असावे. 

रेशनकार्ड हरविले असल्यास : पोलिस स्टेशनचा कार्ड हरविल्याचा दाखला आणि वरील सर्व कागदपत्रे 

दुबार रेशन कार्ड काढावयाचे असल्यास : रेशनकार्ड हरविले किंवा खराब झाल्यास दुबार रेशनकार्ड काढता येते. हरविले असल्यास पोलिसांचा दाखला तर खराब झाले असल्यास मूळ रेशनकार्डची प्रत अर्जासोबत जोडावी लागते. 

नाव वाढवायचे असल्यास : मूळ रेशनकार्ड, नाव कमी करून आणल्याचा संबंधित अधिकाऱ्याचा दाखला, लग्नामुळे नाव वाढवायचे असेल तर लग्नपत्रिका किंवा यादी पुरावा, विवाह नोंदणी दाखला. लहान मुलगा असेल तर सहा वर्षाच्या आतील मुलांसाठी जन्मदाखला तर सहा वर्षावरील मुलांसाठी जन्मदाखला, शाळेचा दाखला आणि प्रतिज्ञापत्र 

नाव कमी करणे : मयत दाखला किंवा लग्न झाले असल्यास लग्नपत्रिका किंवा यादी. 

स्थलांतरीत होऊन आले असल्यास : ज्या कारणाने स्थलांतर झाले आहे त्याचे सक्षम अधिकाऱ्याचा दाखला. रेशनविभागाकडून तपासणी, चौकशी आणि त्यानंतरच कार्ड मिळते. 

रेशनकार्ड काढण्यासाठी तहसील कार्यालयात येण्याची गरज नाही. तर गावागावांत असलेल्या किंवा सर्कलमध्ये असलेल्या महा इ सेवा केंद्रात ही सुविधा उपलब्ध आहे. त्याठिकाणी जाऊन वरील कागदपत्रे सादर केल्यास नवीन रेशनकार्ड किंवा नाव कमी करणे आणि वाढवून मिळण्याचे काम होऊ शकते. त्याठिकाणाहून तहसिल कार्यालयात रेशनकार्ड येते आणि त्याची तपासणी करून त्यावर संबंधितांची सही झाली की रेशनकार्ड तयार होते
उत्तर लिहिले · 16/1/2018
कर्म · 123540
8
_*📙 तुमच्या रेशन कार्डवर किती धान्य मिळते?*_


📍देशातील गरिबांना मोफत धान्यपुरवठा होणेसाठी रेशनकार्डचा उपयोग केला जातो. तसेच या धर्तीवर गरजूंच्या दोन वेळच्या अन्नाची सोय व्हावी म्हणून रेशनकार्डवर स्वस्त दरात दर महिना धान्य उपलब्ध करून दिले जाते.

❗दरम्यान काहीवेळा लोकांना लक्षात येत नाही कि आपल्याला क्षमतेनुसार किती धान्य मिळायला हवे , त्यामुळे दात्यांचा गोंधळ उडतो. हि माहिती आपणास मिळवायची असेल तर खालील कृती अवलंबावा.

▪प्रथम  http://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx या वेबसाईटला भेट द्या.

▪पुढील स्क्रीनवर ऑनलाईन रास्तभाव असे विंडो दिसेल. पुढील विंडोत Aepds सर्व जिल्हे या नावाची कोलाम दिसेल, त्यावर क्लिक करा.

▪RC Details New वर क्लिक करा. पुढील विंडोत आपला (SRC No) रेशनकार्ड नं. टाका.

▪Submit या बटनावर क्लिक करा.

💁🏻आता आपल्या स्क्रिनवर तुमच्या रेशनकार्डवरील माहिती व आपल्याला मिळत असलेल्या मालाची माहिती तसेच मागील एक वर्षांपूर्वीची माहिती याद्वारे मिळू शकेल.
खालील उत्तर पहा

रेशनकार्ड-RATION CARD(शिधापत्रिका)संदर्भातील माहिती?
उत्तर लिहिले · 12/10/2018
कर्म · 569245
0

मी तुम्हाला रेशन कार्ड (Ration Card) ऑनलाईन कसे बनवायचे याबद्दल आणि त्यावर किती धान्य मिळते याबद्दल माहिती देतो.

रेशन कार्ड ऑनलाईन कसे बनवायचे:

रेशन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील:

  1. राज्य सरकारच्या वेबसाइटला भेट द्या:
    • प्रत्येक राज्याची स्वतःची अन्न व नागरी पुरवठा विभागाची वेबसाईट असते. उदाहरणार्थ, महाराष्ट्रासाठी https://mahafood.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.
  2. अर्ज डाउनलोड करा:
    • वेबसाईटवर तुम्हाला रेशन कार्डसाठी अर्ज मिळेल. तो अर्ज डाउनलोड करा.
  3. अर्ज भरा:
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूकपणे भरा. जसे की, कुटुंबातील सदस्यांची नावे, पत्ता आणि इतर आवश्यक माहिती.
  4. आवश्यक कागदपत्रे जोडा:
    • ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, ভোটার कार्ड, ইত্যাদি)
    • पत्त्याचा पुरावा (लाईट बिल, पाणी बिल, भाडे पावती, ইত্যাদি)
    • कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड
    • उत्पन्नाचा दाखला
    • पासपोर्ट साईज फोटो
  5. अर्ज जमा करा:
    • भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे तुमच्या এলাকার अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या कार्यालयात जमा करा. काही राज्यांमध्ये तुम्ही हा अर्ज ऑनलाईन देखील जमा करू शकता.

रेशन कार्डवर किती धान्य मिळते:

रेशन कार्डवर किती धान्य मिळेल हे काही गोष्टींवर अवलंबून असते:

  • तुमच्या कार्डचा प्रकार: तुमच्याकडे कोणत्या प्रकारचा रेशन कार्ड आहे (उदाहरणार्थ, अंत्योदय, बीपीएल, एपीएल).
  • राज्याचे नियम: प्रत्येक राज्याचे रेशन कार्डनुसार धान्य वाटपाचे नियम वेगळे असतात.
  • कुटुंबातील सदस्यांची संख्या: तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत, यावर धान्याची मात्रा अवलंबून असते.

रेशन कार्डवर मिळणाऱ्या धान्याबद्दल अचूक माहितीसाठी, तुमच्या राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाईटला भेट द्या किंवा स्थानिक रेशन दुकानातील अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवा.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1440

Related Questions

अर्थव्यवस्थेची किती क्षेत्रांमध्ये विभागणी केली जाते, ते सविस्तर लिहा?
लोकलेखा समिती विषयी संक्षिप्त माहिती लिहा?
मी रोजगार हमी योजनेतून गावांसाठी काय कामे करू शकतो?
सध्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या वाढीव निधीची घोषणा झाली होती, ती लागू झाली आहे का आणि कशा प्रकारे?
चीनमध्ये तयार होणाऱ्या कोणत्या उत्पादनांना भारतात मोठी मागणी होती?
खालीलपैकी कोणता अर्थसंकल्प 2023 मध्ये सादर झालेल्या अर्थसंकल्पासोबत मांडला होता?
रोजगाराच्या प्रश्नावर भाष्य करा?