3 उत्तरे
3 answers

मला एक्सेल शिकायचे आहे का?

2
एक्सेल शिकायचे असेल, तर तुम्ही मराठीमध्ये ई-लर्निंग असे भरपूर कोर्सेस व वेबसाईट आहेत. त्यातील मला एक माहिती असलेली सांगतो, तो कोर्स पैसे भरून पूर्ण करायचा आहे. तुम्ही www.netbhet.com या वेबसाईटवरती जाऊन एक्सेल हा कोर्स निवडा व पैसे पेड करा किंवा तुम्ही युट्युबचा पण वापर करू शकता.
उत्तर लिहिले · 2/12/2017
कर्म · 80
0
EXCEL नक्की काय आणि त्याला कसे शिकता येईल

मायक्रोसॉफ्ट एक्सेल हा एक स्प्रेडशीट प्रकारचा प्रोग्राम असून त्यामध्ये असंख्य स्तंभ म्हणजेच उभे कॉलम्स व असंख्य पंक्ती म्हणजेच आडव्या रोज असतात, यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आकडेवारी संकलित करण्यास मदत होते. एक्सेल चा वापर आकडेवारीच्या स्वरूपात माहिती संकलित करण्यासाठी व त्या माहितीचे योग्यरीत्या विश्लेषण व एक ठोक दस्ताऐवज बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.

आता आपण एक्सेल नक्की काय आहे? याबद्दल बघितले, आता आपल्याला एक्सेल या प्रोग्रॅम बद्दल शिकायचे आहे त्यामध्ये माहिती ची मांडणी कशी केली जाते आणि विविध प्रकारच्या फॉर्मुले कशे वापरले जातात. अश्या विविध प्रकारची एक्सेल बद्दल माहिती आपल्याला युट्युब च्या माध्यमातून मिळून जाईल. 

तरी तुम्हाला आणखी एक्सेल बद्दल सखोल अभ्यास करायचा असेल तर या प्रोग्रॅम बद्दलचे विविध कोर्सेस मार्केट मध्ये उपलब्ध आहेत ते तुम्ही जॉईन करून एक्सेल ला चांगल्या प्रकारे शिकू शकता.

तसेच अश्याच प्रकारची EXCEL बद्दलची आणखी सविस्तर माहिती वाचायची असेल तर आमच्या ब्लॉग पोस्ट ला नक्की भेट द्या. 
उत्तर लिहिले · 17/2/2023
कर्म · 2195
0

तुम्ही एक्सेल शिकण्याचा विचार करत आहात हे खूपच छान आहे! एक्सेल हे एक अतिशय उपयुक्त सॉफ्टवेअर आहे आणि ते शिकण्याचे अनेक फायदे आहेत:

एक्सेल शिकण्याचे फायदे:
  • डेटा व्यवस्थापन: एक्सेल तुम्हाला डेटा व्यवस्थित साठवण्यात आणि त्याचे विश्लेषण करण्यात मदत करते.
  • आकडेमोड आणि विश्लेषण: एक्सेलमध्ये अनेक फॉर्म्युले आणि फंक्शन्स आहेत, ज्यामुळे तुम्ही आकडेमोड सहज करू शकता.
  • ग्राफ आणि चार्ट: डेटा चांगल्या प्रकारे दर्शवण्यासाठी तुम्ही ग्राफ आणि चार्ट बनवू शकता.
  • वेळेची बचत: एक्सेलच्या मदतीने तुम्ही अनेक कामे कमी वेळेत करू शकता, जसे की डेटा फिल्टर करणे, सॉर्ट करणे आणि रिपोर्ट बनवणे.
  • नोकरीच्या संधी: आजकाल अनेक कंपन्यांना एक्सेल जाणणाऱ्या लोकांची गरज असते, त्यामुळे तुम्हाला नोकरी मिळण्यास मदत होते.
तुम्ही एक्सेल कधी शिकावे?
  • तुम्हाला डेटा एंट्री (Data Entry), डेटा विश्लेषण (Data Analysis) किंवा फायनान्स (Finance) क्षेत्रात काम करायचे असेल.
  • तुम्हाला तुमच्या ऑफिसमधील काम सोपे करायचे असेल.
  • तुम्हाला स्वतःचा डेटा व्यवस्थित ठेवायचा असेल.
तुम्ही एक्सेल कसे शिकू शकता?
  • ऑनलाइन कोर्सेस: Udemy, Coursera आणि YouTube वर अनेक मोफत आणि सशुल्क कोर्सेस उपलब्ध आहेत.
  • पुस्तके: बाजारात एक्सेल शिकवण्यासाठी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत.
  • ऑफलाइन क्लासेस: तुम्ही तुमच्या शहरातील क्लासेसमध्ये जाऊन एक्सेल शिकू शकता.

त्यामुळे, जर तुम्हाला डेटा व्यवस्थापन, विश्लेषण आणि रिपोर्टिंगमध्ये स्वारस्य असेल, तर एक्सेल शिकणे तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरू शकते.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 2220

Related Questions

तीन भावांच्या रोजच्या जमा खर्चाच्या हिशोबासाठी ऑटो एक्सेल शीट कशी तयार करावी?
मला एचडीएफसी बँकेत नोकरी (जॉब) करायची आहे, कनिष्ठ लिपिक पदासाठी कोणती एक्सेल शीट शिकावी लागेल?
ॲडव्हान्स एक्सेल म्हणजे काय?
ॲडव्हान्स एक्सेलची माहिती द्या?
मला एक्सेल फाईल वापरायला शिकायचे आहे?
कमी वेळेत एक्सेल शिकायचे आहे तर काय करावे लागेल?
ॲडव्हान्स्ड एक्सेल केल्यानंतर आपण कोणत्या जॉबसाठी अर्ज करू शकतो?