औषधे आणि आरोग्य स्वच्छता घरगुती उपाय कान आणि श्रवणशक्ती आरोग्य

कानाची काळजी सुरक्षितरित्या कशी घ्यावी, कान स्वच्छ कसे करावे?

3 उत्तरे
3 answers

कानाची काळजी सुरक्षितरित्या कशी घ्यावी, कान स्वच्छ कसे करावे?

3
-सर्दी झाल्यास डॉक्टरांकडे जा.सर्दीचा आणि कानाच्या विकाराचा जवळचा संबध आहे. सर्दी झाल्यानंतर कफ नाकावाटे साफ होत नसेल व कानाच्या आत साचून राहिला असेल तर कालांतराने तो कानामध्ये साचतो..
त्यामुळे नाकावाटे सर्दी वाहून नेणाऱ्या नलिकेवर दाब येतो. त्याचा संसर्ग कानात होऊन कानफुटीचा त्रास होतो. 

👉कान स्वच्छ करताना कानामध्ये कोणतीही टोकेरी वस्तू, पिना, गाडीची चावी घालू नका..

👉कानामध्ये तेलांचे थेंब, गरम पाणी, तेलात उकळलेला लसणाचा द्रव घालण्याचे प्रकार थांबवा..

👉कर्णकर्कश्श आ‍वाज होत असलेल्या ठिकाणी वावरू नका..

👉कानावर जोरदार आघात होत असलेल्या ठिकाणी जाऊ नका..

👉ध्वनीप्रदूषणाने कानावर ताण येत असेल तर डॉक्टरांकडे वैद्यकीय तपासणी करून घ्या..

👉कानाच्या पडद्याला जर जखम झाली असेल किंवा छिद्र पडले असेल तर कानात आवाज येतो. कान दुखणे, कान जड झाल्यासारखा वाटणे, कानाची मागची बाजू दुखणे इ. लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा..

✔ही पथ्ये पाळा ✔

☑प्रवासादरम्यान कानात कापसाचे बोळे घालून ठेवा, अतिउष्ण तसेच अतिथंड हवेत जाताना काळजी घ्या..

☑कानात पाणी घालू नका, कान स्वच्छ राहतील, असे पहा..

☑डॉक्टरांकडे जाऊनच कान स्वच्छ करून घ्या. 

☑मोठ्या आवाजाच्या गाड्या चालवणे तसेच सतत फोन किंवा मोबाइलवर बोलत राहणे, वॉकमन, आयपॅड, मोबाइलचे इअरफोन लावून मोठ्या आवाजात गाणी ऐकणे टाळा..

☑स्टेशनवर ट्रेनच्या कर्णकर्कश्श आवाज सतत कानावर पडल्यामुळेही कानाची श्रवणक्षमता उत्तरोत्तर कमी होत जाते..

☑श्रवणक्षमता कमी होण्याचे पहिले लक्षण म्हणजे व्यक्ती मोठ्याने बोलू लागते. अशा व्यक्तींनी सहा महिन्यांतून एकदा कानाची तपासणी करून घ्यावी.. 

☑कान साफ करताना वापरल्या जाणाऱ्या साधनांमुळे मळ निघण्याऐवजी आतच ढकलला जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कानातील मळ आत सरकत थेट कानाच्या पडद्याला चिकटण्याची शक्यता असते..

☑कानाचा पडदा अतिशय नाजूक असल्याने त्याला थोडा जरी स्पर्श झाला तर कान दुखतो. तसेच मळ काढण्यासाठी अशा वस्तूंच्या वापरामुळे कानात इजा होण्याचीही शक्यता असते..

☑मळ काढण्यासाठी रात्री झोपताना कानात डॉक्टरांच्या सल्ल्याने ड्रॉप्स घालावेत. त्यामुळे कानातला मळ बाहेर येण्यास मदत होते. सकाळी वर आलेला मळ चांगल्या प्रतीच्या बड्सने हलकेच बाहेर काढावा. रस्त्यांवर कानातल्या मळ काढणाऱ्यांकडून कान स्वच्छ करून घेण्याचे प्रकार बंद करा.. 

☑कानात मळ साचल्याने कान चावतो किंवा आतून खाज आल्यासारखी वाटते. अशा वेळी हाताची बोटे, पेन किंवा पेन्सिल कानात घालण्याची सवय अनेकांना असते, ती टाळा..

☑पाण्यात पोहणाऱ्या व्यक्तींनी कानातले पाणी काढणे गरजेचे असते. कान व्यवस्थित साफ करून कान कोरडा ठेवणे आवश्यक आहे. कानात पाणी साचून राहिल्याने, घामाच्या धारा कानात जाऊन मळ साचण्याची किंवा कानात बुरशी होण्याची शक्यता असते. त्यामुळे कान कोरडा राहील याची काळजी घ्यावी...👍

धन्यवाद..!
 
उत्तर लिहिले · 2/12/2017
कर्म · 5210
2
*___________________________*
💫 _*M⃟   a⃟   h⃟   i⃟   t⃟   i⃟  * _ 💫

_*⭕  कानाचे 👂आरोग्य ⭕*_


____________________________
.     *_माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव_*
*╰──────•◈•──────╯*
____________________________
.        📯 *_दि.  १८ आॅगष्ट २०१८_* 📯
   *_👂 मुळातच कान तसे आपल्या दृष्टीआड असणारे इंद्रिय, त्यामुळे त्याच्याकडे कानाडोळाच केला जातो. जोपर्यंत सहजपणे सारे काही ऐकू येण्याचे कार्य सुरळीत असते तोपर्यंत आपले कानाकडे फार लक्ष जात नाही. जसे ऐकू येण्याचे प्रमाण कमी होते.. तसे हाताचा कर्णा घेऊन ऐकण्याचा प्रयत्न करणे.. हेच आपल्या हाती राहते._*   
╔══╗
║██║      _*M⃟   a⃟   h⃟   i⃟   t⃟   i⃟  * _ 
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █
*- - - - - - - - - - - -●*
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
https://www.facebook.com/profile.php?id=100011637976439
____________________________
*_कानाच्या पाळीला खालचा लटकणारा मऊ भाग मेंदूशी संबंधित असल्याने त्या ठिकाणी कान टोचणे व कर्णभूषणे घालणे ही पद्धत रूढ झाली. अस्थमा किंवा श्‍वसनाच्या रोगात आराम पडण्यासाठी एका विशिष्ट जागी कान टोचतात. तसेच पूर्वी वापरात असलेली पुरुषांची ‘भिकबाळी’ याच कारणास्तव असावी.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, वायूचे शमन हे स्नेहनानेच होत असल्याने कानात नियमित तेल टाकण्याची सवय लावावी._*  म्हणजे कर्णपूरण करणे हे दैनंदिन कार्यात समाविष्ट करणे. कर्णपूरण शक्य नसल्यास कानाला आतून तेलाचे बोट फिरवावे. कोमट तीळ तेल, खोबरेल तेल वापरण्यास हरकत नाही. मात्र आयुर्वेदिक औषधांनी सिद्ध केलेले तेल सर्वांत श्रेष्ठ.
ध्वनी प्रदूषण, इअरफोन सतत वापरणे, सतत द्रुतगती संगीत ऐकणे, डॉल्बी सिस्टिमवर गाणी ऐकणे यामुळे कानाच्या ऐकण्याच्या शक्तीवर परिणाम होतो. इअरफोनची स्वच्छता नीट न केल्यास कानात जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. यासाठी आठवड्यातून एकदा नियमित कानांची स्वच्छता करावी व रोज तेलाने कर्णपूरण करावे.
कानाशी संबंधित अगदी सर्वसाधारण तक्रार म्हणजे कानात साचणारा मळ. खरे तर बाह्यकर्णनलिकेत बाहेरून काही पदार्थ शिरू नयेत आणि कानाचे रक्षण व्हावे यासाठी मेनचट (थोडा चिकट व ऑइली) द्रव पाझरण्याची नैसर्गिक यंत्रणा कानात कार्यरत असते. त्यामुळे कानांना फार त्रास देऊ नये. उगीचच मळ कोरत राहिल्यास तो तयार होण्याचे प्रमाणही वाढत राहते आणि मग तो कानात साचत जातो. यासाठी कानात तेलाचे बोट फिरवणे व साध्याशा मऊ फडक्याने कानाचा बाहेरून दिसणारा सर्व भाग नुसता पुसला तरी मळ साठण्याची तक्रार दूर होते.
👂‘कानात वारा जाणं’ अशीही तक्रार असते. म्हणूनच की काय लहान मुले, गरोदर स्त्रिया, बाळंतीण स्त्रिया यांच्या कानावरून घट्ट टोपरी बांधण्याची प्रथा आपल्याकडे असावी. कानाची रचना समजून घेतल्यास कान हा अतिशय नाजूक आणि गुंतागुंतीचा अवयव असून बाह्यकर्णावरील त्वचेचे तापमान गालावरील त्वचेपेक्षाही अधिक असते. त्यामुळे त्यावर बाहेरील वातावरणाच्या तापमानाचा परिणाम लगेच होतो. त्याचमुळे खूप थंड वातावरणातही कान झाकून घेतले की उबेची जाणीव होते. कदाचित यामुळेच आपल्याकडेही ही कान झाकून घेण्याची प्रथा पडली असावी.
👂रेल्वे, बस प्रवासात खिडकीशेजारी बसल्यास कान झाकावे. प्रवास करताना कापूर तुकडे घालून तयार केलेल्या कापसाचा बोळा कानामध्ये ठेवावा. कापरामुळे चेहर्‍याभोवती विषाणूविरोधी वातावरण तयार होते. कापूर हे संप्लवनशील आहे
👂कानातअनेकदा उडणारे कीटक कानात गेल्याचे आढळते. कानातील मेनचट द्राव व्यवस्थित असेल तर त्याच्या वासानेच कीटक कानाकडे फिरकत नाहीत पण तरीही कीटक कानात गेल्यास कानात पाणी टाकू नये. बॅटरीचा उजेड कानासमोर धरावा. त्याने कीटक प्रकाशाकडे झेपावतो व कानातून बाहेर पडतो. पण तसे न घडल्यास सरळ डॉक्टरांकडे जावे.
– कानाला दडे बसले असल्यास कान दुखत असल्यास एक चमचा खोबरेल तेल एक लसणीच्या पाकळीबरोबर गरम करावे, कोमट झाल्यावर या तेलाचे तीन-चार थेंब कानात घालावे.
👂जुनाट सर्दीमुळे कानाला ठणका लागल्यास कापसामध्ये हिंगाचा खडा गुंडाळून कानात ठेवावा.
👂 बदामाच्या तेलाच्या नियमित वापराने कानाचे आरोग्य टिकून राहते.
तीळ तेल, खोबरेल तेल किंवा आयुर्वेद औषधांनी सिद्ध केलेले तेल कानात नियमित घातल्यास श्रवणशक्ती टिकून राहते व कानाचे कोणतेही आजार होत नाहीत.
👂 कानातून पाणी किंवा पू येत असल्यास कानात तेल टाकू नये. तसेच तेल टाकण्यापूर्वी कानाच्या पडद्याला भोक नसल्याची वा कोणत्याही प्रकारचा जंतुसंसर्ग नसल्याची खात्री करावी. याशिवाय निखार्‍यावर वावडिंगाचे दाणे टाकून धुरीवर कान धरावा, याप्रमाणे सकाळ-संध्याकाळ करावे.
👂 वयानुरूप ऐकायला कमी येणे, कानातून आवाज येणे वगैरे तक्रारींवर कानात तेल टाकावे व बरोबरीने जेवणानंतर दोन चमचे साजूक तूप खावे.
श्रोत्रेंद्रिये हे मेंदूच्या जास्त जवळ असल्याने कानात संसर्ग झाल्यास त्याचा संसर्ग मेंदूलाही होण्याची शक्यता असते म्हणूनच कानांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛
*.............................................*
.       _*ണคн¡т¡ รεvค*_
.       *_:::::∴━━━✿━━━∴::::_*
.            *ℰ⍲‿⍲ℰ*
0

कानाची काळजी कशी घ्यावी:

  • नियमित तपासणी: वर्षातून एकदा आपल्या डॉक्टरांकडून कानांची तपासणी करून घ्यावी.
  • कानांना इजा टाळा: कानांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • मोठ्याने आवाज ऐकणे टाळा: मोठ्या आवाजात संगीत ऐकणे किंवा आवाज करणे टाळा.
  • इअरफोनचा वापर टाळा: शक्यतो इअरफोनचा वापर टाळा.
  • कानाला पाणी गेल्यास: आंघोळ करताना किंवा पोहताना कानात पाणी गेल्यास ते त्वरित बाहेर काढा.

कान कसे स्वच्छ करावे:

  • नैसर्गिकरित्या स्वच्छ: कान स्वतःला नैसर्गिकरित्या स्वच्छ करतात.
  • कानकोरणी टाळा: कानात कोणतीही टोकदार वस्तू (उदा. कानकोरणी) घालू नका.
  • बाह्य भाग स्वच्छ करा: कानाचा फक्त बाहेरील भाग मऊ कपड्याने स्वच्छ करा.
  • डॉक्टरांचा सल्ला: कानात काही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टीप:

* कानाची काळजी घेणे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
* जर तुम्हाला कानात काही समस्या जाणवत असेल, तर कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.

**Disclaimer:** येथे दिलेली माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 980