पशुपालन जात व कुळे समाज जात

मला गोसावी जातीबद्दल माहिती मिळेल का?

3 उत्तरे
3 answers

मला गोसावी जातीबद्दल माहिती मिळेल का?

7
गोसावी समाज हा सिन्नर तालुक्यामध्ये सर्वत्र पसरलेला आहे. गोसावी समाजाची घरे तालुक्यामध्ये गावोगावी, खेडोपाडी, आढळून येतात. समाजाची जनगणना एक हजार एकशेआठ इतकी आहे. त्यांपैकी पाचशेऐंशी स्त्रिया, पाचशेअठ्ठ्याऐंशी पुरूष, एकशेतीन नोकरी करणारे, सहासष्ट व्यवसाय करणारे, एकशेसव्वीस घरकाम करणारे, तीनशेसात शिक्षण घेणारे, दोनशेनऊ शेती करणारे, नऊशेपन्नास मजुरी करणारे, पंधरा निवृत्त तर अवलंबून शून्य आहेत.

गोसावी समाज हा भटक्या जातींमध्ये मोडला जातो. त्यामुळे समाजाचे लोक घरी फार कमी प्रमाणात आढळून येतात. समाजाची प्रत्येक गावी चार-पाच घरे आढळून येतात. समाजात गोस्वामी, गिरी, पुरी, गोसावी इत्यादी प्रकारची आडनावे आढळून येतात. गोसावी समाजाला भगवान शंकराचे वरदान लाभलेले आहे असा समज आहे. सर्व गोसावी समाज एकत्र येऊन सिन्नरमध्ये दर महाशिवरात्रीला देवाची पूजा करतात, तेव्हा मात्र गर्दी उसळलेली दिसून येते.


भारतात सर्वत्र आढळणारा हिंदू यतींचा एक वर्ग. ‘गोसाई’, ‘गुसाई’, ‘गोस्वामी’ अशाही नावांनी हा वर्ग ओळखला जातो. ही नावे ‘गोस्वामिन्’ ह्या संस्कृत शब्दापासून आली आहेत. गोस्वामिन् शब्दाचे दोन अर्थ होतात : (१) गोधनाचा मालक व (२) इंद्रियांवर ज्याचे स्वामित्व आहे असा म्हणजे जितेंद्रिय. यांतील दुसऱ्या अर्थी गोसावी ही शब्द येथे आला आहे. भारतात गोसाव्यांची संख्या बरीच आहे. विशेषतः मध्य प्रदेश, आसाम, प. बंगाल, महाराष्ट्र, राजस्थान ह्या प्रदेशांत ती अधिक आहे. बैरागी (सं. वैराग) हा शब्द व्यवहारात सर्वसामान्यपणे गोसावी ह्या अर्थी वापरला जातो. वास्तविक बैरागी हा गोसाव्यातील एक पोटभाग आहे.

वैदिक साहित्यात ‘गोस्वामी’ असे उल्लेख आढळतात. मात्र तेथे गोस्वामी म्हणजे ‘पुष्कळ गायींचा धनी’ ह्या अर्थी हा शब्द आलेला आहे. गोसावी हा एक यतींचा वर्ग आहे तसेच ती एक जात म्हणूनही महाराष्ट्र व मध्य प्रदेश ह्या विभागांत ओळखली जाते. प्राचीन काळी यती व संन्यासी या संज्ञांत आजच्याप्रमाणे आवश्यक संबंध मानला जात नव्हता. काही यती गृहस्थाश्रमीही होते. भरद्वाज, पराशर, व्यास, गौतम, शुक, भृगू, वसिष्ठ इ. नावे गोसाव्यांच्या पूर्वपरंपरेत आढळतात. यांपैकी बहुतेक संन्यासी नसून गृहस्थ होते. दक्षप्रजापती व शंकर हे गृहस्थच होते. दक्षाचे उपनाम पर्वत होते. त्याचे पुत्र तपाच्या वेळी ‘ॐ नमो नारायणाय पुरुषाय महात्मने विशुद्धसत्त्वधीष्णाय महाहंसाय धीमही ’ हा मंत्रजपत. आजही गोसावी समाज नारायणाची पूजा करून याच मंत्राचा जप करतो असे दिसते. महाभारतातील योगिराज दत्तात्रेयही गृहस्थाश्रम आचरणारा होता. यावरून गृहस्थ साधूंची परंपरा फार प्राचीन असावी असे दिसते. महाभारतकाळात विरक्त साधूंमध्येही गृहस्थ व संन्यासी असे दोन वर्ग होते. त्यांतील संन्याशांचे कुटिचक, बहूदक, हंस व परमहंस असे चार भेद होते. रामायणातही गृहस्थी व संन्यासी तपस्व्यांचे उल्लेख आढळतात. त्यांच्यात मुंडी, दंडी व परिव्राजक असे भेद होते. बौद्ध साहित्यात यतींचे जटीलक, मुंडशावक, त्रिदंडी (तेदंडिक) व देवधार्मिक असे भेद सांगितले आहेत. जैन संघातही श्रावक व श्राविका हे घटक गृहस्थ, तर मुनि-आर्यीका किंवा श्रमण-श्रमणी हे घटक गृहत्यागी आहेत.

अलेक्झांडरच्या स्वारीच्या वेळी पंजाबात गोसाव्यांचे एक लहानसे स्वतंत्र राज्यच होते. तसेच तक्षशिलेजवळ काही नग्न साधू राहत होते. मीगॅस्थीनीझनेही भारतीय संन्याशांविषयी माहिती दिली आहे. त्यांना समाजात फार मान होता, असे तो म्हणतो. नग्न, जटाधारी, गृहस्थ यतींची तो माहिती देतो व ते पौरोहित्य, भविष्यकथन व औषधोपचार करतात असे म्हणतो. स्ट्रेबो हा ग्रीक इतिहासकारही भारतातील संन्याशांचे वर्णन करतो आणि त्यांच्या जितेंद्रियत्वाचा गौरव करतो. काही गोसावी आद्य शंकराचार्यांचे अनुयायी झाले. त्यांत बहुतांश गृहस्थ होते आणि त्यांचा स्त्रीपुत्रादी परिवार वाढता होता, असे राजतरंगिणीत सांगितले आहे. मठाम्नाय ह्या ग्रंथात गोसाव्यांच्या तीर्थ, आश्रम, वन, अरण्य, गिरी, पर्वत, सागर, सरस्वती, भारती व पुरी ह्या दहा उपनामांची माहिती दिलेली आहे. ह्या दहा उपनामांवरून पृथ्वीगीर हरिगीर गोस्वामी यांनी ‘दशनामी’ वा ‘दसनामी’ गोसाव्यांची परंपरा वेदकाळापर्यंत नेऊन पोहोचविली आहे व त्यांची गोत्रप्रवरादी माहितीही दिली आहे. गोसाव्यांतील ‘घरबारी’ वा ‘गहनबारी’ ह्या भेदाचा अर्थ ते ‘यज्ञ करणारा गृहस्थ असा देतात आणि गोसाव्यांना त्या काळी यज्ञ करण्याचा अधिकार होता, असे मत मांडतात. ही दहा उपनावे शंकराचार्यांपूर्वीपासून रूढ आहेत. वैदिक धर्मप्रसारासाठी गोसाव्यांनी अपार परिश्रम घेतले.
उत्तर लिहिले · 18/12/2017
कर्म · 458560
2

गोसावी

 हिंदू यतींचा एक वर्ग. ‘गोसाई’, ‘गुसाई’, ‘गोस्वामी’ अशाही नावांनी हा वर्ग ओळखला जातो. ही नावे ‘गोस्वामिन्’ ह्या संस्कृत शब्दापासून आली आहेत. गोस्वामिन् शब्दाचे दोन अर्थ होतात : (१) गोधनाचा मालक व (२) इंद्रियांवर ज्याचे स्वामित्व आहे असा म्हणजे जितेंद्रिय. यांतील दुसऱ्या अर्थी गोसावी ही शब्द येथे आला आहे. गोसावी हे मूळ ब्राम्हण किंवा भिक्षूकी मागणाऱ्या ब्राह्मणास दिलेली उपाधी आहे भारतात गोसाव्यांची संख्या बरीच आहे. विशेषतः मध्य प्रदेश, आसाम, प. बंगाल, महाराष्ट्र, राजस्थान ह्या प्रदेशांत ती अधिक आहे. बैरागी (सं. वैराग) हा शब्द व्यवहारात सर्वसामान्यपणे गोसावी ह्या अर्थी वापरला जातो. वास्तविक बैरागी हा गोसाव्यातील एक पोटभाग आहे.

वैदिक साहित्यात ‘गोस्वामी’ असे उल्लेख आढळतात. मात्र तेथे गोस्वामी म्हणजे ‘पुष्कळ गायींचा धनी’ ह्या अर्थी हा शब्द आलेला आहे. गोसावी हा एक यतींचा वर्ग आहे तसेच ती एक जात म्हणूनही महाराष्ट्र व मध्य प्रदेश ह्या विभागांत ओळखली जाते. प्राचीन काळी यती व संन्यासी या संज्ञांत आजच्याप्रमाणे आवश्यक संबंध मानला जात नव्हता. काही यती गृहस्थाश्रमीही होते. भरद्वाज, पराशर, व्यास, गौतम, शुक, भृगू, वसिष्ठ इ. नावे गोसाव्यांच्या पूर्वपरंपरेत आढळतात. यांपैकी बहुतेक संन्यासी नसून गृहस्थ होते. दक्षप्रजापती व शंकर हे गृहस्थच होते. दक्षाचे उपनाम पर्वत होते. त्याचे पुत्र तपाच्या वेळी ‘ॐ नमो नारायणाय पुरुषाय महात्मने विशुद्धसत्त्वधीष्णाय महाहंसाय धीमही ’ हा मंत्र जपत. आजही गोसावी समाज नारायणाची पूजा करून याच मंत्राचा जप करतो असे दिसते. महाभारतातील योगिराज दत्तात्रेयही गृहस्थाश्रम आचरणारा होता. यावरून गृहस्थ साधूंची परंपरा फार प्राचीन असावी असे दिसते. महाभारतकाळात विरक्त साधूंमध्येही गृहस्थ व संन्यासी असे दोन वर्ग होते. त्यांतील संन्याशांचे कुटिचक, बहूदक, हंस व परमहंस असे चार भेद होते. रामायणातही गृहस्थी व संन्यासी तपस्व्यांचे उल्लेख आढळतात. त्यांच्यात मुंडी, दंडी व परिव्राजक असे भेद होते. बौद्ध साहित्यात यतींचे जटीलक, मुंडशावक, त्रिदंडी (तेदंडिक) व देवधार्मिक असे भेद सांगितले आहेत. जैन संघातही श्रावक व श्राविका हे घटक गृहस्थ, तर मुनि-आर्यीका किंवा श्रमण-श्रमणी हे घटक गृहत्यागी आहेत.

अलेक्झांडरच्या स्वारीच्या वेळी पंजाबात गोसाव्यांचे एक लहानसे स्वतंत्र राज्यच होते. तसेच तक्षशिलेजवळ काही नग्न साधू राहत होते. मीगॅस्थीनीझनेही भारतीय संन्याशांविषयी माहिती दिली आहे. त्यांना समाजात फार मान होता, असे तो म्हणतो. नग्न, जटाधारी, गृहस्थ यतींची तो माहिती देतो व ते पौरोहित्य, भविष्यकथन व औषधोपचार करतात असे म्हणतो. स्ट्रेबो हा ग्रीक इतिहासकारही भारतातील संन्याशांचे वर्णन करतो आणि त्यांच्या जितेंद्रियत्वाचा गौरव करतो. काही गोसावी आद्य शंकराचार्यांचे अनुयायी झाले. त्यांत बहुतांश गृहस्थ होते आणि त्यांचा स्त्रीपुत्रादी परिवार वाढता होता, असे राजतरंगिणीत सांगितले आहे. मठाम्नाय ह्या ग्रंथात गोसाव्यांच्या तीर्थ, आश्रम, वन, अरण्य, गिरी, पर्वत, सागर, सरस्वती, भारती व पुरी ह्या दहा उपनामांची माहिती दिलेली आहे. ह्या दहा उपनामांवरून पृथ्वीगीर हरिगीर गोस्वामी यांनी ‘दशनामी’ वा ‘दसनामी’ गोसाव्यांची परंपरा वेदकाळापर्यंत नेऊन पोहोचविली आहे व त्यांची गोत्रप्रवरादी माहितीही दिली आहे. गोसाव्यांतील ‘घरबारी’ वा ‘गहनबारी’ ह्या भेदाचा अर्थ ते ‘यज्ञ करणारा गृहस्थ असा देतात आणि गोसाव्यांना त्या काळी यज्ञ करण्याचा अधिकार होता, असे मत मांडतात. ही दहा उपनावे शंकराचार्यांपूर्वीपासून रूढ आहेत. वैदिक धर्मप्रसारासाठी गोसाव्यांनी अपार परिश्रम घेतले.


उत्तर लिहिले · 10/11/2021
कर्म · 121765
0

गोसावी ही भारतातील एक जात आहे. त्यांना नाथ आणि योगी या नावांनी देखील ओळखले जाते.

उत्पत्ती आणि इतिहास:

  • गोसावी हे मूळतः शैव संन्यासी होते. आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या दशनामी संप्रदायातील ते एक भाग आहेत.
  • कालांतराने, ते एका विशिष्ट जातीत रूपांतरित झाले.
  • त्यांचा इतिहास नाथ पंथाशी संबंधित आहे, जो भारतातील एक प्राचीन योग परंपरा आहे.

व्यवसाय:

  • परंपरागतपणे, गोसावी ভিক্ষा मागणे, योग साधना करणे आणि धार्मिक विधी करणे यांसारख्या व्यवसायांशी जोडलेले होते.
  • आता ते शेती, व्यापार आणि इतर अनेक व्यवसायांमध्ये सक्रिय आहेत.

सामाजिक स्थिती:

  • गोसावींची सामाजिक स्थिती वेगवेगळ्या प्रदेशानुसार बदलते.
  • काही ठिकाणी त्यांना उच्च मानले जाते, तर काही ठिकाणी ते इतर मागासलेल्या वर्गांमध्ये (OBC) समाविष्ट आहेत.

संस्कृती आणि परंपरा:

  • गोसावी समाजाची स्वतःची अशी वेगळी संस्कृती आणि परंपरा आहे.
  • ते विविध देवी-देवतांची पूजा करतात आणि त्यांच्यात अनेक धार्मिक प्रथा प्रचलित आहेत.

अधिक माहितीसाठी काही उपयुक्त स्रोत:

टीप: ही माहिती विविध स्रोतांवर आधारित आहे आणि यात बदल होण्याची शक्यता आहे.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1080

Related Questions

आधुनिक समाजात पालकांच्या भूमिकेत बदल होत आहेत का?
जात आणि वर्ग?
सामाजिक वैशिष्ट्ये काय आहेत?
कुटुंब सामाजिक करण्याचे साधन आहे का?
दलित शब्दाचा शब्दशः अर्थ काय होतो?
पुरुषाला बघून स्त्री आपला पदर का सावरत असते?
निसर्ग नियमानुसार लग्न करणे योग्य आहे का?