बँक इंटरनेट बँकिंग कागदपत्रे अर्थ बँकिंग

SBI मध्ये अकाउंट उघडण्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागतात?

2 उत्तरे
2 answers

SBI मध्ये अकाउंट उघडण्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागतात?

4
कोणत्याही व्यक्तीला बचत खाते पतसंस्था /सहकारी बँक / राष्ट्रीयीकरण बँक येथे सुरु करता येते.एका व्यक्तीला एक बँकेत एकच सेव्हिंग खाते उघडता येते.शासकीय योजनांचा जेव्हा लाभ घ्यायचा असतो तेव्हा राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक असते.उदा.सबसिडी / घरातील चे अनुदान / विद्यार्थांना मिळणारी शिष्यवृत्ती.

सेव्हिंग खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

बँक खाते उघडण्यासाठी.
1.बँकेतील अर्ज.
2.विद्यार्थांनसाठी बोनाफाईड.
3.ओळख व पत्याचा पुरावा उदा.मतदानकार्ड / रेशनकार्ड.
4.दोन रंगीत फोटो.पॅन कार्ड क्रमांक / फॉर्म नं ६० किंवा ६१संबंधित बँकेत बचत खाते सुरु असलेल्या परिचयातील व्यक्तींची सही.दोघांच्या नावावर अथवा दोघांपेकी जास्त व्यक्तीच्या नाव वरील संयुक्त खाते:-

या खात्यावर व्यवहार दोघांपेकी एक / दोघांच्या / दोघांपेक्षा अधिक व्यक्तीच्या सहीने करता येते.

सही न करता येणाऱ्या व्यक्तीचे खाते:-

ज्या व्यक्तीला सही करता येत नाही त्या व्यक्तीला खाते सुरु करताना किंवा त्यावरील व्यवहार सुरु करताना बँकेत समक्ष हजर राहून पुरुषाचा डाव्या हाताचा अंगठा व स्रियांचा उजव्या हाताचा अंगठा निशाणी द्वारे व्यवहार करता येतो.

अंध व्यक्तीचे खाते:-

सामान्य अटींच्या पुर्तेतेनंतर स्वत: अथवा विश्वासपात्र व्यक्तीसमवेत संयुक्त खाते उघडता येते. अंध व्यक्तीस शाखा व्यवस्थापक बँकेच्या अटी नियम वाचून व समजून देतील त्यानंतर खाते उघडावे.

आज्ञानाचे खाते:-

अज्ञान व्यक्तीचे खाते त्याच्या जन्मतारखेचा अधिकृत दाखला सादर करून सुरु करता येईल.अज्ञान व्यक्तीच्या खातेवरील व्यवहाराची जबाबदारी हि त्याचे आई / वडील अथवा पालकांची राहील.व्यवहारासाठी खाते सुरु करते वेळी असलेले पालक यांच्या सहीनेच होतील.जेव्हा अज्ञान व्यक्ती सज्ञान होईल तेव्हा सज्ञान व्यक्ती बँकेच्या योग्य निर्देशांचे पालन करून स्वत: व्यवहार करू शकेल.

—————————————————————————————————————————————-

नवीन करंट / चालू खाते सुरु करणे.

कोणत्याही व्यक्तीला करंट खाते चालू करता येत नाही.व्यवसाय,संस्था,कंपनी,वृत्तपत्र इ.साठी असलेले खाते आहे.करंट खातेवरील जास्तीत जास्त व्यवहार हे चेक द्वारे होतात.करंट खात्यावर होणारया व्यवहाराचा अहवाल बँकेद्वारे प्रती माह प्राप्त करता येतो.म्हणून बरयाच वेळा पास बुकाची आवश्यकता नसते.करंट खाते सुरु करण्यासाठी व किमान शिल्लक हि २ हजार पासून १० हजार रुपये ठेवावी लागते.त्यापेक्षा कमी झाल्यास सदर बँक दंड आकारू शकते.

करंट खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.

व्यवसाय परवाना / शॉप अधिनियम लायसेन्स कागदपत्रे.शॉप अधिनियम नसल्यास संबंधित व्यवसाय नोंदणीकृत असल्या बाबत पुरावा.व्यवसाय यांचा प्रोप्रायटरनावाने शिक्का ज्यात संबंधित फर्मचे नाव असते.खाते उघडण्यासाठी करंट खाते असलेल्या व्यक्तीची प्रोप्रा.शिक्क्यासह ओळख.व्यवसाय मालकाचे पॅन कार्ड मतदान ओळखपत्र.
उत्तर लिहिले · 1/1/2018
कर्म · 22090
0

SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया) मध्ये अकाउंट उघडण्यासाठी आवश्यक असलेले डॉक्युमेंट्स खालीलप्रमाणे:


ओळखीचा पुरावा (Proof of Identity):
  • पॅन कार्ड (Pan Card)
  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • पासपोर्ट (Passport)
  • ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License)
  • मतदार ओळखपत्र (Voter ID)

पत्त्याचा पुरावा (Proof of Address):
  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • पासपोर्ट (Passport)
  • ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License)
  • मतदार ओळखपत्र (Voter ID)
  • युटिलिटी बिल (Utility Bill) जसे की वीज बिल, पाणी बिल, टेलिफोन बिल (३ महिन्यांपेक्षा जुने नसावे)
  • बँक स्टेटमेंट (Bank Statement)

इतर आवश्यक डॉक्युमेंट्स:
  • नवीनतम पासपोर्ट साईझ फोटो (Passport size photo)
  • फॉर्म 16 (Form 16) किंवा इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) (जर आवश्यक असेल तर)

टीप: बँक आवश्यकतानुसार अतिरिक्त डॉक्युमेंट्सची मागणी करू शकते. त्यामुळे, बँकेत जाण्यापूर्वी एकवार नक्की विचारून घ्या.

अधिक माहितीसाठी, तुम्ही एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता: SBI Official Website

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 5220

Related Questions

वृत्ती सारूप्यमितरत्र यांचा अर्थ काय आहे?
सलमाला म्हणजे काय?
SWP साठी सर्वात चांगले फंड कोणते?
मी एचडीएफसीचा कर्जदार होतो, शेतीवर कर्ज घेतले होते पण मी ते सेटलमेंट केले. तर मला दुसरी बँक कर्ज देत नाही, काही पर्याय?
बजाज फायनान्स तीन लाख रुपये लोन देत आहे आणि त्याचे हप्ते हजार रुपये आणि ईएमआय मध्ये कपात अशी जाहिरात आहे, हे खरे आहे का?
सिप कोणत्या कोणत्या बँकेत सुविधा असते?
प्रॉपर्टीवर वार्षिक हप्ता लोन कोणती बँक देते?