गडदुर्ग भूगोल मृदा प्रकार महाराष्ट्राचा इतिहास

महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये कोणती मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते?

3 उत्तरे
3 answers

महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये कोणती मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते?

1
महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त व महत्त्वाची मृदा म्हणजे दख्खनच्या पठारावरील कापसाची काळी मृदा आहे. तिने दख्खनच्या पठारावरील सर्वात जास्त प्रदेश व्यापलेला आहे. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे घाटमाथा ओलांडल्यावर संपूर्ण प्रदेश काळ्या मृदेचा असून विदर्भातील पूर्वेकडील प्रदेश वगळता सर्वत्र काळी मृदा आढळते. ज्याप्रमाणे मृदेची जाडी बदलते त्याचप्रमाणे रंगही गडद काळ्या रंगाचा असून फिकट होत असतो.
उत्तर लिहिले · 20/10/2017
कर्म · 3845
1
ही मृदाBasealt खडकाच्या विदारणातून तयार झालेली काळी Basealt मृदा होय. हिच्यात कापसाचे पीक प्रामुख्याने घेतले जात असल्याने हिला कापसाची काळी मृदा देखील म्हणतात. हिच्यात टिटँनिफेरस मँग्नेटाईट हे संयुग खनिज आढळते.
उत्तर लिहिले · 20/10/2017
कर्म · 2420
0

महाराष्ट्राच्या पठारी विभागात काळी मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते.

या मृदेला रेगूर मृदा असेही म्हणतात.

ही मृदा खालील वैशिष्ट्ये दर्शवते:

  • रंग: काळा
  • पोत: चिकण
  • खनिज: लोह, चुना, मॅग्नेशिअम
  • ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता: जास्त
  • पिके: कापूस, ऊस, सोयाबीन, डाळिंब

ही मृदा दख्खनच्या पठारावर बेसाल्ट खडकांच्या अपक्षयामुळे तयार झाली आहे.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1200

Related Questions

देशातील पिकाखाली असलेल्या काळ्या मृदेचे वर्गीकरण कसे स्पष्ट कराल?
बेसॉल्ट पासून बनलेल्या जमिनीचा रंग कोणता असतो?
भारतात सर्वाधिक कोणत्या प्रकारची मृदा आढळते?