शिवाजी महाराज राजव्यवस्था इतिहास महाराष्ट्राचा इतिहास

शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अर्थ काय?

3 उत्तरे
3 answers

शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अर्थ काय?

13
राजमुद्रा

छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा

छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ही राजमुद्रा संस्कृत  भाषेत होती. ती खालीलप्रमाणे-

"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते"

मराठी अर्थ –

प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि विश्ववंदनीय असणारी अशी ही शहाजींचे पुत्र शिवाजी यांची (राज) मुद्रा (प्रजेच्या) कल्याणासाठी विराजमान होते.
उत्तर लिहिले · 8/10/2017
कर्म · 20545
2
छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचाछत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. ती खालीलप्रमाणे- कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. ती खालीलप्रमाणे-संस्कृत :
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।"

मराठी  :
प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेने वाढत जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठी चमकेल
उत्तर लिहिले · 24/7/2021
कर्म · 121765
0

शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अर्थ खालीलप्रमाणे आहे:

  • मूळ राजमुद्रा: "प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते"
  • अर्थ: ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, त्याचप्रमाणे शहाजी महाराजांचे पुत्र शिवाजी यांची ही मुद्रा प्रजेच्या কল্যাणासाठी आहे.

या मुद्रेतून महाराजांनी आपला दृष्टिकोन आणि ध्येय स्पष्ट केले.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1040

Related Questions

मराठी किती जुनी भाषा आहे?
औद्योगिक क्रांती कुठे झाली?
पंडित जवाहरलाल नेहरू हे आशियानचे संस्थापक होते का?
पूर्व युरोपातील सोव्हिएट रशियाच्या दबावाखालील ५ देशांची नावे लिहा?
पूर्व युरोपातील अनेक देश सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली होते का?
ॲनी बेझंट यांच्या होमरूल चळवळीचे भारतात झालेले परिणाम लिहा?
1975 चा पेठ मधील दुष्काळ?