2 उत्तरे
2 answers

महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष किती व कोणते?

8
निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे देशभरातून नोंदणी झालेल्या पक्षांची यादी प्रसिध्द केली आहे. यात महाराष्ट्रातील ८७ पक्ष आहेत.

मुंबई - काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे आणि रिपाई हे महाराष्ट्राच्या राजकरणातले प्रमुख आणि तुम्हा-आम्हाला माहित असलेले राजकीय पक्ष आणि आता यात भर पडली आहे ती आम आदमी पक्षाची. पण या आठ पक्षांव्यतिरिक्त महाराष्ट्रात तब्बल ८७ राजकीय पक्ष आहेत.

निवडणूक आयोगाकडे या ८७ पक्षांची रीतसर नोंदणी झालेली आहे. तुम्हाला ही माहिती वाचून आश्चर्याचा धक्का बसला असेल. हे ८७ पक्ष कुठे आहेत, करतात काय असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतील. अहो हे, ८७ पक्ष सध्या फक्त नोंदणीपुरता मर्यादीत आहेत त्यांना अजून आपले कर्तुत्व सिध्द करायचे आहे. कारण निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार त्यांनी मते मिळवली तरच, त्यांना चिन्ह आणि अधिकृत मान्यता मिळणार आहे.

मतांची आवश्यक टक्केवारी मिळवण्यासाठी त्यांना मतदारांपुढे आपले कर्तुत्व सिध्द करावे लागेल. राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या ठरवून दिलेल्या निकषानुसार मते मिळवावी लागतात. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे देशभरातून नोंदणी झालेल्या पक्षांची यादी प्रसिध्द केली आहे.

यात महाराष्ट्रातील ८७ पक्ष आहेत. निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष, राज्य पक्ष आणि नोंदणीकृत अमान्यताप्राप्त पक्ष अशा तीन गटांमध्ये वर्गवारी केली आहे. आपल्या संविधानाने निवडणूक लढवण्याचा जसा प्रत्येक नागरिकाला अधिकार दिला आहे तसाच राजकीय पक्ष काढण्याचाही दिला असल्याने देशपातळीवर राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे.

मान्यताप्राप्त सहा राष्ट्रीय पक्ष
काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाजवादी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,

महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना

देशभरातून १५९३ पक्षांची निवडणूक आयोगाकडे नोंदणी

राज्यातील ८७ नोंदणीकृत राजकीय पक्ष
हिंदुस्तान प्रजा पक्ष (कामोठे, नवी मुंबई), जय जनसेवा पार्टी (इचलकरंजी), जन सुराज्य शक्ती (वारणानगर), जनादेश पार्टी (जरीमरी, मुंबई), खानदेश विकास काँग्रेस पार्टी (जळगाव), हमारी अपनी पार्टी (पुणे), हिंदू एकता आंदोलन पार्टी (सांगली), हिंदूजन जनता पार्टी (औरंगाबाद), लोकशासन पार्टी ऑफ इंडिया (पुणे), महाराष्ट्र परिवर्तन सेना (आय) (बीड), महाराष्ट्र प्रदेश क्रांतिकारी पार्टी (कोरेगाव, सातारा), महाराष्ट्र राजीव काँग्रेस (चेंबूर, मुंबई), महाराष्ट्र सेक्युलर फ्रंट (दहिसर-पू. मुंबई) आणि महाराष्ट्र विकास आघाडी (लातूर), हिंदुस्तान पार्टी (पुणे), हिंदुस्तान स्वराज्य काँग्रेस पार्टी (मुंबई),
किसान गरीब नागरिक पार्टी (जोगेश्‍वरी, मुंबई), क्रांतिकारी जयहिंद सेना (अंधेरी-पू. मुंबई), क्रांतिसेना महाराष्ट्र (माहीम, मुंबई), नवभारत डेमोक्रॅटिक पार्टी (पुणे), नव महाराष्ट्र विकास पार्टी (मुलुंड पू. मुंबई), नेताजी काँग्रेस सेना (पुणे), ), आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया (नागपूर), बहुजन रिप. एकता मंच (कामटी, नागपूर), बहुजन विकास आघाडी (वसई), भारतीय आवाज पार्टी (जोगेश्‍वरी, मुंबई), भारतीय काँग्रेस पक्ष (बाश्री, सोलापूर),भारतीय मायनॉरिटिज सुरक्षा महासंघ (मुंबई), भारतीय परिवर्तन काँग्रेस (नागपूर)न्यूज काँग्रेस (ताडदेव, मुंबई), पॅन्थर्स रिप. पार्टी (औरंगाबाद), पिझन्टस अँण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया (दादर, मुंबई)

लोकराज्य पार्टी (चारकोप, मुंबई),  महाराष्ट्र विकास काँग्रेस (जळगाव), मानव एकता पार्टी (शिरपूर, धुळे),नारी शक्ती पार्टी (बोरीवली प. मुंबई), नाग विदर्भ आंदोलन समिती (नागपूर), नॅशनल रिप. पार्टी (चेंबूर, मुंबई), नेटिव्ह पीपल्स पार्टी (कल्याण-पू.),  अखंड भारतीय आवाज (कांदिवली-प. मुंबई), अ.भा. भारतमाता पुत्र पक्ष (नंदुरबार), अ.भा. भ्रष्टाचार निर्मूलन सेना (हडपसर, पुणे), अ.भा. रेव्होल्युशनरी शोषित समाज दल (लातूर),

अखिल भारतीय सेना (विक्रोळी, मुंबई), अ.भा. क्रांतिकारी काँग्रेस (गोरेगाव, मुंबई), आंबेडकरिस्ट रिप. पार्टी (वर्धा, भारतीय बहुजन महासंघ (दादर, मुंबई), भारतीय नवजीवन सेना (पक्ष) (पुणे),भारतीय संताजी पार्टी (नागपूर), बोल्शेविक पार्टी ऑफ इंडिया (नागपूर), डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (नागपूर), डेमोक्रॅटिक सेक्युलर पार्टी (नागपूर), धर्मराज्य पक्ष (ठाणे) आणि फोरम फॉर प्रेसिडेन्शियल डेमॉक्रसी (मुंबई).

      संदर्भ- प्रहार
उत्तर लिहिले · 9/12/2017
कर्म · 5925
0

महाराष्ट्रामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष आहेत, त्यापैकी काही प्रमुख पक्ष खालीलप्रमाणे:

  1. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे):
  2. हा पक्ष महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष आहे.

    उद्धव ठाकरे
  3. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP):
  4. हा पक्ष शरद पवार यांनी स्थापन केला असून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
  5. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS):
  6. राज ठाकरे यांनी स्थापन केलेला हा पक्ष मराठी अस्मितेच्या मुद्द्यांवर आधारित आहे.

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना
  7. शेतकरी कामगार पक्ष (PWP):
  8. हा पक्ष शेतकरी आणि कामगारांच्या हक्कांसाठी लढतो.

    शेतकरी कामगार पक्ष

या व्यतिरिक्त, अनेक छोटे प्रादेशिक पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात कार्यरत आहेत.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1040

Related Questions

लोकसभेचा कार्यकाल किती असतो?
भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य कोणत्या संविधान संशोधनाद्वारे समाविष्ट करण्यात आले आहेत?
राज्य धोरणांची निर्देशक तत्त्वे सरकारवर बंधनकारक आहेत का?
भारतीय संविधान कोणाला समर्पित आहे?
राज्यघटनेत किती भाग आहेत?
हे बेलचे चूक लक्षात आणून देणारे युवकांचे कोणते उद्गार परिषदेत आले आहेत?
गोवा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?