2 उत्तरे
2 answers

संभाजी महाराज यांना कोणी शिक्षा दिली?

7
इ.स. १६८९च्या सुरुवातीला
संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या
सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर
येथे बोलावले. १ फेब्रुवारी, इ.स. १६८९
रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे
रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के
आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी
संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी
गणोजी शिर्केने कमालीची
गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची
आखणी खूपच काळजीपूर्वक
केली. मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक
झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते.
प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा
हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने
संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश
यांना जिवंत पकडले.
शारीरिक छळ व मृत्यू
साचा:प्रताधिकारभंग
त्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार
कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड, आता
धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने
संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन
करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले.
पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार
दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी
कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत
मानहानीकारक अशी धिंड काढण्यात
आली. तरीही
संभाजीराजांनी शरणागती
पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे
अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे ४०
दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही
संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि
धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना
अखंड भारतवर्षाने धर्मवीर हे पदवी
बहाल केली.
बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा)
संभाजी महाराजांची धिंड
काढलेली होती. एका बोडक्या घाणेरड्या
उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे
बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर
विदूषकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते.
संभाजी राजेंचे डोळे फोडणे, कानात शिसे ओतणे, जिभ
कापणे या सारख्या शिक्षा फर्मावल्या. अशा प्रकारच्या शिक्षा
मुस्लिमांच्या कोणत्याही धर्मग्रंथात
नाहीत, हे लक्षात घेणे गरजेचं आहे
.गळ्यातील शिवरायांनी
चढवलेली कवड्याची माळ उतरवून
गुरांनाही सहन होणार नाही
अशी काथ्याची पेंढी
बांधलेली होती. दोघांच्याही
डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा, कुराणमध्ये
सांगितलेल्या आदेशानुसार इराणी लाकडी
टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे 'तख्तेकुलाह' म्हणजे
लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेवून त्याला
दोन्ही हात बांधलेले होते. त्या खोड्याला घुंगरे
बांधलेली होती अन् त्यावर
छोटी छोटी निशाणे चितारलेली
होती. .
पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. इथे
तुळापूरच्या संगमावर हलाल करावयाचे होते. संभाजी
महाराजांची तेजस्वी नेत्रकमले
काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून
रवी जशी फिरवावी, तशा त्या
तप्त - लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र
चर्र आवाज करीत चर्येवरील
कातडी होरपळून गेली. सारी
छावणी थरारली पण संभाजी
महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही
उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा
मात्र जास्तच चढला. कवि कलशाचेही डोळे काढण्यात
आले.
संभाजी महाराजाना पुढील शिक्षा
होती जबान काटायची.
औरंगजेबाची तशी आज्ञा
होती. दोन हबशी पुढे सरसावले, पण
संभाजी राजांचा जबडा काही उखडेना.
शेवटी हबशींनी नाक दाबले
तसे श्वासासाठी संभाजींचे तोंड उघडले तोच
त्यांच्या तोंडात पक्कड घुसवली गेली. त्या
पकडीत पकडलेली त्यंची
जीभ तलवारीने कापली..
ही हत्या मार्च ११ , इ.स. १६८९ रोजी
[ मृत्यूजय अमावस्या ] भीमा आणि
इंद्रायणी नदीच्या संगमावरील
आळंदीजवळच्या तुळापूर येथे करण्यात
आली. प्रारंभी संभाजी
महाराजांची समाधी तुळापूर मध्ये
आहे असा समज होता. कालांतराने व विषय संदर्भ मिळाल्या नंतर
ही मूळ समाधी वढू-बद्रूक येथे
असल्याचे वा.सी. बेंद्रे यांच्या ध्यानात आले. व अपार
कष्ट करून त्यांनी अखेर संभाजी च्या
समाधीचा शोध लावला व आजही तो
अनमोल ठेवा फार वाजत गाजत साजरा केला जातो .
उत्तर लिहिले · 21/9/2017
कर्म · 1860
0

संभाजी महाराज यांना औरंगजेबाने हाल हाल करून मारण्याची शिक्षा दिली.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 2380

Related Questions

कालगणना करण्याची एकके कोणती? इतिहासाच्या अभ्यासाचे फायदे लिहा. स्वयंप्रकाशी साधने लिहा.
महाराष्ट्रातील कोणता सण राज्य सण म्हणून ओळखला जातो?
भारतातील पहिले महिला राष्ट्रपती कोण?
महाराष्ट्रातील कोणते शहर सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते?
क्विट इंडिया मूव्हमेंट कोणत्या वर्षी सुरू झाले?
जय जवान जय किसान हे घोष वाक्य कोणी दिले?
महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण?