2 उत्तरे
2
answers
पाणी वाचवा यावर पाच ओळी सांगा?
5
Answer link
पाणी वाचवा
___________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
___________________________
वाचा आणि विचार करा.
" तहान लागल्यावर विहीर खणायची " जेवढं मूर्खपणाचं लक्षण आहे, तेवढाच मूर्खपणा आपण एप्रिल महिना सुरु झाल्यावर जे " पाणी वाचवा " ओरडतो, त्यात आहे..
पाणी हे काय फक्त एप्रिल लागल्यावर पुरवून वापरण्यासाठी असतं का ?" पाणी जपून वापरा " ही मोहीम आपण वर्षभर का राबवू शकत नाही ?
करंगळी एवढं मुतायचं,आणि मग बादलीभर पाणी ओतायचं हे आता कुठेतरी बदलायला हवं..कुणीतरी म्हटलेलंच आहे कि " पुढचं युद्ध तेल आणि पाण्यासाठी होईल "ते आता खरं होईल कि काय असं वाटायला लागलंय..केवळ आज तुमच्या घरात बादलीभर पाणी आहे म्हणून एखादा तुमचा मुडदा पाडून, ते पाणी घेऊन जाईल..अशी परिस्थिती खरंच येऊ शकते..एकवेळ अशीही येईल कि डोळ्यांतून सुद्धा पाणी यायचं बंद होईल..हे खरंच होऊ शकतं..
पाच-सातशे वर्षांपूर्वी, चंद्रगुप्त मौर्याने,कुणाशी विवाह करून कुठचा मौर्य जन्माला घातला,आणि महम्मद गजनी ने कुणासोबत काय दिवे लावले हा अभ्यासक्रम आता बास झाला..त्यापेक्षा पाण्याचे व्यवस्थापन अर्थात Water Management हा विषय शाळेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवा असं माझं वैयक्तिक मत आहे..तुम्ही शेतकरी असाल किंवा शहरी, हा विषय शिकलाच पाहिजे असं Compulsion असायला हवं..आज इजरायेल सारख्या देशात आपल्या १० टक्के पाऊस पडतो तरीही तिथे नंदनवन फुलू शकतं..ह्याचं कारण म्हणजे त्यांचा Water Management हा अभ्यास इतका पक्का आहे, कि एकदा नळातून पडलेलं पाणी, हे जवळपास सात वेळा Recycle & Reuse होऊनच शेवटी जमिनीवर पडतं..हे आपण अमलात का आणू शकत नाही ?
आपण स्वतःला 'शेती प्रधान 'देश म्हणवतो..आपल्याकडे मुबलक प्रमाणात पाउस पडूनही, आपल्याकडे पाण्याचे दुर्भिक्ष आहे ही लाजिरवाणी गोष्ट नाही ? पाउस पडायला आज चार दिवस उशीर झाला तर सगळ्यांची 'हवा टाईट ' होईल ही परिस्थिती येतेच कशी ? स्वतंत्र मिळून ७० वर्ष झाली तरीही आपल्याकडच्या पाइप-लाईन्स ह्या गळक्या किंवा फुटक्याच..एक पाईप लाइन फुटली तर लाखो लिटर पाणी, गटारात जातं आणि त्याचं कुणालाही वाईट वाटत नाही..एकाचाही जीव जळत नाही..

जपान मध्ये पाणी कसं वाचवतात हे फोटो नुसते इथे शेअर करून भागणार आहे का ?ते अमलात कोण आणणार ? इथे पाणी वाचवा हे ओरडायचं आणि दुसऱ्या दिवशी मात्र ३२ दात घासायला ३२ भांडी पाणी ओतायचं हे चालणार आहे का ? आज आपल्याला बटन दाबलं कि वीज मिळते, आणि नळ सोडला कि पाणी पडतं ह्याचा माज आलाय असं मला आता वाटतं..
गणेशोत्सव, नवरात्री-उत्सवात ,कुठलेतरी पांचट विनोद मारणारे कलाकार बोलावण्यापेक्षा,किंवा कुठल्यातरी हिडीस गाण्यांचा ऑर्केस्ट्रा ठेवण्यापेक्षा, 'पाणी वर्षभर कसं वाचवता येईल 'ह्यावर व्याख्यान देणारा एखादा वक्ता बोलवावा..सण-वार-उत्सव साजरा करताना सुद्धा पाण्याचा अपव्यय कसा टाळता येईल ह्याची खबरदारी प्रत्येक मंडळाने घ्यावी.प्रत्येक धर्माच्या लोकांनी, आपापल्या सणाला हे पाळायलाच हवं.गणपती असो कि बकरी-ईद,कुणीही ह्याला अपवाद असता कामा नये..शेवटी पाणी आणि वीज ही राष्ट्राची संपत्ती आहे..ती वाचवायलाच हवी..
आज आपण मंगळावर पाणी आहे का हे शोधायला यान सोडतोय..उद्या देव न करो,पण पृथ्वीवर कुठे पिण्यासाठी पाणी सापडतंय का हे शोधण्यासाठी यान सोडावं लागेल..♏
पाण्याला मराठीत “रस” असेही एक नाव आहे. तेही अगदी सार्थ आहे. कारण पाणी हेच मानवी शरीराचा ’जीवनरस’ आहे.
जल हेच जीवन”
0
Answer link
पाणी वाचवा यावर पाच ओळी:
- पाणी हे जीवन आहे, त्यामुळे पाण्याचे महत्व ओळखून ते जपायला हवे.
- पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी वर्षा जल संचयन (Rainwater harvesting) करणे आवश्यक आहे.
- प्रत्येक नागरिकाने पाणी जपण्याची सवय अंगीकारायला हवी.
- शेतीमध्ये ठिबक सिंचन (Drip irrigation) आणि तुषार सिंचन (Sprinkler irrigation) यांसारख्या आधुनिक पद्धतींचा वापर करावा.
- पाणी वाचवण्यासाठी जनजागृती करणे काळाची गरज आहे.