3 उत्तरे
3
answers
राणी ताराराणी विषयी माहिती मिळेल का?
4
Answer link
भद्रकाली ताराराणी
महाराणी ताराबाई ह्या शिवछञपतींची दुसरी स्नुषा. आपल्या पराक्रमाने व शौर्याने इतिहासात अजरामर झाल्या. आपल्या पतीच्या_राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतच "सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार" या बाबतीत मोठा लौकिक मिळवल्याची साक्ष मोगलांचा इतिहासकार खाफीखान याने दिली आहे.
राजाराम महाराजांचा मृत्यू सन 1700 साली झाला. त्यावेळी ताराबाईंचे वय अवघे पंचवीस वर्षांचे होते. ऐन तारुण्यातील वैधव्याचे दु:ख कोसळले असताना ते बाजूला ठेवून हिंदवी स्वराज्याच्या रक्षणार्थ ही मराठ्यांची राणी औरंगजेबाशी लष्करी संघर्ष करण्यास सिध्द झाली. राजारामा नंतर त्याची निराधार स्ञी आपल्याशी काय लढणार, अशी औरंगजेबाची घमेंड ताराबाईंनी उतरवली.
खाफीखान सांगतो की राज्याची सूञे हाती घेताच ताराबाईने सर्वञ विलक्षण धामधूम उडवली. त्यात तिचे सैन्याच्या नेतत्वाचे आणि मोहिमांच्या व्यवस्थेचे गुण प्रकर्षाने प्रकट झाले; त्यामुळे मराठ्यांचे आक्रमण व धामधूम दिवसेंदिवस वाढतच गेली. खाफीखान हा शञूचा इतिहासकार होता. त्याने ताराबाईंच्या पराक्रमाविषयी हे उद् गार काढलेले आहेत, याचे भान ठेवले की मग ताराबाईंची महान कामगिरी स्पष्ट होते.
मराठ्यांची खरी शक्ती डोंगरी किल्ल्यांत आहे, हे जाणून औरंगजेब मराठ्यांचे किल्ले घेण्याची मोहिम जातीने चालवत होता. ताराबाई आपला एक एक किल्ला पाचसहा महिने लढवून त्यास एकीकडे गुंतवून ठेवत होत्या, तर दुसय्रा बाजूने औरंगजेबाच्या गुजरात, माळवा, हैद्राबाद, विजापूर, कर्नाटक अशा दूरदूरच्या सुभ्यांवर आपल्या फौजा पाठवत होत्या. मराठ्यांचे राज्य जिंकण्यासाठी औरंगजेब सन 1681 साली दक्षीणेत आला होता, पण मराठी राज्य तर जिंकले गेले नाही, उलट संपूर्ण दक्षिण त्याच्या हातून निसटले आणि उत्तरेतील त्याच्या साम्राज्यावर मराठी फौजा प्रहार करू लागल्या, असे चिञ औरंगजेबाच्या मृत्यूसमयी उभे राहिले - (सन 1707).
मराठ्यांच्या या शूर राणीने औरंगजेबासारख्या आशिया खंडातील सर्वांत बलाढ्य सत्ताधीशाशी सतत सात वर्षे लष्करी संघर्ष दिला.
ही गोष्ट हिंदुस्थानच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात अपवादात्मक व अलौकिक ठरावी इतकी महान आहे.
दिल्ली झाली दीनवाणी |
दिल्लीशाचे गेले पाणी ||
ताराबाई राम राणी |
भद्रकाली कोपली ||
रामराणी भद्रकाली |
रणरंगी क्रुध्द झाली ||
प्रलयाची वेळ आली |
मुगल हो सांभाळा ||

महाराणी ताराबाई (१६७५-१७६१) ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते ह्यांच्या कन्या होत.
महाराणी ताराबाई भोसले
मराठा साम्राज्य
अधिकारकाळ१७०० - १७०७
राज्याभिषेक१७००
राज्यव्याप्तीपश्चिम महाराष्ट्र, कोकण,दक्षिण भारतात तंजावर पर्यंत
राजधानीपन्हाळा
पूर्ण नावमहाराणी ताराबाई राजारामराजे भोसले
जन्म१६७५
तळबिड
मृत्यू१७६१
सातारा
पूर्वाधिकारीछत्रपती राजारामराजे भोसले
उत्तराधिकारीशाहू भोसले
वडीलहंबीरराव मोहिते
राजघराणेभोसले
चलनहोन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन

0
Answer link
राणी ताराराणी (इ.स. १६७५ - इ.स. १७६१) ह्या मराठा साम्राज्याच्या राजघराण्यातील एक वीरांगना होत्या. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव राजाराम ह्यांच्या पत्नी होत्या. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी आपल्या अल्पवयीन पुत्र शिवाजी (दुसरे) यांच्या नावाने मराठा साम्राज्याची धुरा सांभाळली आणि मुघलांविरुद्ध निकराचा लढा दिला.
प्रारंभिक जीवन:
- राणी ताराराणी यांचा जन्म १६७५ मध्ये झाला. त्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या.
- ताराराणी लहानपणापासूनच शूर आणि दृढनिश्चयी होत्या. त्यांना युद्धकला आणि प्रशासनाचे शिक्षण देण्यात आले होते.
- राजाराम महाराजांशी त्यांचा विवाह झाला आणि त्या मराठा साम्राज्याच्या महाराणी बनल्या.
मुघलांविरुद्ध संघर्ष:
- राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्य मोठ्या अडचणीत सापडले होते. औरंगजेबाने मराठा साम्राज्य संपवण्याचा निर्धार केला होता.
- अशा परिस्थितीत ताराराणी यांनी हार मानली नाही. त्यांनी आपल्या लहान मुलाला गादीवर बसवले आणि स्वतः संरक्षिका बनून राज्याचा कारभार हाती घेतला.
- ताराराणी यांनी आपल्या सैन्याचे मनोबल वाढवले आणि मुघलांविरुद्ध गनिमी काव्याने लढा सुरू ठेवला. त्यांनी मराठा सरदारांना एकत्र ठेवले आणि मुघलांना सळो की पळो करून सोडले.
- ताराराणी यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने अनेक किल्ले परत जिंकले आणि मुघलांना महाराष्ट्रातून हाकलून लावले.
राजकीय भूमिका:
- ताराराणी एक कुशल प्रशासक होत्या. त्यांनी राज्यातील करव्यवस्था सुधारली आणि शेतीला प्रोत्साहन दिले.
- त्यांनी अनेक सामाजिक सुधारणा केल्या आणि प्रजेला न्याय मिळवून दिला.
- ताराराणी यांनी मराठा साम्राज्याला एक नवीन दिशा दिली आणि ते अधिक শক্তিশালী बनवले.
मृत्यू:
- ताराराणी यांचे १७६१ मध्ये निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्यात वारसा हक्कावरून वाद सुरू झाले, परंतु त्यांनी केलेले कार्य आजही लोकांना प्रेरणा देते.
संदर्भ: