महाराष्ट्र शासन कर्मचारी
राज्य परिवहन
संस्था
अर्थव्यवस्था
महाराष्ट्राचा इतिहास
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ म्हणजे हे नेमके कशाचे आहे?
2 उत्तरे
2
answers
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ म्हणजे हे नेमके कशाचे आहे?
4
Answer link
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असून, राज्यभरात गोदामांचेजाळे निर्माण करुन औद्योगीक व कृषी क्षेत्रास,अन्नधान्याची नासाडी होउ नये म्हणून, साठवणुकीची सुविधा पुरविण्यासाठी या महामंडळाची निर्मीती केलेली आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ८ ऑगस्ट १९५७ ला “ॲग्रिकल्चर प्रोडयूस (डेव्हलपमेंट ॲण्ड वेअरहाउसिंग) कॉर्पोरेशन ॲक्ट १९५६ ” अन्वये स्थापन झाले.सन १९६२ मध्ये “द वेअरहाउऊसिंग कॉर्पोरेशन ॲक्ट १९६२ ” पारित झाल्यानंतर, १९५६ चा कायदा रद्द झाला असून आता हे महामंडळ १९६२ च्या कायद्यान्वये कार्यरत आहे.
आर्थिक संरचना
महामंडळाचे भाग भांडवल - महाराष्ट्र शासन - ५०% + केंद्रीय वखार महामंडळ - ५०%
एकूण मंजूर भाग भांडवल-रु.१५.०० कोटी
प्राप्त भाग भांडवल-रु.८.७१ कोटी
वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन ॲक्ट १९६२ च्या तरतुदीप्रमाणे महामंडळ संचालक मंडळाच्या अखत्यारीत काम करते.
या संचालक मंडळात केंद्रीय वखार महामंडळ व महाराष्ट्र शासन यांनी नामनिर्देशित केलेले प्रत्येकी पाच संचालक असतात.
महामंडळाची मुख्य कार्ये :
राज्यात योग्य ठिकाणी जमिनी संपादन करून गोदामे व वखारी बांधणे.
राज्यात कृषि उत्पादने, बियाणे, खते, शेती अवजारे, कापूसगाठी, औद्योगिक माल आणि अनुसूचित वस्तूंसाठी शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक करणे.
कृषि उत्पादने, बियाणे, खते, शेती अवजारे आणि अनुसूचित वस्तू यांच्या वाहतुकीच्या सुविधांची व्यवस्था करणे.
केंद्रीय वखार महामंडळ किंवा शासनाचेप्रतिनिधी म्हणून कृषि उत्पादने, बियाणे, खते, शेती अवजारे, अनुसूचित बाबी यांची खरेदी, विक्री, साठवणूक व वितरण करणे.
महामंडळातर्फे पुरविण्यात येणाऱ्या सुविधा :
महामंडळातील कामे
शेतकऱ्याकरिता शेती व्यवसायासाठीसुविधा देणे
शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीमालाची साठवणूक महामंडळाकडे केल्यांस वखार भाडयात ५०% सवलत देणे. ठेवीदारांना दिलेली महामंडळाची वखारपावती परक्राम्य लेख (Negotiable Instrument) असल्यानेव ती बँकेकडे तारण ठेवल्यास, ठेवीदारांना बँकेकडून त्वरित कर्ज उपलब्ध होते.
त्या आधारे शेतकऱ्यांना हंगामात बँकेकडून अर्थ साहाय्य व नंतर बाजारभाव येईपर्यंत गोदामांत साठवणुकीची सोय मिळते.
शेतीमालापासून ते औद्योगिक मालापर्यंत सर्व मालप्रकारांची शास्त्रशुद्ध साठवणूक करता येते.
डी.डी.व्ही.पी., मॅलेथिऑन या औषधाचा प्रतिबंधात्मक व ॲल्युमिनियम फॉस्फाइडचा कीटकनाशक म्हणून नियमित वापर करून मालाचे संरक्षण केले जाते.
सर्व साठवणुकीला विमा संरक्षण असते.
हाताळणी व वाहतुकीची सुविधा मान्यताप्राप्त ठेकेदारांमार्फत पुरविली जाते.
साठवणुकीच्या काळात,महामंडळ ठेवीदाराच्या साठ्याचा दर्जा टिकविते व नुकसान झाल्यास योग्य ती भरपाई देते.
शुल्कबंध वखारकेंद्रामधून आयातदारांना शुल्कबंध साठवणुकीच्या सोयी मिळतात.
कंटेनर फ्रेट स्टेशन : सन २००५ मध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, द्रोणागिरी नोड, न्हावाशेवा येथे कंटेनर फ्रेट स्टेशनची स्थापना करण्यात आली.
त्याद्वारे आयात-निर्यातदारांसाठी सेवा उपलब्ध आहेत.
महामंडळाची यशस्वी वाटचाल :

सन १९५७ मध्ये महामंडळाची स्थापना झाल्यानंतर महामंडळाने भाडयाची गोदामे घेऊन, त्यामध्ये साठवणुकीचा व्यवसाय सुरू केला. महामंडळाने गोदाम बांधकाम कार्यक्रम हाती घेऊन, १९६१-६२ मध्ये स्वमालकीच्या दोन गोदामांमधून २,७२० मेट्रिक टनाची साठवणूकक्षमता निर्माण केली.तेव्हापासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी महामंडळाने व्यवसायानुरूप साठवणूक क्षमतेचे गोदाम बांधकाम हाती घेऊन महाराष्ट्रात स्वमालकीच्या गोदामांची सोय केली.आजमितीस एकूण १९३ ठिकाणी महामंडळाच्या वखारकेंद्राचे जाळे असून स्वमालकीच्या एकूण ८३० गोदामांमधून, १३ लाख ५० हजार मेट्रिक टन मालाची साठवणूक करता येते.सदर १७४ वखारकेंद्रावरील कामकाजाचे नियंत्रण आठ विभागीय कार्यालये - औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, लातूर, पुणे, कोल्हापूर यांचेमार्फत होते.
लक्षवेध
महामंडळाच्या एकूण मालमत्तेचे कागदोपत्री मूल्य रु.१७५.२९ कोटी तर बाजारभाव मूल्य अंदाजे रु.७७५.०० कोटी इतके आहे. महामंडळाकडून प्रामुख्याने शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे अन्नधान्य, तृणधान्य, कडधान्य यांची साठवणूक केली जाते. त्याच प्रमाणे सरकारी धान्य वितरण योजनेकरिता लागणारी भारतीय खाद्य निगमची अन्नधान्ये, विविध कंपन्यांची खते, तसेच औद्योगिक वस्तू आणि कापूसगाठीं आदींची साठवणूक केली जाते.
२०१२ मध्ये महामंडळाने जागतिक बँक अर्थसहाय्यीत, महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प व भारत सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सर्व वखार केद्रांचे संगणकीकरण, धान्याची चाळणी व प्रतवारी, व प्रत नियंत्रण प्रयोगशाळांची स्थापना केलेली आहे.
महामंडळाने ई-वखार पावती देण्याबाबत, विविध वखार केंद्राचे संगणकीकरण करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे, आता पर्यंत १७४ पैकी ५२ वखार केंद्र संगणकीकरण पूर्ण झालेले आहे. महामंडळाने दिलेल्या वखारपावतीची माहिती आता महामंडळाच्या संकेतस्थळावरुन बघता येते. वित्तीय संस्थांना त्यांनी वखारपावतीवर दिलेल्या तारणऋण या संकेतस्थळावरून परस्पर नोंदविण्याची सोय ही उपलब्ध आहे. अशा प्रकारची सेवा पुरविणारे हे भारतातील एकमेव वखार मंडळ आहे.
शेतकरी व ठेविदारांना त्वरित तारण ऋण मिळावे या करीता महामंडळाने, आतापर्यंत पंजाब नॅशनल बँक, महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडीया, देना बँक, युको बँक वइंडीयन ओव्हरसीज बँक या सहा बँकाशी सामंजस्य करार केलेले आहेत.
फायदे
महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या गोदामामध्ये शेतकऱ्यांसाठी अन्नधान्य साठवणुकासाठी २५ टक्के जागा राखून ठेवलेली असते.
मालाची प्रत टिकून राहील्याने ठेवीदारांचा आर्थिक फायदा होतो.
महामंडळाद्वारे गोदामात साठवलेल्या सर्व प्रकारच्या मालाचा आग, पूर, चोरी इ. धोक्यापासून संरक्षणासाठी १०० टक्के विमाउतरविलेला असतो.
महामंडळाचच्या सर्व वखार केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टीने, दैनंदिन पूर्णवेळ (२४X७) सुरक्षारक्षक नेमलेले आहेत.
●
■महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची दि. ०१ मे २०१३ पासुन विभागाची पुनर्रचना केलेली आहे, त्यानुसार सुधारीत विभाग व त्यांचे पत्ते खालिल प्रमाणे आहेत.
★अमरावती विभाग
विभागीय कार्यालयमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ,शेतकरी भवन‚ २रा माळा, जुने कॉटन मार्केट,अमरावती, महाराष्ट्रफोन/फॅक्स -०७२१-२५६७०६७
★नागपूर विभाग
विभागीय कार्यालय,म.रा.वखार महामंडळ,नागपूर सुधार केंद्राचे व्यापार संकुल,३ रा मजला, गोकूळ पेठ,नागपूर-४४००१०फोन-०७१२-२५६०८९१, २५४२०५१
★नाशिक विभाग
विभागीय कार्यालय,म.रा.वखार महामंडळ,६/७, साई-आनंद संकुल, तिसरा मजला,बिटको पॉईंट,नाशिक रोड,नाशिक ४२२१०१फोन / फॅक्स -०२५३-२४६१११२
★औरंगाबाद विभाग
विभागीय कार्यालयमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळप्लॉट नं. ब-२६ , रेल्वे MIDC ,स्टेशन रोड , औरंगाबादपिन ४३१००५फोन / फँक्स ०२४० २३३३८११
★पुणे विभाग
विभागीय कार्यालय,म.रा.वखार महामंडळ,५८३/ब, मार्केट यार्ड गुलटेकडी,पुणे : ४१११०३७.फोन-०२०-६६२६६८८०/८८१
★लातूर विभाग
विभागीय कार्यालय,म.रा.वखार महामंडळ,प्लॉट क्र. ए-1, जुने एम.आय.डी.सी एरिया,बार्शी रोड, लातुर-413512.जि.लातुर.फोन-०२३८२-२२०४०७
★कोल्हापूर विभाग
विभागीय कार्यालय,म.रा.वखार महामंडळ,517 ई, एम.आय.डी.सी बिल्डींग,महाराणी ताराबाई चौक, कावळा नाका,कोल्हापूर -४१३००१फोन-०२३१-२५२८८७७
★मुंबई विभाग
विभागीय कार्यालय,म.रा.वखार महामंडळ,पीएमसी यार्ड,प्लॉट नं.३७, वाशी,नवी मुंबई-४००७०३फोन०२२-२७८८८५५८

0
Answer link
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ (Maharashtra State Warehousing Corporation - MSWC) हे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असलेले एक महामंडळ आहे.
उद्देश:
- कृषी उत्पादने, औद्योगिक वस्तू आणि इतर वस्तूंसाठी वखार सुविधा (Warehousing facilities) पुरवणे.
- मालाची साठवणूक सुरक्षित आणि व्यवस्थित करणे.
- शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी सुरक्षित गोदाम उपलब्ध करून देणे.
- मालाच्या साठवणुकीवर आधारित वित्तपुरवठा (Financial assistance) सुलभ करणे.
कार्य:
- राज्यात विविध ठिकाणी वखारी (Warehouses) चालवणे.
- वखारीमध्ये मालाची Handling आणि वाहतूक व्यवस्था करणे.
- मालाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करणे.
- शेतकऱ्यांना त्यांच्या मालावर कर्ज मिळवण्यासाठी मदत करणे.
अधिक माहितीसाठी:
तुम्ही महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता: MSWC Official Website