पक्षी पर्यावरण प्राणी

फुलपाखरू बद्दल माहिती मिळेल का?

4 उत्तरे
4 answers

फुलपाखरू बद्दल माहिती मिळेल का?

5
फुलपाखरू हा एक आकर्षक रंगाचा पंख असलेला एक कीटक आहे.  कीटकांना डोके , पोट आणि छाती हे अवयव असतात. फुलपाखराला या जोडीने पंख आणि मिशा असतात. फुलपाखरे  मिशांनी वास घेतात तर पायाने चव ओळखतात.
   फुलपाखरांचे आयुष्य हे 14 दिवसांचे असते. मोनारक जातीच्या फुलपाखराचे आयुष्य 14  दिवस असू शकते.  फुलपाखराच्या वाढीच्या अंडी ,अळी, कोष व फुलपाखरू या अवस्था असतात.
  
   बिबळ्या कडवा या जातीच्या फुलपाखराची मादी रुईच्या पानांवर अंडी घालते. अंड्यामधून सहा ते आठ दिवसांनी अळी बाहेर पडते. या अळीलाच सुरवंट म्हणतात. या फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतेवेळी भुकेने वखवखलेला असतो. मोनार्क जातीची फुलपाखरे लांब प्रवासासाठी प्रसिद्ध आहेत.

     धन्यवाद.....!!!!
उत्तर लिहिले · 10/7/2020
कर्म · 13290
4
फुलपाखरू हा एक आकर्षक रंगांचे पंख असलेला एक कीटक आहे. त्याच्या वाढीच्या अंडी, अळी, कोश व कीटक या अवस्था असतात. मोनार्क जातीची फुलपाखरे लांब प्रवासासाठी प्रसिद्ध आहेत.
महाराष्ट्रात फुलपाखरांच्या जवळपास २२५ प्रजाती आहेत. देशातील १५ टक्के फुलपाखरे महाराष्ट्रात आढळतात. ब्लू मॉरमॉन हे फुलपाखरू आकाराने सर्वात मोठे असलेल्या सदर्न बर्डविंग या फुलपाखरानंतर सर्वात मोठे फुलपाखरू असून ते मखमली काळ्या रंगाचे असते. त्याच्या पंखांवर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात. पंखाखालील बाजू काळी असून शरीराकडील एका बाजूवर लाल ठिपका असतो. ब्लू मॉरमॉन हे फुलपाखरू श्रीलंका व भारतातील महाराष्ट्र, दक्षिण भारत व पूर्व समुद्र किनारपट्टीच्या क्षेत्रात आढळते. सध्या विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत त्याचे अस्तित्व आहे.
उत्तर लिहिले · 10/11/2017
कर्म · 11985
0

फुलपाखरू: एक सुंदर कीटक

फुलपाखरू एक सुंदर आणि आकर्षक कीटक आहे. फुलपाखरू लेपिडोप्टेरा (Lepidoptera) वर्गातील आहे, ज्यात पतंग देखील येतात.

फुलपाखराचे जीवनचक्र:

  • अंडी: फुलपाखरू आपल्या जीवनाची सुरुवात अंड्याने करते. फुलपाखरू साधारणपणे पाने, देठ आणि फांद्यांवर अंडी घालतात.
  • लार्व्हा (caterpillar): अंड्यातून बाहेर पडल्यानंतर, अळी (larva) पानांवर जगते आणि वाढते.
  • कोश (pupae): अळी स्वतःभोवती एक कडक आवरण तयार करते, ज्याला कोश म्हणतात. या आवरणात अळीचे रूपांतरण होते.
  • प्रौढ फुलपाखरू: कोशामध्ये काही दिवसांनंतर, प्रौढ फुलपाखरू बाहेर येते. त्याचे पंख ओले असतात, जे काही वेळात सुकून जातात आणि मग ते उडण्यासाठी तयार होते.

फुलपाखराचे महत्त्व:

  • फुलपाखरू परागकण (pollination) प्रक्रियेत मदत करतात, ज्यामुळे वनस्पतींना पुनरुत्पादन करता येते.
  • फुलपाखरू परिसंस्थेचा (ecosystem) एक महत्त्वाचा भाग आहेत.

फुलपाखरांचे प्रकार: जगात फुलपाखरांच्या अनेक प्रजाती आहेत, प्रत्येकाचा रंग, आकार आणि जीवनशैली वेगळी असते.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1780

Related Questions

माणसाला चावल्यानंतर मधमाश्या खरोखरच मरतात का?
एका गोगलगाईची तक्रार कुणी व का केली असावी?
मधमाशीची नजर तीक्ष्ण असते का?
नर मांजर दोन दिवसांपासून घरी आले नाही?
डायनासोरचे हात आखूड का होते?
सर्वात बुद्धिमान मासा कोणता?
ॲनिमल डे च्या होम रिचर्डच्या वार्तापत्रातील परिणाम काय आहेत?