घर घरगुती उपाय रंग वस्त्र डाग काढणे

मी कपडे सुकायला टाकले होते, परंतु त्याला लोखंडी तारेचा गंज लागला आहे, तर तो कसा काढावा? तो शर्ट सफेद रंगाचा आहे, यावर घरगुती उपाय काय आहे?

4 उत्तरे
4 answers

मी कपडे सुकायला टाकले होते, परंतु त्याला लोखंडी तारेचा गंज लागला आहे, तर तो कसा काढावा? तो शर्ट सफेद रंगाचा आहे, यावर घरगुती उपाय काय आहे?

6
कोणताही डाग काढण्यासाठी प्रथम आपल्या घरातला जुना टूथब्रश जवळ ठेवावा. गंज काढण्यासाठी कोणत्याही तीक्ष्ण किंवा धारधार वस्तूंचा उदाहरणार्थ सुरी अथवा चाकूचा वापर करणं टाळावं कारण मुळात ह्या वस्तूही धातूच्याच आणि पुन्हा त्यांच्या घर्षणामुळे अधिक गंज चढण्याची शक्यता असते. त्यापेक्षा खाली नमूद केलेल्या गोष्टींचा वापर करून डाग सहज घालवता येतात.

मीठ आणि लिंबू  गंज आलेल्या डागावर थोडं मीठ भुरभुरवा. त्यानंतर त्यावर एक लिंबू पिळून टाका. हे मिश्रण संपूर्ण भिजेपर्यंत किंवा ते मुरेपर्यंत तसंच ठेवा. सुकलेलं हे मिश्रण दोन ते तीन तास तसंच ठेवावं. त्यानंतर लिंबाच्या सालीने हळुहळू ते घासून काढायचा प्रयत्न करावा.

व्हाइट व्हिनेगर आणि अँल्युमिनिअम फॉइल
अँल्युमिनिअम फॉइल व्हाइट व्हिनेगरमध्ये बुडवावं आणि त्यानंतर त्या फॉईलने गंजाचे डाग धुऊन काढावेत.

बेकिंग सोडा आणि पाणी
गंजावर बेकिंग सोडा टाकावा. त्यानंतर त्यावर हळुहळू पाणी घालून टूथब्रशच्या साहाय्याने गंज घासून काढावा. मात्र अशा पद्धतीचा वापर करण्यापूर्वी डाग कशावर पडलेला आहे, हे पाहणं गरजेचं आहे.

व्हिनेगर
गंजाचे लहान स्वरूपातले आणि पटकन निघतील असे डाग काढायचे असतील तरच व्हिनेगरचा वापर करावा. ज्यावर गंज चढला असेल ती वस्तू रात्रभर व्हिनेगरमध्ये बुडवून ठेवावी. सकाळी हलक्या हाताने घासून काढावी.

बटाटे आणि भांडी घासण्याचा साबण
कापलेला बटाटा साबणात किंवा बेकिंग सोडयामध्ये बुडवावा. भिजलेला बटाटा त्या गंजावर घासावा. आणि मग तो पृष्ठभाग कापडाने पुसून घ्यावा. हीच क्रिया परत परत करण्यासाठी भिजलेल्या बटाटयाचा वरचा काप काढावा. पुन्हा साबणात बुडवावा आणि गंजावर लावावा. रोजच्या वापरात असलेली लोखंडी भांडी उदा. तवा, कढई, पळी यांना शक्यतो पाण्यात फार वेळ ठेवू नये. वापरून स्वच्छ केल्यानंतर त्यांना तेल लावून ठेवावे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गंज काढल्यानंतर तो भाग पुसून कोरडा करावा. गंज चढू नये म्हणून सुरुवातीपासून काळजी घ्यावी. वेळोवेळी स्वच्छता ठेवून रंगरंगोटी केलीत तर गंज चढण्याची क्रिया कमी होईल.

उत्तर लिहिले · 29/9/2017
कर्म · 22090
2
भावा, 30 रुपये जाऊदे, पण त्याला भट्टीला टाक, घरगुती उपाय वापरू नकोस.
उत्तर लिहिले · 29/9/2017
कर्म · 3995
0
जर तुमच्या सफेद रंगाच्या शर्टला लोखंडी तारेचा गंज लागला असेल, तर तो काढण्यासाठी तुम्ही खालीलपैकी काही घरगुती उपाय वापरू शकता:

1. लिंबू आणि मीठ:

  1. गंज लागलेल्या भागावर लिंबाचा रस पिळा.
  2. त्यावर थोडे मीठ टाका.
  3. हे मिश्रण व्यवस्थित चोळा आणि काही वेळ तसेच राहू द्या.
  4. नंतर तो भाग पाण्याने धुवा.

2. व्हिनेगर (सफेद सिरका):

  1. गंज लागलेला भाग व्हिनेगरमध्ये काही वेळ बुडवून ठेवा.
  2. नंतर ब्रशने घासून काढा.
  3. गरजेनुसार प्रक्रिया पुन्हा करा आणि पाण्याने स्वच्छ धुवा.

3. बेकिंग सोडा:

  1. बेकिंग सोडा पाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करा.
  2. ही पेस्ट गंजलेल्या भागावर लावा आणि काही वेळ सुकू द्या.
  3. नंतर ब्रशने घासून काढा आणि पाण्याने स्वच्छ करा.

4. बटाटा:

  1. बटाट्याचा एक तुकडा घ्या आणि तो गंजलेल्या भागावर चोळा. बटाट्यामध्ये असलेले ऍसिड गंज काढण्यास मदत करते.
  2. नंतर कपड्याला पाण्याने धुवा.

5. टार्टरची क्रीम:

  1. टार्टरची क्रीम आणि पाणी मिक्स करून पेस्ट तयार करा.
  2. ही पेस्ट गंजलेल्या भागावर लावा आणि 30 मिनिटे ठेवा.
  3. नंतर गरम पाण्याने स्वच्छ धुवा.

टीप:

  • उपाय करण्यापूर्वी, कपड्याच्या एका लहान भागावर प्रयोग करून पाहा जेणेकरून रंगावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही.
  • गंज काढताना कपड्याला जास्त जोर लावू नका, अन्यथा कपडा फाटू शकतो.
उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 5060

Related Questions

गारमेंट म्हणजे काय?
कोणता कपडा सर्वात उत्तम आहे?
रेडीमेड शर्ट सोबत जास्तीचे बटण का दिले जाते?
नवीन चपला किंवा जोडे का चावतात?
मोगल काळात कोणत्या कापडाची ख्याती जगभर पसरली?
पायजामाचा उत्पत्तीचा देश कोणता?
कथाकथन साठी कसे ब्लाऊज?