अध्यात्म देव साई बाबा

साई बाबांचे पूर्ण नाव काय आहे?

4 उत्तरे
4 answers

साई बाबांचे पूर्ण नाव काय आहे?

6
  • त्यांचे नाव कुणालाही माहित नव्हते
जेव्हा ते शिर्डीला    आले तेव्हा त्यांचा पोशाख पाहून म्हाळसापतींनी त्यांना "आवो साई" म्हणून संबोधले होते. यांतला  'साई' शब्द हा  मूळचा फारशी(persian) भाषेतला सायिह(sayeeh) म्हणजे एखादी महत्वपूर्ण  किंवा आदरणीय व्यक्ती जीच्या सन्मानार्थ तिला सायिह म्हटल जायचं (जसे आपल्याकडे स्वामी म्हणतात) याचा अपभ्रंश होऊन पूढे हा शब्द भारतीय भाषांमध्ये  वापरला जाऊ लागला .आपणास काही चित्रपटांमध्ये निदर्शनास आले असेल कि एखादे पात्र जर सिंधी लहेजामध्ये  दाखवले असेल तर त्यात 'अडे साई' (म्हणजे अहो स्वामी)असे म्हणताना तो दिसेल. (हे माझं स्वतःचं निरीक्षण आहे) यावरूनच श्री साई  बाबांना पाहून म्हाळसापतींना त्यांबद्दल अत्यंत आदर व सन्मान वाटला  व त्यांचं ते फकिराचं रूप पाहून त्यांच्या तोंडून नकळतच "आवो साई" हे उद्गार बाहेर पडले. व शिर्डीत व सगळीकडे त्यांना साई बाबा म्हणून ओळखू लागले.
उत्तर लिहिले · 25/1/2019
कर्म · 18160
4
साईबाबांचे पूर्ण नाव कोणालाही ठाऊक नाही. साईसत्चरित्रातही त्यांच्या पूर्ण नावाचा उल्लेख नाही. म्हाळसापतीनी प्रथम साईबाबांना पाहिले, तेव्हा त्यांना साईबाबांमधे प्रत्यक्ष ईश्वर दिसला असावा व म्हणून त्यांनी साईबाबांना 'आवो साई' (साक्षात ईश्वर) अशी हाक मारली. तेव्हापासून सगळेजण 'साई' म्हणून ओळखू लागले व 'साईबाबा' म्हणू लागले.
उत्तर लिहिले · 26/1/2019
कर्म · 91085
0

साई बाबांचे पूर्ण नाव निश्चितपणे कोणालाही माहीत नाही. साई हे त्यांचे नाव त्यांना शिर्डीत आल्यावर पडले, असे मानले जाते. 'साई' या शब्दाचा अर्थ 'संत' किंवा 'पवित्र' असा होतो.

त्यामुळे, साई बाबा हे नाव त्यांच्या कार्यामुळे आणि लोकांनी दिलेल्या आदराने रूढ झाले.

अधिक माहितीसाठी, आपण हे पाहू शकता:

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 2380

Related Questions

साई बाबांचा जन्म कुठे झाला आहे?
साई बाबा यांचा जन्म ते मृत्यू पर्यंतची सगळी माहिती मिळेल का आणि त्यांचा मृत्यू कसा झाला?
साई बाबांचे संपूर्ण नाव सांगा?