2 उत्तरे
2
answers
आपल्या देशाची राष्ट्रीय प्रतीके काय आहेत?
8
Answer link
*आपली राष्ट्रीय दांभिकता*.
*देशाच्या प्रगतीचे मापन करायचे असेल तर नागरिक काय लायकीचे होते आणि आता काय लायकीचे झाले, या निकषावर करायला हवे.*
*सातत्याने ढासळत जाणारा नागरिकांचा दर्जा हा राष्ट्रीय काळजीचा विषय असायला हवा.*
*बोगीतील संडासातल्या टमरेलला साखळी बांधण्याची आयडिया ज्या कुठल्या कल्पक अधिकाऱ्याला सुचली असेल, त्याला शोधून काढून रेल्वे बोर्डाचे चेअरमन करायला हवे.भारतीय नागरिकांचे त्याचे आकलन हे श्रेष्ठ दर्जाचे आहे.*
*‘तेजस’ या आधुनिक, वेगवान रेल्वेत सुंदर बाकडी, एलईडी, छान वातानुकूलित व्यवस्था आणि असे बरेच काही असावे, ही कल्पना ज्याने मांडली त्याचे भारतीय नागरिकांचे आकलन कमी आहे, या कारणावरून निलंबनच करायला हवे.....*
*हातगाडीवर बसवून न्यायच्या लायकीच्या लोकांना त्याने पालखीत बसवून रुबाबात न्यायचे स्वप्न पाहण्याचा प्रमाद केला आहे.*
*बाळासाहेब ठाकरे एक किस्सा त्यांच्या शैलीत नेहमी सांगायचे.....लोक इथल्या हॉटेलमधले चमचे चोरून नेतात. अगदी रोज नेतात.अरे, चोरी करायची ठरवलेच आहेस तर निदान मोठा दरोडा तरी टाक. चमचे काय चोरतोस.....?*
*एका श्रेष्ठ भारतीय नागरिकाने ,एका प्राणीसंग्रहालयात,पिंजऱ्यातील माकड जाळीजवळ आल्यावर त्याच्या अंगाला* *खाजखुजली लावली होती आणि माकड खाजवून खाजवून वेडेपिसे झाल्याचा व्हिडीओ फेसबुकवर टाकला होता.*
*रात्री दोन वाजता ढिनच्यॅक ढिनच्यॅक संगीत गाडीत वाजवत गल्ल्यांतून फिरणारे, गाडीचा दरवाजा उघडून ओकल्यासारखे तंबाखू थुंकणारे,*
*ऐतिहासिक इमारतींवर स्वताःचे आणि स्वताःच्या टिनपाट मैत्रिणीचे नाव कोरणारे,*
*कोणी बघत नाही म्हणून सार्वजनिक शौचालयाचा वापर करून पाणी न टाकता निघून जाणारे,*
*शाळेतल्या लहान मुलांना वाटायला आणलेल्या खिचडीचा तांदूळ बाजारात नेऊन विकणारे,*
*सार्वजनिक उत्सवात ,लोकांकडून जमविलेल्या वर्गणीतून अवास्तव खर्चाच्या नावाखाली कमिशन म्हणून आपली तुंबडी भरणारे,*
*सार्वजनिक गणेशोत्सव बाप्पाच्या पुढ्यातील फुले प्रसाद आपल्या बापाचा समजून घरातील फ्रिजची कपाटं भरणारे बाप्पाचे उत्साही कार्यकर्ते, नेतेपणाची हौस भागवणारे बिनबुडाचे महाभाग,*
*रस्त्यावरची बाकडी- रोड डिव्हायडर - फरशा चोरून नेऊन विकणारे, एसटी किंवा रेल्वेचे सीट कव्हर सहज विरंगुळा म्हणून फाडणारे...हीच आपली ओळख आहे.*
*या ओळखीबद्दल काय बोलणार...?*
*वर्तमान लाजीरवाणा आणि भिकारडा असला की गतकाळातल्या फुशारक्या मारण्याशिवाय आपल्या हातात दुसरे काय उरते.....?*
*सरकार बदलून खूप प्रयोग करून झाले. त्याने काही फरक पडत नाही. आता जनताच बदलायला पाहिजे.*
*या देशात जर सुधारणा घडवून आणायच्या असतील, तर आपले नागरिक देशातून हाकलवून देऊन बाहेरच्या देशांतले चकचकीत लोक आयात करणे अतिशय आवश्यक आहे.*
*आणि तसे जर करायचे नसेल, आणि आपल्याच नागरिकांना जाब विचारायचा असेल तर मग मागच्या ६३ वर्षांत तुम्ही अजूनही टुकार नागरिकच का आहात, असा प्रश्न विचारायला हवा....!*
*सरकार काय, मतदानाने कधीही बदलता येईल. जे कधीच बदलत नाहीत आणि दिवसेंदिवस अधिकच भिकार दर्जाचे बनत चाललेत, त्या नागरिकांचे काय करायचे.....?

0
Answer link
आपल्या देशाची राष्ट्रीय प्रतीके खालीलप्रमाणे आहेत:
- राष्ट्रध्वज: तिरंगा (स्रोत: भारत सरकार)
- राष्ट्रगीत: जन गण मन (स्रोत: भारत सरकार)
- राष्ट्रचिन्ह: सारनाथ सिंहचतुर्मुख (स्रोत: भारत सरकार)
- राष्ट्रभाषा: कोणतीही नाही (अधिकृत भाषा: हिंदी आणि इंग्रजी) (स्रोत: भारत सरकार)
- राष्ट्रीय प्राणी: वाघ (स्रोत: भारत सरकार)
- राष्ट्रीय पक्षी: मोर (स्रोत: भारत सरकार)
- राष्ट्रीय फूल: कमळ (स्रोत: भारत सरकार)
- राष्ट्रीय फळ: आंबा (स्रोत: भारत सरकार)
- राष्ट्रीय वृक्ष: वड (स्रोत: भारत सरकार)
- राष्ट्रीय नदी: गंगा (स्रोत: नमामि गंगे)
- राष्ट्रीय जलचर प्राणी: डॉल्फिन (स्रोत: भारतीय वन्यजीव संस्था)
- राष्ट्रीय वारसा प्राणी: हत्ती (स्रोत: TRAFFIC, WWF)
- राष्ट्रीय सरपटणारा प्राणी: किंग कोब्रा (नाग)
- राष्ट्रीय चलन: भारतीय रुपया