3 उत्तरे
3
answers
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
8
Answer link
आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आणि लांब नदी गोदावरी दख्खनच्या पठारावर पश्चिम घाटापासून पूर्व घाटापर्यंत वाहून पुढे बंगालच्या उपसागरास मिळते. गोदावरीची एकूण लांबी सुमारे १४६५ कि.मी. असून तिचे नदीप्रणालीचे क्षेत्र १५३७७९ चौ.कि.मी. आहे. महाराष्ट्रातील गोदावरी खोऱ्यातून दरवर्षी सुमारे ३७८३० दशलक्ष घनमीटर पाण्याचा प्रवाह वाहतो. संपूर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे ४९% क्षेत्र व्यापलेले आहे.
0
Answer link
गोदावरी नदी
गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 कि.मी असून गोदावरीची महाराष्ट्रातील लांबी 668 कि.मी. आहे.
- दक्षिण गंगा म्हणून गोदावरी नदी ओळखली जाते.
- गंगा नदीनंतर देशातील दुसरी मोठी नदी गोदावरी आहे.
- महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी नदी आहे.
- सह्याद्री पर्वतात नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर येथील ब्रम्हगिरी टेकडीवर गोदावरीचा उगम झालेला आहे.
- गोदावरी नदी पूर्ववाहिनी नदी असून महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्रप्रदेश राज्यातून वाहते.
- गोदावरी नदी दख्खन पठारावर वाहते. पश्चिम घाटापासून पूर्व घाटापर्यंत प्रवास करते.
- महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड या जिल्ह्यातून प्रामुख्याने गोदावरी नदी वाहते.
- गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्राच्या 49 टक्के क्षेत्र व्यापले आहे.
- गोदावरी नदीच्या उपनदया: गोदावरीच्या उजव्या तिरावरून म्हणजे दक्षिणेकडून गोदावरीला दारणा, प्रवरा, मुळा, बोर, सिंधफणा, बिंदुसरा, कुंडलिका या नदया मिळतात. गोदावरीच्या डाव्या तिरावरून म्हणजेच उत्तरेकडून शिवणा, खाम, कादवा या नदया मिळतात.
- गोदावरी नदी गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण सरहद्दीवरून पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते. तेथे गोदावरीला प्राणहिता व इंद्रावती नदया मिळतात.
जर आपल्याला महाराष्ट्रातील प्रमुख नद्या, उगमस्थान, लांबी, उपनद्या याविषयी संपूर्ण माहिती घ्यायची असेल तर येथे क्लिक करा.
0
Answer link
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी आहे.
गोदावरी नदीची काही माहिती:
- लांबी: सुमारे 1,465 किलोमीटर
- उगम: त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्हा
- खोरे: महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा
- उप नद्या: प्राणहिता, इंद्रावती, मांजरा
गोदावरी नदीला 'दक्षिण गंगा' म्हणून देखील ओळखले जाते.
स्त्रोत: विकिपीडिया