2 उत्तरे
2
answers
औरंगजेब राजाविषयी संपूर्ण माहिती मिळेल का?
4
Answer link
औरंगजेब हा मोगल सम्राट होता. त्याने त्या वेळी आपल्या राज्यात शरियत(इस्लामी कायदा) लागू केला होता.गैर-मुसलमान जनतेवर असा कायदा लागू करणारा तो पहला मुसलमान राज्यकर्ता होता.त्याने आपल्या आयुष्यातील बराच काळ दक्षिणेत मराठा साम्राज्यावरआणि इतर विरोधकांवर अंकुश ठेवण्याच्या प्रयत्नांत घालवला.
अधिकार काळ :१६५९-१७०७
पूर्ण नाव. : अबू मुझफ्फर मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर
जन्म. :नोव्हेंबर ३,१६१८दाहोद,भारत
मृत्यू. : मार्च ३,१७०७ औरंगाबाद,महाराष्ट्र,भारत
पूर्वाधिकारी : शाह जहान
उत्तराधिकारी : पहिला बहादुर शाह
वडील : शहाजहान
पत्नी : रबीया दुराणी, दिलरासबानो बेगम
पुत्र : पहिला बहादूर शाह, आझमशाह सुलतान मुहम्मद अकबर,मुहम्मद कामबक्श,कन्या : झेबुन्निसा.
राजकीय कारकिर्दीची सुरुवात :
१६३४ मध्ये शाहजहानने औरंगजेबास मुघल प्रथेनुसार दख्खनचा सुभेदार म्हणून नियुक्त केले. औरंगजेबाने मराठवाड्यातील खडकी या शहराचे नाव बदलून तेऔरंगाबादकेले. इ.स.१६३७ साली औरंगजेबाने रबीया दुराणीशी लग्न केले. त्या दरम्यान शहाजहानने थोरला मुलगा दारा शुकोहला मुघल दरबारातील कामकाजात लक्ष घालण्यास सांगितले.जहान आराबेगम ही औरंगजेबाची थोरली बहीण. इ.स.१६४४ मध्ये औरंगजेबाची दुसरी एक बहीण एका दुर्घटनेत जळून मरण पावली. या घटनेनंतर तीन आठवड्यांनी औरंगजेब आग्रा येथे आला, यामुळे शहाजहान बादशहा भयंकर संतापला आणि त्याने औरंगजेबाला दख्खनच्या सुभेदारीवरून पायउतार केले. यानंतर तो सात महिने दरबारात आला नाहीँ. नंतर शहाजहानने त्याची नियुक्ती गुजरातच्या सुभेदारपदी केली. येथे त्याने आपल्यातील कसब पणाला लावून काम केले. फलस्वरूपी त्याला बदख्शान (अफगाणिस्तान) बाल्ख येथील सुभेदारीही देण्यात आली.
सत्तासंघर्ष :
सन् १६५२ मध्ये शाहजहान आजारी पडला. त्याचा मृत्यू जवळ आला आहे असे वाटू लागले. दाराशुकोह, शाह सुजा आणि औरंगजेब यांच्यांत सत्तासंघर्ष सुरू झाला. ज्याने स्वतःला बंगालचा गव्हर्नर म्हणून घोषित केले होते त्या शाह सुज़ाला औरंगजेबाकडून हार पत्करून बर्मायेथील अराकान क्षेत्रीजावे लागले. १६५९ साली औरंगजेबाने शाहजहानला कैद करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला;दारा शिकोहचा शिरच्छेद करवला. अशी वदंता आहे की शाहजहाँला मारण्यासाठी औरंगजेबाने दोनदा विष पाठवले होते. पण ज्या वैद्यांकरवी विष पाठविले होते ते इतके स्वामिनिष्ठ होते की त्यानी शाहजहाँला विष न देता ते स्वतःच पिऊन टाकले.
मराठ्यांविरुद्ध युद्ध :
मुघल साम्राज्याचा नर्मदा नदी पलीकडे विस्तार तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणेया दोन हेतूंसाठी औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणाऱ्या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्या जवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला.
शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे, आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते. एके रात्री लाल महालाजवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली.
शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मुघल साम्राज्याची जी नाचक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली. जे राजे मुघल आश्रयामुळे शिवाजी महाराजांना जुमानत नसत ते आता शिवाजीराजांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झुकले.
आणखी एक वेगळा परिणाम या प्रकरणामुळे झाला तो म्हणजे शिवाजीराजांना मिळालेला मानवी क्षमतेपेक्षा मोठा काल्पनिकदर्जा आणि त्यामुळे जोडलेल्या दंतकथा. अनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रुसैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. इ.स. १६६३ सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले.

0
Answer link
औरंगजेब (1618-1707): एक संक्षिप्त माहिती
औरंगजेब, ज्याला आलमगीर म्हणूनही ओळखले जाते, हा मुघल साम्राज्याचा सहावा सम्राट होता. त्याचे शासन 1658 ते 1707 पर्यंत चालले. खाली त्यांची माहिती दिली आहे:
जन्म आणि सुरुवातीचे जीवन:
- औरंगजेबचा जन्म 3 नोव्हेंबर 1618 रोजी गुजरातच्या दाहोद येथे झाला.
- तो शहाजहां आणि मुमताज महल यांचा तिसरा मुलगा होता.
- त्याने लहानपणी कुराण, हदीस, न्यायशास्त्र आणि अरबी भाषेचे शिक्षण घेतले.
राजकीय कारकीर्द:
- 1636 मध्ये त्याला दख्खनचा सुभेदार बनवण्यात आले.
- त्याने दोन वेळा दख्खनचे सुभेदारपद भूषवले.
- 1657 मध्ये शहाजा आजारी पडल्यानंतर, औरंगजेबाने इतर भावांविरुद्ध सत्तासंघर्ष केला आणि तो जिंकला.
- त्याने 1658 मध्ये स्वतःला सम्राट घोषित केले.
शासन आणि धोरणे:
- औरंगजेब एक कट्टर सुन्नी मुस्लिम होता आणि त्याने इस्लामी कायद्याचे पालन केले.
- त्याने अनेक हिंदू मंदिरांना तोडण्याचे आदेश दिले.
- 1679 मध्ये त्याने हिंदूंवर जिझिया कर पुन्हा लावला.
- त्याच्या धार्मिक धोरणांमुळे अनेक हिंदू आणि शीख बंड झाले.
सैन्य आणि साम्राज्य विस्तार:
- औरंगजेबाने आपल्या साम्राज्याचा विस्तार केला.
- त्याने दक्षिणेकडील विजापूर आणि गोवळकोंड्याची राज्ये जिंकली.
- मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराजांशी त्याचे दीर्घकाळ संघर्ष झाले.
मृत्यू:
- 3 मार्च 1707 रोजी अहमदनगर येथे औरंगजेबचा मृत्यू झाला.
- त्याला खुलताबाद येथे दफन करण्यात आले.
वारसा:
- औरंगजेबाच्या कठोर धोरणांमुळे मुघल साम्राज्य कमजोर झाले.
- त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याचे विघटन झाले.
अधिक माहितीसाठी: