संबंध प्रेम विवाह कुटुंब प्रेम आणि आकर्षण

मी एका लग्न झालेल्या बाईच्या प्रेमात पडलो आहे. ती माझ्यासोबत खूप चांगली बोलते, हसते. मला काहीच समजत नाहीये काय करू व ती माझ्यावर प्रेम करते हे कशावरून ओळखू?

7 उत्तरे
7 answers

मी एका लग्न झालेल्या बाईच्या प्रेमात पडलो आहे. ती माझ्यासोबत खूप चांगली बोलते, हसते. मला काहीच समजत नाहीये काय करू व ती माझ्यावर प्रेम करते हे कशावरून ओळखू?

42
भाऊ, खरच, त्या स्त्री चा विचार पूर्णपणे सोडून द्या ती विवाहित आहे,आपल्या मुळे एखादा सोन्यासारखा संसार मोडू शकतो आणि तसे करण्याचा अधिकार कुणालाच नाही,ती तुमच्या वर प्रेम करते कशावरून ? कदाचित ती फ्री माईंड असू शकते. आणि जर ती तुमच्या वर प्रेम करत असेल तर तिला तुम्ही समजून सांगा ,तिला तिच्या संसाराची जाणीव करून द्या.कदाचित भावनेच्या भरात तसे करत असेल.
जर तिच्या नवऱ्याने तिला डिव्होर्स दिला तर तुम्ही तिच्याशी लग्न कराल का ? याचा विचार करा.
काही चुकीचे वाटल्यास क्षमस्व.
उत्तर लिहिले · 6/1/2018
कर्म · 5835
32
तुम्ही लग्न झालेल्या स्त्री वर प्रेम करता पण तुम्हाला माहीत नाहीं कि तिही तुमच्यावर प्रेम करते की नाही
एक लक्षात घ्या ती स्त्री स्वतःच्या नवऱ्याला सोडून जर तुमच्यावर प्रेम करते अशी अपेक्षा डोडून द्या कारण जी पतीची नाही ती कुणाची कशी होणार
त्या स्त्रीचा विचार पूर्णपणे सोडून द्या
ती विवाहित आहे,अविवाहित नाही  आपल्या मुळे एखाद्याचा सोन्यासारखा संसार मोडू शकतो असे करण्याचा अधिकार कुणालाच नाही,तुम्हांला पण नाही ती तुमच्या वर प्रेम करते कशावरून ? ती तुमच्याशी friendly बोलते म्हणून  किव्हा ती फ्री माईंड असेल आणि जर ती तुमच्या वर प्रेम करत असेल तर तिला तुम्ही समजून सांगा ,तिला तिच्या संसाराची जाणीव करून द्या.कदाचित भावनेच्या भरात तसे करत असेल किंवा तिला तिच्या घरात पुर्णपणे सुख मिळत नसेल म्हणून करत असेल असे भरपुर कारण असू शकतात
  समजा तुम्ही तिला propose ही केला ती हो पण म्हणाली आणि  जर तिच्या नवऱ्याला माहिती पडले मग आणि नवरा जर free minded नसेल तर आणि नवऱ्याने तिला डिव्होर्स दिला तर तुम्ही तिच्याशी लग्न कराल का ? याचा विचार करा कधी केला का तुम्ही म्हणून तूम्ही तिचा विचार मनातुन काढून टाका आणि एक चांगली मुलगी बघून लग्न करून सुखी रहा

धन्यवाद,,,,
उत्तर लिहिले · 22/3/2019
कर्म · 2725
0
एखाद्या विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडणे भावनिकदृष्ट्या गुंतागुंतीचे असू शकते. या परिस्थितीत, काही गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे:
  • वास्तववादी दृष्टिकोन: ती विवाहित आहे आणि तिच्या वैवाहिक जीवनाची काही बांधिलकी आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे, तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
  • संभाषण: तिच्याशी मनमोकळी चर्चा करा. तुमच्या भावनांविषयी आणि अपेक्षांविषयी तिला सांगा.
  • तिच्या भावनांचा आदर करा: ती तुमच्याबद्दल काय विचार करते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तिच्या भावनांचा आदर करणे महत्त्वाचे आहे. जर तिला तुमच्यात रस नसेल, तर ते स्वीकारायला शिका.
  • वेळ द्या: कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्यापूर्वी, परिस्थितीला थोडा वेळ द्या.
  • तज्ञांची मदत घ्या: भावनिक गुंतागुंत वाढल्यास, समुपदेशकाची (counselor) मदत घेणे फायदेशीर ठरू शकते.
ती तुमच्यावर प्रेम करते हे कसे ओळखावे यासाठी काही संकेत:
  1. वर्तणूक: ती तुमच्याशी बोलताना अधिक लक्ष देत असेल, तुमच्या बोलण्यावर तिची प्रतिक्रिया सकारात्मक असेल.
  2. जिव्हाळा: ती तुमच्याशी बोलताना स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असेल.
  3. काळजी: ती तुमची काळजी घेत असेल, तुमच्या अडचणींमध्ये मदत करण्याचा प्रयत्न करत असेल.
  4. भेटण्याची इच्छा: ती तुम्हाला वारंवार भेटण्याची इच्छा व्यक्त करत असेल.
  5. व्यक्त होणे: ती तुमच्यासमोर तिचे विचार आणि भावना व्यक्त करत असेल.
हे फक्त काही संकेत आहेत. यावरून ती तुमच्यावर प्रेम करते आहे की नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही. यासाठी तुम्ही तिच्याशी थेट बोलणे अधिक महत्त्वाचे आहे.
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 3260

Related Questions

बायकोला इम्प्रेस करण्यासाठी उपाय?
लग्न जमल्यास मुलीला कॉलवरती काय बोलावे, कोणत्या विषयांवर बोलावे?
मला नातू कधी होईल?
तुम्हाला माहित असलेल्या गुरु शिष्यांच्या जोड्या?
यादव आणि वाडेकर यांच्यात काय नाते आहे?
एक मुलगी होती तीचं माझ्यावर खूप प्रेम होतं, पण आम्ही लाँग डिस्टन्स मध्ये होतो. पण आता ती माझ्याशी नीट नाही बोलत, मला फोन नाही करत. ती असं वागत आहे मला काही कळेना. माझं पण तिच्यावर खूप प्रेम आहे, पण ती असं वागत आहे त्यामुळे मला खूप टेन्शन आलंय. मी काय करू? मला काही कळत नाहीये, ती मला सोडून तर नाही देणार ना?
मी लग्नासाठी मुलगी बघायला गेलो होतो. मुलगी स्वभावाला चांगली आहे, पण ती दिसायला तेवढी सुंदर नाहीये. पण तिला मी आवडतो. ती शिक्षण B.Com झालेली आहे. मग मी तिच्याशी लग्न केले पाहिजे का दुसरी बघू?