कला मनोरंजन पथनाट्ये

मला पथनाट्याविषयी माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

मला पथनाट्याविषयी माहिती मिळेल का?

6
पथनाट्य किंवा स्ट्रीट प्ले हा नाटकाचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. पथनाट्य हे रस्त्यावर किंवा चौकाचौकांत चालत असले तरी, आज रस्त्यावर चालणार्‍या गारुड्याच्या किंवा डोंबार्‍याच्या खेळांना कुणी पथनाट्य म्हणत नाही. पथनाट्य हा निव्वळ करमणुकीचा प्रकार नाही; ते निर्हेतुक असूच शकत नाही. विशिष्ट सामाजिक वा राजकीय विचार जनमानसात पोचवण्याचे काम ही पथनाट्ये करत असतात. ती एक सामाजिक चळवळ आहे. विशिष्ट विचारसरणी असलेले कलाकार आपल्या अभिनयाद्वारे त्यांचा विचार पसरवण्याचे काम अशा नाटकांद्वारे करत असतात. रस्त्यावर चालणार्‍या मोर्चा, घेराव, जाहीर सभा यांपेक्षा पथनाट्य वेगळे आहे. आर्थिक-सामाजिक विषमता, स्त्रियांवरील अत्याचार, पोलिसांची दडपशाही, सरकारची अकार्यक्षमता, नोकरशाहीची चालढकलवृत्ती, धार्मिकतेचे स्तोम, भ्रष्टाचार, पर्यावरणाचा प्रश्न आदी अनेक विषयांवर ही पथनाट्ये भाष्य करून रस्त्यावरील प्रेक्षकांमध्ये जागृतीचे काम करीत असतात. पथनाट्याच्या कलावंतांना उंच स्वरात बोलावे लागते. त्यांचा सारा भर अभिनयापेक्षा प्रेक्षकांना प्रश्नाची जाणीव करून देण्यात असतो. आपल्या आकर्षक आणि चटकदार संवादांतून रस्त्यावरील प्रेक्षकांना जखडून कसे ठेवायचे यातच त्या कलावंतांचा सगळा प्रयत्‍न असतो.

दर वर्षी पाच नोव्हेंबरला रंगभूमी दिनाच्या निमित्ताने नाट्यसमर्पित ह्या संस्थेतर्फे अहमदनगरचे डॉ.रवींद्र चव्हाण हे राज्यपातळीवर पथनाट्य स्पर्धा घेतात. यापूर्वी भोपाळमध्ये १९८४ साली तिथल्या रंगमंडल या संस्थेने अखिल भारतीय पथनाट्य शिबिर भरवले होते. मुंबईची जागर ह्या संस्थेने अनेक पथनाट्ये सादर केली आहेत. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ त्या संस्थेने मुंबईच्या बोरीबंदरजवळ एक पथनाट्य सादर केले होते. पोलिसांनी हातात दंडुके घेऊन तो नाट्यप्रयोग बंद पाडायचा प्रयत्‍न केला. परंतु जमावाने पोलिसांना अडवले आणि 'रिंगणाच्या आत पाऊल टाकाल तर खबरदार' असा दम दिला होता, आणि पोलिसांना माघार घेणे भाग पाडले होते.किल्लारी , लातूर येथील भूकंपाच्या वेळी प्रा. दिलीप महालींगे यांनी " जादुगार " या पथनाट्याचे जवळपास ५०० प्रयोग करून त्यातून मिळालेली रक्कम भूकंप ग्रस्तांना दिली होती . या भूकंपाची तीव्रता इतकी अधिक होती की , प्रत्येकाला त्यांच्यासाठी काहीतरी करावे वाटत होते . एका भिकारी महिलेने हे पथनाट्य पाहून तिच्या झोळीत असलेले सर्व पैसे या पथनाट्य कलावंताच्या झोळीत टाकले होते.

महाराष्ट्राखेरीज बंगाल, मणिपूर व केरळ या राज्यांत पथनाट्य चळवळ जोमात आहे. ब्रूनो एकार्ड्‌ट, बॉब अर्न्सट्थल पीटर स्च्यूमन या तिघांनी १९६३मध्ये अमेरिकेत न्यूयॉर्क येथे स्थापन केलेल्या ’ब्रेड ॲन्ड पपेट थिएटर'तर्फे जगभर पथनाट्ये होतात. व्हिएटनामच्या युद्धाविरुद्ध जनमानस तयार करण्यासाठी या संस्थेने अथेन्स, आयर्लन्ड, इटली, उत्तर आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, बार्सिलोना आणि लॅटिन अमेरिकेत अनेक पथनाट्ये सादर केली होती. भारतातील पथनाट्य चळवळीचा इतिहास हा सफदर हाश्मी यांच्या योगदानाच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होवू शकत नाही . जवळपास ४००० पथनाट्याचे प्रयोग करणाऱ्या या रंगकर्मीला " हल्ला बोल " या पथनाट्या चे सादरीकरण करताना मृत्यू ने कवटाळले . सफदर ला बंदुकीच्या गोळ्या घालून ठार मारले गेले .

उत्तर लिहिले · 20/11/2017
कर्म · 2020
0
पथनाट्य (Street Play)

पथनाट्य हे नाटक सादर करण्याचे एक रूप आहे. हे सहसा सार्वजनिक ठिकाणी सादर केले जाते, जसे की रस्ते, बाजारपेठा, किंवा इतर ठिकाणी जिथे लोकांची गर्दी असते.

उद्देश: पथनाट्याचा मुख्य उद्देश सामाजिक समस्यांवर लोकांचे लक्ष वेधून घेणे आणि जनजागृती करणे हा असतो.

स्वरूप:

  • हे सहसा कमी खर्चात तयार केले जाते.
  • वेशभूषा आणि रंगमंचाचा वापर कमी असतो.
  • actors थेट लोकांशी संवाद साधतात.
  • संगीत आणि नृत्याचा वापर केला जातो, ज्यामुळे ते अधिक आकर्षक होते.

विषय: पथनाट्ये विविध विषयांवर आधारित असू शकतात, जसे:

  • बालविवाह
  • हुंडाबळी
  • शिक्षण
  • पर्यावरण
  • आरोग्य

इतिहास: पथनाट्याची परंपरा भारतात फार जुनी आहे. पूर्वी लोककथा आणि पौराणिक कथांवर आधारित नाटके रस्त्यांवर सादर केली जात होती. आधुनिक काळात, याचा उपयोग सामाजिक आणि राजकीय संदेश देण्यासाठी केला जातो.

उदाहरण: अनेक स्वयंसेवी संस्था (NGOs) आणि सामाजिक कार्यकर्ते पथनाट्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करतात.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1860

Related Questions

मुल्यावर आधारित मराठी पथनाट्ये आहेत का?
मुलगी झाली हो या पथनाट्याची ओळख करून द्या?