प्रॉपर्टी
स्थावर किंवा जंगम मालमत्ता म्हणजे काय?
2 उत्तरे
2
answers
स्थावर किंवा जंगम मालमत्ता म्हणजे काय?
8
Answer link
मालमत्ता ही प्रामुख्याने दोन गटांत विभागली जाते.
एक जंगम तर दुसरी स्थावर.
'जंगम मालमत्ता' म्हणजे चल(movable). हलवता येणारी. उदा: रोकड रक्कम, वाहने, बँकेतली खाती, मुदत ठेवी, कंपन्याचे भाग (शेअर्स), सोन्या-चांदीच्या वस्तू, जडजवाहीर, हिरेमाणकं, घरातल्या सर्व चीजवस्तू-फर्निचर, कपडेलत्ते इत्यादी. तसंच अमूर्त मत्ता (ट्रेडमार्क, स्वामित्व अधिकार, भाडेदारी हक्क, अन्य प्रकारचे हक्क, हितसंबंध इत्यादी).
याउलट 'स्थावर मालमत्ता' (immovable)म्हणजे अचल मालमत्ता असते. उदा: जमीनजुमला, शेतीभाती, वाडी, फळबागा, इमारत, सोसायटीमधला फ्लॅट (गाळा) वगैरे.
0
Answer link
स्थावर मालमत्ता:
- जमीन, इमारती आणि जमिनीशी कायमस्वरूपी जोडलेल्या वस्तू यांचा समावेश स्थावर मालमत्तेत होतो.
- स्थावर मालमत्ता सहसा हलवता येत नाही.
- उदाहरणार्थ: जमीन, घर, दुकान, कारखाना.
जंगम मालमत्ता:
- ज्या मालमत्ता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येतात, त्या जंगम मालमत्ता म्हणून ओळखल्या जातात.
- उदाहरणार्थ: सोने, चांदी, शेअर्स, गाड्या, फर्निचर.