2 उत्तरे
2
answers
झिरो फिगर म्हणजे काय?
1
Answer link
साइझ 0 आणि 00 हा अमेरिकन कपड्यांमधला सर्वात लहान साइझ आहे. छाती-कंबर-नितंबाचं प्रमाण – 30-22-32 असं धरण्यात येतं. साइझ 00 हा त्याहून अर्धा ते 2 इंचाने कमी असतो. या साइझच्या कपड्यांची चलती सुरू झाल्यावर त्या प्रकारची फिगर असण्याची मॉडेल्सवर आणि सिने अभिनेत्रींवर सक्ती करण्यात येऊ लागली. भारतामध्ये करीना कपूरने झीरो फिगर मिळवण्यासाठी आपलं वजन 65 किलोवरून 48 किलोपर्यंत कमी केलं. अतिशय बारीक होण्याच्या आणि झीरो फिगर मिळवण्याच्या दबावामुळे अनोरक्झियासारखे अनेक गंभीर आजार मॉडेल्समध्ये आणि किशोरवयीन मुलींमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसू लागल्यानंतर झीरो फिगर असणाऱ्या मॉडेल्सना मोठमोठी फॅशन हाउसेस नकार देऊ लागली. पूर्वी साइझ झीरो असणाऱ्या अनेक मॉडेल्सनीही तरुण मुलींना या प्रकारच्या अतिरेकापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
0
Answer link
झिरो फिगर म्हणजे काय?
'झिरो फिगर' म्हणजे अत्यंत बारीक किंवा सडपातळ शरीरयष्टी. ह्या प्रकारच्या शरीरयष्टीमध्ये कंबर खूपच लहान (22-24 इंच) असते. 'झिरो फिगर' चा ट्रेंड फॅशन जगतात 2000 च्या दशकात सुरू झाला.
झिरो फिगरचे तोटे:
- रोगप्रतिकारशक्ती कमी होणे.
- शरीरात पोषक तत्वांची कमतरता.
- हाडे ठिसूळ होणे.
- नैराश्य येणे.
'झिरो फिगर' पेक्षाbody mass index (BMI) संतुलित ठेवणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
अधिक माहितीसाठी: लोकमत लेख